तो आणि त्याची सौ ......


      आज  जे  काही  मनाच्या  देव्हाऱ्यात  नंदादीपाइतकं  पवित्र  आणि  अखंड  प्रेम  तेवतंय  ते  फक्त तुझ्यासाठी  .... रात्रीच्या  रजईत  लपवलेला चंद्राचा हिरा फक्त तुझ्यासाठी .....  खरच ...... फक्त तुझ्यासाठी ......
पुढे काही लिहिण्याआधी तुझी क्षमा मागते .... क्षमस्व ...... तुझी सौ  ....
      कारण अगदी दोन क्षणांसाठी का होईना पण मला तुझ्या सौ . चा हेवा वाटला . खरच , फार नशीब घेऊन जन्माला घातल आहे देवाने तिला. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच लोकांना नियती हे भाग्य देते . ते तुझ्या सौ. च्या पदरी देवाने न मागता स्वखुशीने घातलेलं दान ...
पाहिलं असशीलच तू . आभाळाइतकं  प्रेम करणारा तू .... अजून काय हवंय ??
     खरं सांगू ? जेव्हा तू म्हणालास ना... "प्रेमान जवळ घेणार कुणी असेल तर जास्तच जवळ यावं वाटत " अगदी त्या क्षणी , तुझी सौ. तुझ्या डोळ्यात अखंड दिसत होती . हात पसरून उभी ... तुला सामावून घ्यायला अतुर. तेव्हा मी स्वतालाच एक प्रश्न विचारला 
                      निरपेक्ष प्रेम बघून 
                      इतकी नाजूक हसलीस 
                      खरं सांग तेव्हा
                      तुझ्याजवळ तू किती उरलीस ?
     आणि खरच , सगळीच्या सगळी सौ . तुझ्याकडे अगदी वाऱ्यासारखी धावत आली. तू तुझ्या हक्कच माणूस जाताना स्वतः बरोबर घेऊन गेलास आणि रात्रभर कस्तुरीमृगाप्रमाणे आपल्या जवळची कस्तुरी बाहेर शोधात झोपी गेलास .
अरे , तुझी सौ तुझ्या आत आहे . एकदा डोळे बंद कर आणि अगदी मनापासून तिला साद घाल. बघ..... लगेच आवाज देईल ती .. ओ...
      कुठून आला रे हा आवाज ???
      बाहेरून ???? नाही ..............
       शेजारून ??? नाही ..............
हा आवाज तुझ्या आतून आला . इतक्या अलगदपणे ती तुझ्यात एकरूप झाली कि कधी ... हे तुला कळलंही नाही. आई जसं आपल्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवते , आपल्याच शरीराचा एक भाग बनवून. तसंच काहीस..... त्यापेक्षाही जास्त ... तुला तुझी सौ सांभाळायची आहे . 
    आयुष्यभर ...... तुझ्या श्वासातला एक अखंड श्वास बनवून .....
फार काही लिहावास वाटतय रे .... पण नको .... माझीच नजर लागेल .आई म्हणते तसं... "अग , तुझीच नजर लागेल कधीतरी तुम्हा दोघांना . सांभाळा तुमच्या अहो ना "
किती निवांत झोपला आहेस रे ... तुला छातीशी कवटाळून रात्र सारून गेल्यावर वाटत ...
                          कोण म्हणत येणारा दिवस 
                           नेहमी नवा असतो ???
                           मी तर म्हणते हा नुसताच 
                           आपल्या दोघांच्या दोन रात्रीमधला दुवा असतो 
खरच म्हटलंय हे कुणीतरी :)
रात्रीच्या कुशीत शिरून पाहिलेल्या गोड स्वप्नांना जोपर्यंत पहाटेची कोवळी पालवी फुटेल तोपर्यंत अशीच जवळ घेऊन राहीन तुला ... येशील ना ....