कुठल कोडं सोडवलं ?

पुराच्या पाण्यातून तारलं अन
किनाऱ्यावर आणून बुडवलं 
कळलंच नाही नात्यातला 
कुठल कोडं सोडवलं ?

तळपत्या उन्हात् सुद्धा तिन 
नाही मागितली सावली 
पण कोसळत्या पावसात तिला 
टीप गाळायला लावली 

ओठावरच हसर गाण 
तिच्यासाठी खुडल पण 
रंगलेल्या मैफिलीत तिला 
एकटीला आणून सोडलं 

काचेची सुंदर मूर्ती 
चुकून हातून  सुटली 
जपलेली आठवण त्याच्याच 
डोळ्यासमोर फुटली 

फुललेल्या फुलातला 
गंधच वाहून गेला 
बिलगलेला थेंब  
पाकळीला सोडून गेला 

मोत्यासारखी सजवली  होती
पायाखालची माती
 तिच्या पावलाखाली उरली 
आता फक्त विस्कटलेली रेती  
    
दोघांची ओंजळ भरलेली 
पण देण्यासारख उरलच नाही 
वाट अडवून धरलेली 
पण पाउल तिकडे वळलाच नाही 

बोलायला हव होतं 
ते मनातच राहून गेल 
अन उरलेलं सगळ तिच्या 
डोळ्यातून वाहून गेल 

                          " मुळातच नात जुळल नाही तर 
                            तुटण्याच दुः ख जाणवत नाही 
                            पण जुळलेल नात तुटलं तर 
                            होणार्या वेदनेस अंत राहत नाही "

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)