सुटून गेलेला क्षण


कणाकणांनी वेचायच , क्षणाक्षणाने जगायचं 
उरल आयुष्य आता फक्त सुखच बघायचं 
          अस म्हणत … 
एखाद्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो 

मग ती एखादी घटना असेल, 
          एखाद अर्धवट राहिलेलं स्वप्न असेल 
किंवा मग एखादी अपूर्ण इच्छा 
          जी पूर्ण व्हायची आपण अगदी दिवसाही स्वप्न पाहत असतो 

          आणि … 
तो दिवस अगदी नकळत उगवतो …. 
जे काही इतके दिवस मनाच्या कँनव्हासवर चितारलं होत ते घडूनही जात 

react करायला , आनंद व्यक्त करायला किंवा मन भरेतोवर अनुभवायला ही वेळ नाही मिळत  
डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर तो क्षण एका क्षणाने शिळा झालेला असतो 

तो क्षण देखील क्षणभर आपला असतो 
          आणि पुढच्या क्षणातच कायमचा पोरका होतो
साबणाच्या फुग्यांची डबी हातात राहावी 
          अन हवेत हरवलेल्या नाजूक फुग्या सारखा होतो 

आयुष्य इतक्या जलद गतीने बदलत आहे की 
त्या देवबाप्पाला thanks म्हणायलाही वेळ मिळत नाहीये 

घडून गेलेल्या घटनेकडे...
          आपण इतक्या तन्मयतेने आणि आत्मीयतेने पाहत राहतो 
की पुढची अजून एक इच्छा झाली पण पूर्ण … हे लक्षात यायला ही २ क्षणांचा विलंब होतोय :)

जणू काही दुर्वांच्या जुडीत लपून गेलेला हात … 
          नेहमी हाच आशीर्वाद देतोय 

क्षण सारे जगून घे.....सारे काही मागून घे 
जाणाऱ्या क्षणासाठी .....एक आठवण आठवणीने दे :)

नात तुझ नि माझ.....कणाकणातून घडणार
सूखादुखाच्या सोबतीने......आकाशाला भिडणार

View Facebook Comments

2 comments:

  1. दिवस संपता संपता तो दूर दूर जाऊ लागतो.
    मी त्याला कितीही का धरून ठेवेना...तो नाही ऐकत माझं...
    हळूहळू धूसर होऊ लागतो...आणि एका क्षणी दिसेनासा होतो.
    अदृश्य होऊन जातो.
    पुढील काही क्षण...

    :)

    ReplyDelete

Thank you for your comment :)