बस्स एवढंच...


वाट्टेल ती चारचाकी दारात उभी करण्याइतकी 
ऐपत कमावत चाललोय आपण 
पण लेकरांना पाठीवरून घोडा - घोडा घेऊन 
घरभर फिरणारा आनंदच लोप पावतोय 

कित्तीही outing करा .... 
आनंदच सापडत नाहीये 
सापडलाच चुकून तर होतोय यांत्रिक 
त्या सेल्फी च्या नादाने 

फेसबुक , व्हाट्सअँप  यावर गठ्ठाभर लाईक्स मिळावा 
पण ' आवडणं ' म्हणजे नक्की काय ??
हेच कळेनासं झालाय 
आजीने गालावरून फिरवत मोडलेल्या बोटांचा कौतुक 
कुठल्याही ट्रॉफीत मिळेनासं झालाय   

एकटेपणा आणि मायेची तहान 
त्यांनाच तर भरलय आपलं ठणकत मन 
सगळ्यातलं सगळं कळतंय 
हल्ली आपल्याला 
पण ' का ? '
हा साधा प्रश्न सोडावंण कठीण झालयं  

रात्र - रात्र जागून काढतो आपण 
डोळ्यातल्या पाण्याने उशी ओलीचिंब 
आठवणींनी जीव कासावीस होतोय 
पण जवळच्या माणसाला 
एक साधा फोन करायला होत नाही 

बॉस ने दिलेले review comments 
कपातल्या वादळासारखे चहासोबत संपवतो 
पण आपल्याच माणसाचा एखादा शब्द 
ऐकून घ्यायची हिम्मत हरवून बसलोय 

सापडेल त्या संस्कार शिबिरात 
डांबत चाललोय इटुकल्या पिल्लांना
पण शाळेच्या पटांगणात उभं राहून 
हात जोडून आपण म्हटलेली रामरक्षा 
चुकूनही येत नाही जिभेवर हल्ली 

रिंगमास्टर बनतोय सगळे 
त्यांना शिस्त लावण्याच्या नादात 
पण त्या चिमुकल्यांच जग 
चाबकाने गोंजारता नाही येत 
हे कध्धी लक्षात येणार आपल्या ?

 इन्व्हेस्टमेंट म्हणून अजून एखादा फ्लॅट 
हे गणित अगदी पक्कं बसलाय डोक्यात 
पण घरातली शांती , समाधान , आनंद 
याची कधी मांडायची हो आकडेवारी ?????

घड्याळाच्या काट्याहूनही वेगाने 
धावतात आई बाबा हल्ली 
पण लेकीचं बालपण संपत चाललंय 
हे लक्षातच नाही येत त्यांच्या 
अचानक एके दिवशी येऊन बसते 
आपली चिऊ शेजारी 
कधी ?
कन्यादानावेळी ........ 
मग वाटायला सुरु होतं 
मी का घाईत होतो इतका  ?  :''(
 
                    काहीच नाही का करता येणार ??

                                       

लेकराला सकाळी उठवताना 
स्कुलबसची वेळ सांगण्याऐवजी
एकदा जवळ घेऊन बघा प्रेमाने ... 
बस्स एवढंच... 

आईला आठवणीने फोन करून सांगा 
पहिल्या पावलाला आधार दिलास
म्हणून इथवर चालू शकलो 
थँक यू   
बस्स एवढंच... 

बघा... बाबाच्या खांद्यावरचं ओझं 
कमी करता आलं तर 
जवळ घेऊन एक घट्ट मिठी मारा 
मग कळेल ... श्रीमंती म्हणजे नक्की काय ते 
बस्स एवढंच...

दारात आलेल्या चिमणीसाठी 
दोन दाणे टाका तांदळाचे 
बघा ... 
कित्ती मोठ्ठ समाधान मिळेल 
बस्स एवढंच...

उपद्व्याप करणारचं .. मुलचं ती 
त्यांच्या अंगावर ओरडण्यापेक्षा 
गुढगे जमिनीला टेकवून एकदा 
त्यांच्याशी मनसोक्त खेळा 
वयाच्या भिंती पडून तर बघा ... 
बस्स एवढंच...

असं कित्तीस उरलंय आयुष्यं ?
सगळे नियम गाठोड्यात गुंडाळून 
एकदा जगून तर बघा 
बस्स एवढंच... 
 

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)