ms paint मध्ये अस ठेवलंय काय ?
काळ्या पाटीची सर दुसऱ्या कशालाच नाय
की - बोर्ड म्हणजे अहो नुसता बटनांचा मारा
त्याहून माझा अ - आ - इ - ई चा तक्ताच बरा
इंग्लिश म्युझिक हवंय कशाला ?
बस …. आईने पुन्हा एकदा शिवाजीचा पाळणा गावा
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा
३ बी एच के flat मध्ये असं किती लोळायचंय ?
खरतर मला दिवाळी किल्ल्याचा मातीत खेळायचय
स्काय डायव्हिंग मध्ये कसल आलय राव थ्रील
घसरगुंडीवरून खाली यायलाच लागत जास्त स्किल
अदिदास चे महागडे शूज नकोय रे मला
छोटासा लाईट चा बुटच हवा
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा
euro च्या rate शी माझं न देण न घेण
euro च्या rate शी माझं न देण न घेण
दिवसभराच्या खाऊसाठी पुरत मला १ रुपयाच नाण
रेनकोट आणि स्वेटर चा थर कशाला ?
सूर … सू …. र आवाजाचा गारेगार शेकतो की घशाला
इंडिया - जर्मनी - इटली च्या कुणी सांगितल्यात वाऱ्या ?
बरा वाटतो चोर पोलिस खेळणारा गल्लीतला पोरांचा थवा
असाच राहू दे मला … लहानपण दे गा देवा
विटी दांडू खेळताना होती फोडली आजी ची काच
भाड्याची सायकल दिवसभर पळवली हातावर टेकवून रुपये ५ ( दर वाढलेत आता …. )
स्विमिंग पूलच्या पाण्याला रंकाळ्याची ऊब कुठली ?
फुटबॉल पेक्षा मज्जा येते उडवायला डबा एक्स्प्रेस ची बाटली :P
व्हिडीओ गेम पेक्षा गिफ्ट आणा मला सापशिडीचा बोर्ड नवा


:a
:b
:c
:d
:e
:f
:g
:h
:i
:j
:k
:l
:m
:n
:o
:p
:q
:r
:s
:t
Ek number :)
ReplyDeleteThank you
Delete