स्पर्श


स्पर्श ....
जन्माला आल्यापासून आपण कितीतरी प्रकारचे स्पर्श अनुभवले आहेत....अजून अनुभवायचे बाकीही असतील काही 
डॉक्टरच्या पहिल्यावहिल्या धपाट्या पासून होते याची सुरुवात ..
पण प्रत्येक स्पर्श खुपकाही वेगळ सांगत असतो .. वेगळ जाणीव करून देत असतो . जेव्हा शब्द बोलून बोलून थकतात . डोळे पापण्या मिटून घेतात आणि सार काही ह्याच्या स्वाधीन करतात ..तेव्हा सुरु होतो स्पर्शाचा खेळ ( सॉरी ...खेळ नाही .... भेळ म्हणायचं होत मला ... बऱ्याच चवी असणारी )


म्हणजे बघा ना ....
कधीतरी एकदम अनपेक्षित अस घडून जात ..एकदम रागाचा पर चढतो , आपण कुणावर तरी प्रेम करत असतो आणि ती आपल्या समोर येउन अचानक उभी राहते , कुणाचीतरी पावलं दूर जाताना दिसली कि आवरतच नाही घशातला हुंदका  किंवा तुमच बाळ तुम्हाला पहिल्यांदा आई म्हणून हाक  मारत 
असे काही क्षण ...आपण काहीच react नाही करू शकत . काय बोलायचं सुचतच नाही अशा वेळी.एक नाजूकसा स्पर्श सगळ काम एकदम आरामात करून जातो . दोन सेकंदात मन हलक वाटायला सुरु होत .
अनुभवलाय कधी असा स्पर्श ?

जॉब मिळालेल्या दिवसापासून लगबग सुरु असते bag भरायची .. आई ला सोडून आजपर्यंत कधीच नाही राहिलि ती ..तरीही जॉब साठी जाव लागेल लांब ... म्हणून तयार होते आणि जायच्या वेळी 
घरातून पाऊल बाहेर ठेवताना आई इतकच म्हणते " सांभाळून रहा ". काय बोलायचं कळतच नाही . पाय उंबऱ्यातच अडखळतो. जाऊन आई ला एक घट्ट मिठी मारते ती .चांदण्यांनी भरलेल्या आभाळातून निखळून  डाव इतक एकट वाटायला सुरु होत तिला पुढच पाऊल उचलताना 
अनुभवलाय कधी हा लेकीच्या मायेचा स्पर्श ?

लहानपणी आईच्या मांडीवरची अंगाई , केसातून फिरवलेला हात , बाबांच्या खांद्याशी स्पर्धा , दृष्ट काढताना आजीची मोडलेली बोट,
सरांची छडी लागू नये म्हणून मित्राने मध्ये घातलेला हात , सायकलवरून पडल्यावर बाबांनी पाठीवर ठेवलेला हात 
असे अनेक बरेच स्पर्श .. ताकद देणारे , बरसणारे , तरसणारे ..कितीतरी वेगळे   

बाळ झाल्यापासून जीवाच्या वर जपते आई त्याला. आणि दात यायला लागल्यावर एके दिवशी बाळराजे कडकडून चावा घेतात आई च्या गालाचा ..खरतर तिला ओरडायच न्हवतच..पण कळ इतकी जास्त होती की चुकून रागावली ती बाळाला ... आईच्याही डोळ्यातून पाणी वाहायला लागल ... बाळ हुंदके देऊन रडत होत ... आई ओरडली म्हणून न्हवे ... आई च्या डोळ्यात पाणी दिसलं म्हणून ... काय बोलाव काहीच सुचेना तिला .. जवळ घेउन तिने त्याला घट्ट मिठी मारली .. सगळ क्षणात शांत झाल 
अनुभवलाय कधी हा आईचा उबदार स्पर्श ?  .    

लग्न ठरल्यावर तो आणि ती पहिल्यांदाच फिरायला जातात .दोघेही अगदी सुरक्षित अंतर ठेऊन .कितीही पाऊस कोसळत असला तरीही . अचानक समोरून कुलकर्णी काका येताना दिसले तिला ( या काकांची खासियत ती त्याला लग्नानंतर ऐकवते ). काकांना पाहून ती एकदम त्याचा हात हातात घेते ( हा माझा हक्काचा नवरा आहे हे सांगायला ). आणि तो ... अंगातून वीज जावी इतका स्तब्ध होतो ..तिच्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने
अनुभवलाय कधी तिचा प्रेमळ भिजलेला स्पर्श ?

कधी कधी तिला भांडायचं मूड येतो . तो ही वैतागून  हॉल मधेच झोपून जातो . ती बेडरूम मध्ये एकटीच . अंधाराशी धिटाईने रात्र जागवत .सकाळी दोघेही चुकल्याचुकल्या सारखे वागत असतात . दोघानाही माहित असत .. मला सोडून झोप लागली नसणार एकट्याने . पण हि मौनाची दरी ओलांडायची कुणी ? इथे येउन अडून बसत सगळ .
कपाटाचा दरवाजा उघडताना चुकून ..हो अगदी चुकूनच .. तिच्या नुकत्याच न्हालेल्या केसांची एक बट याच्या अंगठीत अडकते . ती : "आऊच ..." 
तिच्या या आवाजाने तो झटक्यासरशी मागे सरकतो .. दोघे काल भांडलो हे विसरून तो तिची बट नाजूकपणे सोडवू लागतो . अन ती येउन त्याला बिलगते 
" M सॉरी . नाही रे राहू शकत मी तुझ्याशिवाय . मी चिडले म्हणून काय झाल . तुला नाही का जवळ घेत आल मला ? "
तिच्या या वाक्यावर तो मनापासून हसतो ( माहीतआहे मला ..मी जवळ घेतलं की तुझा राग कुठल्या कुठे पळून जातो ) आणि एकदा तिच्या केसातून हात फिरवत " भीती नाही वाटली अंधाराची काल तुला ? :) "
आता तिच्या अश्रूंचा बांध फुटतो .. त्याच्या कुशीत शिरून ती थांबवलेले सगळे हुंदके बाहेर काढते( तू डोक्यावरून हात फिरवलास की मी आपोआप शांत होते )
अनुभवलाय कधी हा एका रात्रीच्या विराहानंतरचा सौं. चा प्रेमाच्या अधिकाराचा स्पर्श ? :)


पारिजात


मी उगाचच हळहळतो 
पाहून झाडताना पारिजाताचा सडा  
आणि मला लोक म्हणतात 
" हा खरा वेडा... "

हे वाचल असेलच या पूर्वी कुठेतरी 

आजची ही कविता वाचून तुम्ही असच काहीस म्हणालं 
" पारिजाताचा सडा पाहून हळहळनाऱ्या वेड्यानंमध्ये आता हिलाही मोजायला हरकत नाही  "
:)
असो .... असं म्हटलत तरी चालेल मला 
पण तो सडा पाहून मलाही गलबलून येत 

ज्या पानांशी आयुष्यभर सोबत केली .. त्यांना सोडून या पारिजाताच्या फुलाला जमिनीवर याव लागत ... एक दिवसच आयुष्य 
सुवासाची देणगी मिळालेली असूनही  
आणि तरीही ..
तरीही ही सुवासाची उधळण अखंड चालूच असते ...
कुणी त्याला पायदळी तुडवलं तरीही 

असाच एक प्रयत्न .... 
काय वाटत असेल परीजातला ? 
जर त्याला बोलता आलं असत तर ..... काय बोलला असता तो पारिजाताचा सडा ?  




परवा माझ्या मनाला 
मी हसताना पाहील 
पापण्यांच्या काठावरच पाणी 
पुसताना पाहील 

    ओलावलेले नयन 
    ओठांवर हास्य  
    मुक्या या शब्दांनी 
    लपवली कितीतरी रहस्य

जगायचं असेल इथं 
तर हसावच लागत 
दुखऱ्या या वेदनेला 
सोसावच लागत 

    वेदानासुद्धा कधीकधी 
    शिकवते खूप सार 
    का गळत फुल प्राजक्ताच 
    जेव्हा वाहत वार 

सुमनांचा तो सडा 
दिसायला सुंदर दिसतो 
पानाच्या विरहात मात्र 
ढसढसून रडत असतो 

    बघणारा समजतो दवबिंदू 
    त्याच्या अश्रुथेम्बला 
    आणि म्हणतो मेघगर्जना 
    पावसाच्या फुटलेल्या हुंदक्याला 

दुनियेस वाटले मी 
चांदणे अवसेचे
हृदयात कोंडले मी 
काळोख पावसाचे    

    वाहणारा वारा 
    हलणारी पान 
    कुणी सांगाव केव्हा 
    बदलेल हे सार 

गालांवर ओघळणारे थेंब 
ओठातल्या हस्यात येवून मिळतील 
बघणाऱ्या प्रत्येकाला तेव्हा 
माझ्या वेदना कळतील 

    पाकळीवरच हे हसू 
    नेहमीच फुलत राहील 
    आणि झडवणारी पानगळ सुद्धा 
    माझ्या सुवासाकडे कौतुकाने पाहील

तुझ्या श्वासातला एक अखंड श्वास बनवून


आज जे काही मनाच्या देव्हार्‍यात नंदादीपाइतक पवित्र आणि अखंड प्रेम तेवतय ते फक्त तुझ्यासाठी .
रात्रभर चांदण्यांची उधळण फक्त तुझ्यासाठी ...
रात्रीच्या रजईत लपवलेला चंद्राचा हिरा फक्त तुझ्यासाठी ...
खरच ... फक्त तुझ्यासाठी 


पुढे काही लिहिण्याआधी तुझी क्षमा मागते . क्षमस्व ... 
     कारण अगदी दोन  क्षणांसाठी  का होईना पण मला तुझ्या सौ चा हेवा वाटला . खरच , फार नशीब घेऊन जन्माला घातलं आहे देवाने तिला . अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या  लोकांनाच देव हे भाग्य देतो . ते तुझ्या सौ च्या पदरी देवाने न मागता स्वखुशीने घातलेलं दान ...
पाहिलं असशीलच तू
आभाळाइतका  प्रेम करणारा तू ... अजून काय हवंय ?

खर सांगू ? जेव्हा तू म्हणालास न .. 
" प्रेमान जवळ घेणार कुणी असेल
              तर जास्तच जवळ याव वाटत "
अगदी त्या क्षणी , तुझी सौ तुझ्या डोळ्यात अखंड दिसत होती . हात पसरून उभी ...

                                     निरपेक्ष प्रेम बघून 
                                     इतका नाजूक हसलास 
                                     खर सांग तेव्हा 
                                     तुझ्याजवळ तू किती उरलास ?

    आणि अगदी असच झाल ... सगळीच्या सगळी सौ तुझ्याकडे अगदी वाऱ्यासारखी धावत आली . तू तुझ्या हक्काच माणूस जाताना स्वतः बरोबर घेऊन गेलास आणि रात्रभर कस्तुरीमृगाप्रमाणे आपल्याजवळील कस्तुरी बाहेर शोधत झोपी गेलास 

    अरे .... एकदा डोळे बंद कर आणि अगदी मनापासून तिला साद घाल . 
बघ ... लगेच आवाज देईल ती ."ओ ..."
कुठून आला रे हा आवाज ?
        बाहेरून ???   नाही ...
        शेजारून ???  नाही ...
हा आवाज तुझ्या आतून आला . इतक्या अलगदपणे ती तुझ्यात एकरूप झाली कि कधी तुला कळालाही नाही.
    आई जस आपल्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवते . आपल्याच शरीराचा एक भाग बनवून . तसच काहीस ..त्यापेक्षाही जास्त .तूला तुझी सौ सांभाळायची आहे . 
    आयुष्यभर ... तुझ्या श्वासातला एक अखंड श्वास बनवून 
रात्रीच्या कुशीत शिरून पाहिलेल्या गोड स्वप्नांना जोपर्यंत पहाटेची कोवळी पालवी फुटेल तोपर्यंत ही गुलाबाची कळी तुला अशीच सांभाळायची आहे ......
तळहातावर घरट बांधून ....
बांधशील ना ....    

Facebook Comments


तो म्हणजे ...

तो म्हणजे एक थेंब 
अळवाच्या पानावर विसावणारा 
काही क्षण चमकून ओघळून जाणारा 
दुसऱ्याच क्षणी ... नवीन थेंबाशी एकरूप होणारा 

तो म्हणजे निरभ्र आभाळ 
इंद्रधनुच्या कमानीला आपलं घर देणारा 
विजेच्या समईने त्याच्या देव्हार्यातील नंदादीप लावणारा 
कोटी सूर्य किरणांनी ... दिवाळी साजरी करणारा

तो म्हणजे उनाड वारा 
लाजाळूच्या पानांशी लपंडाव खेळणार 
अगदी नकळत ... ओठांना स्पर्शून जाणारा 
साऱ्या रानभर पसरूनही कधीही न दिसणारा  

तो म्हणजे एक कविता 
रात्रीच्या एकांताला  सोबत म्हणून लिहिलेली 
मनातल्या स्वप्नाला कागदावर का होईना ... खर करणारी 
पानभर पसरूनही मनात थोडी उरणारी  


  

कसा ठेवू विश्वास ??


चेहऱ्यावरचे रंग.. कपडे बदलावे तसे बदललेस 
दोघांसाठी आवाजाचे चढ-उतारही वेगळे दिलेस 
फरक तर तुला कधीच नाही पडला माझ्या असण्या - नसण्याचा 
मग आता अट्टाहास कशाला मागच सगळ पुसण्याचा ?
हक्क गाजवायला ... तुझ्या मालकीच होत का धन ?
हात नाही कापला ... ओरबडताना माझ मन ?
कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??
परत अस घडणारच नाही 
वाळूचच घर ते ...कशावरून मोडणार नाही



देव सुद्धा धजावत नाही बांधल्या गाठी सोडायला 
माझच घर मिळाव तुला राज्य करण्यासाठी फोडायला ?
आपल्या - परक्या नात्यातही  बराच असतो कि रे  बाप्पा भेद
बांधलेल्या धाग्यातही निघू शकतो कधी कधी असा छेद
चिखल उडवायला .... तुझ्या दाराची होती का ही तुळस ?
माझच अंगण सारवायला निघालीस ... माझ्या उंबऱ्याचा मोडून पळस   
कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??
माझ घर कधी उकरणार नाही 
नंदादीप लावणाराच  ... माझा देव्हारा पोखरणार नाही











ओठात एक न पोटात एक .. कस जमत वागायला 
कुठल म्हणून लक्षात ठेवायचं ... चुकीची माफी मागायला   
वाट दुसरी दिलीये ठरवून  देवाने सगळ्यांना चालायला 
मी म्हणते .. का याव ... माझ्या गुलाबात वाटा घालायला ?
आलं होत लक्षात ... मग सावरता नाही आलं स्वतःला वेळीच ?
का टाहो फोडणार नाही ... माझ रक्तबंबाळ काळीज ?
कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??
खपली परत उघडी पडणार नाही 
पाठीवरचा मायेचा हातच छातीत अस्त्र सोडणार नाही 


कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??

Forgiving someone is easy but being able to trust them again is totally different thing. :)




Please hate me


आपले मार्ग कधीच तसे एक न्हवते            
धावत होते ते एकमेकांना समांतर 
देवाने आखून दिलेल्या पिवळ्या रंगाचे दुभाजक 
तेवढेच काय ते आपल्या मधले अंतर 

घालावी तुझी समजूत अस 
आता खरच काही नाही उरल 
डोळ्यातलं तुझ्या प्रश्नाचं आभाळ 
बस ... माझ्या एका शब्दात भरल
 
वाटल ...चण्याची पुडी संपवत 
सहज तासभर तरी जाईल निघून  
५ मिनिटात आवरत घेतलस 
ते ही समोरच्या घड्याळात बघून 
 
 हाताना उगीचच कंप सुटलेला 
आणि आवाजही शेवटच्या ओढीने दबलेला 
" Please hate me " इतकच काय ते स्पष्ट 
"कस सांगू ?" विचार करत वेळ उगीचच लांबलेला 

शेवटच्या वळणावरचा नजरेचा एक कटाक्ष 
आज नको इतका बोचत होता 
सुटायचीच होती वीण म्हणून कि काय
इतका झाला होता गुंता 

काय म्हणून पावसात आलीस भिजत लगबगीने
शेवटचा निरोपच तर होता घ्यायचा
"न सुटलेलं कोड आहेस तू ...निघते मी " म्हणालीस 
अन .... फक्त माझा जीवच काय तो राहीला होता जायचा 

शायद ....

आज मूड एकदम शायरीचा आहे  :)

उनके सिवा कोई मेरे जजबात में नहीं 
आंखोमे वो नमी  है जो बरसात में नहीं 
पानेकी उन्हें कोशिश बहोत कियी 
शायद .... 
वो लकीर ही हमारे हाथ में नहीं 

तड़पता है दिल कोई दवा भी नहीं 
बस ... हमारे लिए छोटीसी दुआ भी नहीं 
जिंदगी के बदले खुदा से माँगा है उसे 
शायद ... 
इतनी बड़ी ताकद हमारे प्यार में नहीं 

दूर जाना चाहा पर मंजर ही नहीं 
साथ चलने के लिए मंजिल एक नहीं 
हर मोडपर करते है इंतजार उनका 
शायद ....
उनको पाना हमारे तकदीर में नहीं 

बिना उनके बिताया एक पल भी नहीं 
भूल जाते मगर दूसरा दिल भी नहीं 
धड़कन थमी है आज उनके बगैर 
शायद ....
हमारे लिए खिलाहुआ वो फुल ही नहीं 

बाकि की जिंदगी हमें रास नहीं
कैसे जियेंगे हम जब वो पास नहीं 
सांसेतक तोडनेको तैयार बैठे है 
शायद ....
मोहोब्बत हमारी कुछ खास नहीं 

आजसे हम तो जी ही नहीं पाएंगे 
उनके तारीफ के नगमे भी नहीं गायेंगे 
क्या कमी रह गयी हमारी दुआ में 
खुदासे इसका जवाब लेके जाएँगे 

जिन्दगीमे मोहोब्बत एक ही बार होती है 
रुकीहुई सांसभी उनके सुर में गाती है
हाथोंकी लकीर जब खो जाती है 
ऐसे लगता है जैसे ...
धड़कन की आवाज भी उनका नाम लेती है 

सच्चे प्यार की हार नहीं होती 
ऐसी खुदाई बारबार नहीं होती 
जब भी खुदा से मुराद मंगाते है ... लगता है 
शायद ....
मांगनेमें हमसे कभी देर नहीं होती 

आजके बाद वो साथ नहीं होंगे 
हमको संभालनेवाले वो हाथ नहीं होंगे 
हमने तो कोई बेवफाई नहीं कियी 
पर शायद ....
वफाके फसलोंके यहाँ खेत नहीं होते 

बस ...इतनिसी दुआ है 
हमारी यदोंसे 
उनको आजाद कर दे
किसी दुसरे का ही सही ,
मगर उन्हें सच्चा प्यार दे दे 
उनके दामन में हर ख़ुशी भर दे 
चाहे तो हमारी एक ख़ुशी 
उनके किये कम कर दे 

Propose Day

आज ८ फेब्रुवारी .....
propose day
त्या निमित्ताने काहीतरी सुचत जाईल तसच्या तसं उतरवलय इथे :)
आवडेल अशी आशा  



तो आणि ती दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखत होते .. तशी  त्यांनी ४ वर्ष एकत्र काढली होती इंजिनीयरिंगची. एकदम गळेपडू किंवा कुणीही येवून उगीचच चर्चा  करून जावी अशी काही मैत्री न्हवतीच त्यांची. 

दोघांना एकत्र आणण्याचं काम केल ते त्यांच्या रिझल्टनी . 
" पुस्तकी किडा " कॅटेगरीत मोडणारे  होते ते ... अगदीच आदराने बोलायचं झाल तर खरच ... दोघेही University Topper :)  सेमिनार्स आणि प्रोजेक्ट ची डिस्कशन करत करत कधी एकमेकांत गुंतले गेले कळलही नाही दोघांना. 

ती त्याला नेहमीच म्हणायची " कसा रे तू असा . कुठलीच मुलगी नाही आवडत तुला . अशाने बायको कशी शोधणार ? कसा होणार आमच्या साहेबांच देव जाने " .
तिच्या या कमेंटवर त्याच मान हालवत उत्तर " मिळेल हो मिळेल ... सापडली कि पहिले तुलाच कळेल :) " हि आणि अशी बरीच जुळवा - जुळवीची उत्तर .. पण त्याच्या " तिला " कधी साधी शंका हि नाही आली कि हे सगळ तो आपल्याबद्दल बोलतोय . ती आपली सेमिनार्स , पझल्स आणि टक्केवारीच्या पुढे कधी गेलीच नाही   

आणि तो दिवस उजाडला

त्याने तिला कॉफीसाठी विचारलं ... कधी न्हवे ते madam  स्वतःच practicle चुकवून कॉफी घ्यायला जायला तयार झाल्या. तिने कॉफी साठी हो म्हटल्यापासून याच्या काळजाची धड - धड  मात्र वाढतच चालली होती . AC त बसून घाम सुटायला लागला होता .
" काय म्हणेल ती कोण जाने ? कशी react होईल? हो म्हणेल ? कि काहीही न बोलताच उठून निघून जाईल ? काहीही झाल तरी मला माझी इतकी चांगली मैत्रीण हरवायची नाही . बाकी तिने काहीही म्हणावं बस..... आजपासून बोलू नको माझ्याशी अस काही सांगायला नको . आई शप्पथ .... इतक टेन्शन कंपनीच्या इंटरव्ह्यू  वेळीही न्हवत आल मला "

तो विचारच करत होता ... तितक्यात ती आली . नेहमीप्रमाणे  अगदी Good Girl सारखी येउन त्याच्या समोर बसली .

काय घेणार रे तू ? मी तर नेहमीच sandwich .. तुला काही हवा असेल वेगळ तर सांग . त्यानंही कोरडा पडलेला घसा ओला करायला ज्यूस मागवला 

पहिले १० -१५ मिनिटे तर त्याला काहीच बोलायला सुचेना ...पण काहीतरी बोलावच लागेल म्हणून त्याने शेअर मार्केटच काहीतरी सुरु केल ... जे तिच्या डोक्यात काही केल्या शिरेना . सगळे बाउन्सर .... ती नुसतीच हो.....हो.....करत होती 

शेवटी धाडस करून त्याने विषयाला हात घातला 

तो : मी काहीतरी सांगायला बोलावलं आहे तुला इथे 

ती : (आता ह्याने कोणतातरी नवीन पझल शोधून आणाल असणार. डोक्याला नवीन खुराक) काय झाल रे ? काही प्रोब्लेम झालाय का ? सेमिनार ला जायचं का ? मी तयार आहे तुझ्या ग्रुप मध्ये यायला .
तो : ( काय सांगणार आता हिला ? प्रोब्लेम तूच आहेस . म्हणून तर बोलावलंय इथे तुला . ए UT आता  बाहेर ये अभ्यासातून . माझा निकाल लागायची वेळ आलीये ग ...  ) मला एक मुलगी आवडते .

ती (आता ही कोण नवीन ...मला विचारलं असत याने ... तर एका मिनिटात मी हो म्हटलं असत )
काय सांगतोस .... जगातलं आठवे आश्चर्य म्हणावं लागेल. :) आणि हो रे ..मुलगी आवडायला तू मुलींकडे पाहायला कधीपासून लागलास ? गेले ४ वर्ष मी इतक्या मुली दाखवल्या तुला ..एकीकडेही वळून पहावास वाटल नाही तुला ... आणि अचानक  'मला एक मुलगी आवडते ?'  .
हे पहा .. तू माझी चेष्टा करायची ठरवली असशील तर तस सांग . 

तो : अग बाई ...बोलू का मी ?

ती : बोल बोल ... आज तूच बोल ..मी ऐकणार नुसत . कळू तरी दे मला अशी कोणती अप्सरा आवडली तुला . Mr . मजनु .... नाव कळेल का आम्हाला तुमच्या लैलाच ?

(तो शांतच ...... काय आणि कसा सांगाव त्याला कळेना )

ती : अरे बोल की ..... उखाणे आठवतो आहेस कि काय बाबा आता ? 

तो : तू ... हो तूच 

त्यानंतर सगळीकडेच स्मशान शांतता . तो तीच्या उत्तराची वाट पाहत होता.आणि ती ...ती मात्र एकदमच निश्चल ...काय ती पापण्यांची हालचाल जाणवत होती तिच्या फक्त .
एका सुंदर जलाशयात एक सुवासिक फुल वरून पडाव . अगदी अनपेक्षितपणे . २-३ तरंग उठावेत जलाशयाच्या पृष्ठभागावर.. आणि फुल तसच पाण्यात विरून जाव .... तरंगासहित.... पुन्हा जलाशय शांत ..निश्चल ..

तसच काहीस झाल तीच . उपरवाला देता है तो छपर फाड के देता है ..म्हणतात ते काही खोट नाही . जे स्वप्न कधी तिने झोपेतही नाही पाहिलं ते आज जागेपणी तिच्यासमोर उभ होत ..तिच्या हो ..ची वाट पाहत .
त्याच्या नजरेला नजर मिळवायची तर हिम्मत हि होईना तिची . कंप सुटलेल्या हातातून sandwich आपोआप प्लेट मध्ये पडू लागल. त्याने ज्यूस चा ग्लास पुढे केला . बिचारीच तो हि ओठापर्यंत पोहोचेना . 

ती : (काय सांगू याला ? कस सांगू ? आजपर्यंत फक्त तूच मला आवडलास . आणि त्याने खरच माझी मस्करी केली असेल तर .. विनाकारण हसत बसेल पुढे आठवडाभर... 
आणि खर असेल तर ?  तरीच हा कुठल्या मुलीकडे वळून पाहायचा नाही . )

तो : मी वाट पाहतोय उत्तराची तुझ्या . जे वाटेल ते मनापासून सांग .

२ दिवस भाषणाची तयारी करावी आणि ऐनवेळी व्यासपीठावर काहीच आठवू नये अशी काहीशी अवस्था होती तिची . कस सांगाव हो म्हणून ?

कसतरी धाडस करून तिने आपली नजर वर उचली .. त्याची नजर तिच्यावर केव्हापासून खिळली होती . काय बोलाव सुचेना ...बस ...त्याच्याकडे पाहून तिने एक सुंदरस स्मितहास्य केल . आणि तिच्या गालावरच्या खळीत त्याच सगळ टेन्शन विरघळल . एक मोठ्ठा उसासा सोडला त्याने आभाळाकडे पाहत . जग जिंकल्याचा आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर आज . आणि तिच्या ... तिला तर तीच जगच  मिळाल होत .
देवाने  न मागता तिच्या पदरात टाकलेलं हे दान :)

नांदा सौख्य भरे ... :)

View Facebook Comments

मनातल घर

जरास मोकळ ढाकळ 
अस एक ' मनातल घर ' असावं 
बाहेरच्या बाजूला 
छानशी बाग असावी
बागेतल्या हिरवळीतून 
घरात जाणारी पायवाट असावी 
     दिवाणखान्यात आल कि 
     घराचा धर्म दिसावा , संस्कृती दिसावी 
देवघरातल्या देवापुढे 
मंद तेवणारी समई दिसावी 
     इथल्या जेवण खोलीत 
     अन्नपूर्णेचा वावर असावा 
शेजघरातल्या खिडकीमध्ये 
तुळस , फुलांचा गंध असावा 
      रम्य अशा सायंकाळी 
      पक्षांच्या किलबिलाटान
      आभाळ भरून जाव 
रात्रीच्या निळाईत 
अख्ख घर 
चांदण्यांनी न्हावून जाव 
अन 
उगवतीच्या सूर्यकिरणा च्या 
प्रकाशान उजळून निघावं 
जरास ....
जरास मोकळ ढाकळ 
अस एक ' मनातल घर ' असावं 

~ Unknown

सावन सरताना


घरट्यातल्या पाखरांना 
क्षितिजापल्याड फिरताना 
इवल्या इवल्या नजरेन 
आभाळ भरताना 
निरभ्र मनाने घिरट्या घालताना 
पाहील होत मी सावन सरताना 

तळपणारा भास्कर 
जलधारात शिरताना 
इंद्रधनूची कमान 
रेखीवपणे कोरताना 
मेघाराजासमोर आनंदाने हरताना 
पाहील होत मी सावन सरताना 

बरसणाऱ्या धारांना 
काळ्या मातीत मुरताना 
जीवापाड काळेपणावर
प्रेम करताना 
थेंब न थेंब मोती होवून पेरताना 
पाहील होत मी सावन सरताना 

वाहणाऱ्या वार्याला 
गारवा चोरताना 
सुगंधासाठी राताराणीभोवती 
फेऱ्या मारताना 
रिमझिमताना भिरभिरताना 
पाहील होत मी सावन सरताना 

हळव्या मनाला 
डोळे भरताना 
कुणाच्या तरी आठवणीत 
तिला घेरताना 
मुक्यानेच आज त्याला साद घालताना 
पाहील होत मी सावन सरताना  

९ वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला



तुला आठवत असेलच ...
मी नाही विसरू शकले तर तू कसा विसरशील ? 
माहित आहे मला ... विसरलो असा दाखवण्याचा एक निष्फळ प्रयत्न
परत कधीही तो दिवस आठवायचा नाही असा एक अलिखित करार झाला होता न आपल्यात ... म्हणून हे सार 
तुझही आणि माझंही ... ओठ ताणवून हसण :)

आज बरोबर ९ वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला ..
आठवत असेलच ....
तुला आणि मला मनावर दगड ठेवूनच हा निर्णय घ्यावा लागला ...
की कदचीत आपल मनच दगड बनल होत त्यावेळी .. कोण जाने
वेलीवर उमलू पाहणारा अंकुर आपण आपल्या career च्या नावाखाली तोडून टाकला 

हे सगळ अगदीच lightly घ्यायचा प्रयत्न केला दोघांनीही 
डोळ्यात येऊ पाहणाऱ्या पाण्याला "इतक्या लवकर नको हे सगळ . अजून थोड एन्जोय करू " च्या  दमदाटीने पापण्यांच्या काठावरून आत परत पाठवलं 
पण "इतक्या लवकर नको " चा "लवकर" कधी येणारच नाही अस एका क्षणासाठीही नाही वाटल तेव्हा 
विनासायास मिळालेलं हरवून बसल्यावर ...बर्याच पायऱ्या झिजवल्या  
डॉक्टरच्या ही आणि देवाच्याही ..
कुणालाच गुण नाही आला ...
न डॉक्टर च्या औषधाना आणि ना त्या भंडाऱ्याला   

career अगदी उत्तम आहे आता दोघांचही 
गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या .. onsite ... मस्त AC बंगला 
प्रत्येक appraisal ला प्रमोशन ..आणि hike ही 
पण सगळीच सुखं पैशाने विकत घेता येत नाहीत ..
हे ९ वर्षापूर्वी कळल असत तर फार बर झाल असत :(

आपण जे दुसर्याला देऊ तेच आपल्याला परत मिळत असा म्हणायची माझी आजी 
आपलाही असच झाल असेल का रे ?
नन्नाचा पाढा सुरु आपण केला .. आणि त्या वरच्याने तो संपवला 
नकाराची परतफेड नाकारानेच झाली म्हणायची 

जगातली कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो आम्ही 
बस .... एक पाळणा घ्यायची ऐपत नाही आमची ... 
मिळकत कमी पडली यासाठी 
उसनवारी करून काहीही करू हो ... पण "आपल्या " पासून वंचितच  

तेव्हा वेळ न्हवता 
आज वय नाही ....
तेव्हा इतर गोष्टी महत्वाच्या वाटायच्या 
आज महत्वाची गोष्टच नाही आमच्याकडे 

एकमेकांची नजर चुकवून आज ९ वर्षानीही ...
दोघेही गणपतीच्या पायावर डोक टेकवून आलो 
मान्य केल ... कितीही उंच गेल तरी .. तुझ्या पायरीवर डोक टेकवाव लागेल 
तुझ्या समोर मान खाली घालूनच उभ राहावं लागेल 

NO १ बॉस , गुड टीम लीडर  पासून अगदी CEO  च्या दोन पायऱ्या खाली आहोत दोघेही 
बस ....
आई बाबा म्हणून कुणीही हाक नाही मारणार आपल्याला ..