ती न्हवतीच हरवली

माझ्या २ मैत्रिणींच गैरसमजुतीचे दिवस काळ संपले …
छान वाटल ऐकून …
त्या दोघींसाठी ……


ती न्हवतीच हरवली , उगाच मलाच वाटायचं
कळायचंच नाही तिला कधी अन कुठे गाठायचं
सैरभैर मनाला जाणवायची तिची एक मोठी पोकळी
कित्तीतरी दिवसात भेटच झाली नाही आमची मोकळी

कसे होते ते निशिगंधाच्या सुवासाचे बेधुंद दिवस
आणि आत्ता नात्याला लागलेली ही कुठली अवस ?
आसू असो व हसू ,क्षण अन क्षण घेतला वाटून
आज पाहतेय …. रस्ता चुकलेली वाट वळली होती कुठून ?

अचानक ती लुप्त झाली पहाटेच्या ताऱ्यासारखी
अन माझ्या तिच्या दुराव्याची बातमी गावभर पसरली वाऱ्यासारखी
एकदा वाटलं विचारावं मैत्रीच्या अधिकाराने तिला कारण
पण नको वाटायचं नात्याचं ते चव्हाट्यावरचं मरण

काल हिम्मत करून एकदाचा घेतला हात हाती
अन जाणवली आठवणीत भिजलेली तिची ओलीचिंब माती
 "इतके दिवस लागले तुला २ पावलं चालायला ?"
उत्तरं कमी पडत होती तिच्या ह्या प्रश्नांना पांघरून घालायला

नाती हरवत नाहीत , माणसं तर अजिबातच नाही
हरवतात ते सोनेरी नात्याचे कालवंडलेले दिवस काही
ऊरभरून श्वास घेऊन आज रिकाम रिकाम वाटतंय
बोलण्याने प्रश्न सुटतात …… पुन्हा एकदा पटतंय :)

कित्ती प्रसन्न आणि गोड वाटतंय हे आज सगळ
पुन्हा एकदा जुळून आलंय झालेलं कधीतरी वेगळ
देवबाप्पा …… ओंजळीतील सगळ लुटून तुझ्या पायावर वाहू
माणसांची कमी तेवढी परत नको पडू देऊ

4 comments:

Thank you for your comment :)