९ वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला



तुला आठवत असेलच ...
मी नाही विसरू शकले तर तू कसा विसरशील ? 
माहित आहे मला ... विसरलो असा दाखवण्याचा एक निष्फळ प्रयत्न
परत कधीही तो दिवस आठवायचा नाही असा एक अलिखित करार झाला होता न आपल्यात ... म्हणून हे सार 
तुझही आणि माझंही ... ओठ ताणवून हसण :)

आज बरोबर ९ वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला ..
आठवत असेलच ....
तुला आणि मला मनावर दगड ठेवूनच हा निर्णय घ्यावा लागला ...
की कदचीत आपल मनच दगड बनल होत त्यावेळी .. कोण जाने
वेलीवर उमलू पाहणारा अंकुर आपण आपल्या career च्या नावाखाली तोडून टाकला 

हे सगळ अगदीच lightly घ्यायचा प्रयत्न केला दोघांनीही 
डोळ्यात येऊ पाहणाऱ्या पाण्याला "इतक्या लवकर नको हे सगळ . अजून थोड एन्जोय करू " च्या  दमदाटीने पापण्यांच्या काठावरून आत परत पाठवलं 
पण "इतक्या लवकर नको " चा "लवकर" कधी येणारच नाही अस एका क्षणासाठीही नाही वाटल तेव्हा 
विनासायास मिळालेलं हरवून बसल्यावर ...बर्याच पायऱ्या झिजवल्या  
डॉक्टरच्या ही आणि देवाच्याही ..
कुणालाच गुण नाही आला ...
न डॉक्टर च्या औषधाना आणि ना त्या भंडाऱ्याला   

career अगदी उत्तम आहे आता दोघांचही 
गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या .. onsite ... मस्त AC बंगला 
प्रत्येक appraisal ला प्रमोशन ..आणि hike ही 
पण सगळीच सुखं पैशाने विकत घेता येत नाहीत ..
हे ९ वर्षापूर्वी कळल असत तर फार बर झाल असत :(

आपण जे दुसर्याला देऊ तेच आपल्याला परत मिळत असा म्हणायची माझी आजी 
आपलाही असच झाल असेल का रे ?
नन्नाचा पाढा सुरु आपण केला .. आणि त्या वरच्याने तो संपवला 
नकाराची परतफेड नाकारानेच झाली म्हणायची 

जगातली कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो आम्ही 
बस .... एक पाळणा घ्यायची ऐपत नाही आमची ... 
मिळकत कमी पडली यासाठी 
उसनवारी करून काहीही करू हो ... पण "आपल्या " पासून वंचितच  

तेव्हा वेळ न्हवता 
आज वय नाही ....
तेव्हा इतर गोष्टी महत्वाच्या वाटायच्या 
आज महत्वाची गोष्टच नाही आमच्याकडे 

एकमेकांची नजर चुकवून आज ९ वर्षानीही ...
दोघेही गणपतीच्या पायावर डोक टेकवून आलो 
मान्य केल ... कितीही उंच गेल तरी .. तुझ्या पायरीवर डोक टेकवाव लागेल 
तुझ्या समोर मान खाली घालूनच उभ राहावं लागेल 

NO १ बॉस , गुड टीम लीडर  पासून अगदी CEO  च्या दोन पायऱ्या खाली आहोत दोघेही 
बस ....
आई बाबा म्हणून कुणीही हाक नाही मारणार आपल्याला ..

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)