💕Goodbye Tension. Hello Pension 💕

ब्लॉग च्या नावावरूनच कल्पना आली असेल . पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे ते . 

येस.... अगदी बरोबर. टेंशन ला बाय आणि पेंशन ला हाय करण्याचा अमृत मुहूर्त आमच्या घरी आज साजरा झाला
 .  १९८१ पासूनच्या जबाबदारीतून बाबा आज सेवानिवृत्त झाले. 

अनिल गजानन जाधव , स्टेट बँक ऑफ इंडिया

शून्यातून इतकं सुंदर विश्व निर्माण करणाऱ्या या तपस्वी ला माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏



खरं तर खूपच कमी वय असताना आलेली म्हणा किंवा स्वतःहून आनंदाने स्वीकारलेली म्हणा ..  पण बाबांनी ही जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे निभावली . स्वतःच शिक्षण पूर्ण करत सुरवातीला बाबा टायपिंग चे वर्ग घ्यायचे. त्या ठिकाणी बाबाचं होतो म्हणून शक्य झालं त्यांना हे सगळं. मला खरचं नसतं जमलं. 

मग मिळाला एक मोठ्ठा परिवार. स्टेट बँक ऑफ इंडिया. पहिले काही वर्ष श्रीरामपूर मग अब्दुल लाट, कोल्हापूर, मलकापूर .... आणि पुन्हा कोल्हापूर . बाबांचा हा सगळा प्रवास मी खूप जवळून पाहिला आहे. आपल्या पदाचा किंचितही गर्व न करता राहणी किती साधी असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबा. 

बॅंकेतून कितीही कंटाळून घरी आले तरी  मला बागेत घेऊन जाणारे बाबा ...
मार्केट यार्ड शाखेत असताना उत्तम टेबल टेनिस खेळणारे बाबा...
बँकेच्या वार्षिक स्नेहसंमेलन वेळी दणदणीत टाळ्या मिळवलेले एखादं फक्कड मराठी गाणे म्हणणारे बाबा ...
मित्रांमध्ये ever green personality म्हणून ओळख असणारे बाबा ...
केसांना मस्त वळण पाडून, लाटा लाटांची हेअर स्टाईल करणारे बाबा ...
आपलं काम सांभाळून नेहमी आईच्या सोबत राहणारे बाबा ..
बॅंकेतून सुट्टी घेऊन नातवंडा सोबत रमणारे बाबा ...

या आणि अशा बऱ्याच सुवर्ण आठवणी . 

मी ऑफिस मध्ये जायला लागल्यापासून खूप वेळा वाटलं, सांगावं बाबांना ... "आता घ्या निवृत्ती. खूप केलं आम्हा सर्वांसाठी. " पण बाबांना थांबा म्हणाण्या इतकी मी कधी मोठी झालेच नाही कदाचित. ☺️ हा माझा अधिकार नाही आणि ही माझी योग्यता ही नाही ..
आम्हा मुलांच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी , " मी आहे ना . नको काळजी करू " या बाबांच्या एका वाक्यावर आमचा वाकलेला पाठीचा कणा अजूनही ताठ होतो.

" ज्या संस्थेने आपल्याला इतकं मोठं केलं त्या संस्थेला सोडून जाताना वाईट वाटतं. " हे बाबांचं सेवा निवृत्तीचं वाक्य
मी समजू शकते या भावना पण तरीही ....
 नो ....  आता वाईट वगैरे वाटून घ्यायचं नाही . आता नुसतं एन्जॉय एन्जॉय 
खूप केलंय हो ... अगदी अभ्यंकर ची चपला झिजेतोवर कष्ट केले . 
आता तुम्ही बसायचं आणि आम्ही करायचं. 



नवीन भाषा शिकण्याची तुमची हौस पूर्ण कुठे झालीय अजुन. खूप ठिकाणं फिरायची राहिली आहेत . तुमच्या आवडीची जुनी गाणी निवांत बसून ऐकून कित्ती दिवस झाले असतील. आई सोबत फिरायला कधी पासून जायचं ? 
आता टेबल टेनिस ला तुमचा पार्टनर म्हणून जावई . लाटा लाटांची हेअर स्टाईल शिकायला नातू कधीचा उत्सुक आहे. 
नातीला आजोबांसोबत सायकल ची फेरी करायची आहे. 
आणि मला..... तुमच्या जवळ बसून भरपूर गप्पा मारायच्या आहेत.  
जबाबदारी मुळे सुटून गेलेले सगळे आनंदी क्षण परत जगायचे ☺️
सेवानिवृत्ती म्हणजे कोरा कागद.... तुमच्या आवडीचे रंग भरण्याची मुभा . 
सेवानिवृत्ती म्हणजे कोरा चेक..... कितीही मोठी रक्कम भरा .... तो नक्की वठणार☺️

आणि योगायोग म्हणजे निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी तुमचा वाढदिवस .... ६० वर्ष पूर्ण 
गणपती बाप्पा तुम्हाला निरोगी आरोग्य , आनंदी आयुष्य, चैतन्य, समाधान , भरभराट देवो . हीच माझी बाप्पाला प्रार्थना 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏

ज्या दोघांनी मला इतकं सुंदर आयुष्य दिलं त्यांचं आयुष्य याहून अधिक सुंदर आणि चैतन्यदायी कर. 








जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव



जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव

अमृता पेडणेकर

   जर्मनीतील लॉकडाऊन असं काहीसं नाव द्यावं वाटलं होतं या लेखासाठी. पण म्हटलं नको .... जर्मनी आणि लॉकडाऊन हे खरंतर विरूद्ध अर्थी शब्द वाटतात.

जर्मनी म्हटल्यावर स्वातंत्र्य, मोकळेपणा , निवांतपणा, निरभ्र आकाश , हिरवाई हेचं डोक्यात येत ना हो पहिले ... पण या जगात कुणालाही देशाला न सोडलेल कोरोनाचं वादळ इथेही येऊन थडकलच... त्यात आमचा जिल्हा  Bavaria जास्त बधित ... त्यामुळे पाहिला मान आम्हाला . लॉकडाऊनच्या बातमीने साता समुद्रापार राहणाऱ्या माझ्या आईची काळजी मात्र वाढवली. सेवा निवृत्तीला पोहोचलेल्या बाबांच्या डोळ्यात नातवंडांचे चेहरे तरळू लागले. कशाला जाऊन राहता इतक्या लांब? हा डोळ्यातून न लपणारा प्रश्न जमेल तितका लपवू पाहत होते दोघेही.

असो ... पण खूप काही शिकवलं बरं या कोरोनाने . त्याची यादीच करायची ठरवली तर पहिला नंबर लागतो माझ्या कॅनव्हास पेंटिंगचा. आयुष्यात कधीही हातात रंग घेईन असं वाटलं न्हवत मला . चित्रकला हा माझा प्रांत नाही हे अगदी अगतिकपणे मान्यच केलं होत जणू मी.  पण आज माझ्या घराच्या भिंती मी बनवलेल्या चित्रांनी सजल्या आहेत .... अनपेक्षित आनंद तो आणखी काय असावा ? कुठल्याही मॉल मधून खरेदी केलेल्या सजावटीला तुमच्या हौसेच मोल नाही. माझ्या चित्रकलेच्या सरांनी जर आज हे सगळं पाहिलं तर पहिला धपाटा घालतील पाठीत. " हे सगळं शाळेत काढायला काय झालं होतं तुला ?" असं म्हणत

जर्मनीने  विद्यार्थ्यांना घरी राहण्याची मुभा दिल्यामुळे माझी दोन्ही शाळकरी मुले घरी ... याचीच तर वाट पाहत होते मी कित्ती दिवस . मराठी संस्कार करण्याची हीचं खरी वेळ . चालून आलेली संधी वाया घालवले ती आई कसली ? त्यांना सूर्य नमस्कार शिकवले , गणपती स्तोत्र पठण करून घेतलं .चित्रकलेचे धडे, गणिताचा सराव, वक्तृत्व कला , बुद्धिबळ कौशल्य आणि बरंच काही … अस्खलित जर्मन भाषेत बोलणारी मराठमोळी मुलं संस्कृत ही तितक्याच लीलया पेलताना पाहून हेवा वाटतो या पिढीचा. गगनाला भिडणार सुख म्हणजे ... मुलं मराठी लिहायला शिकली. 

Bleiben zu Hause मुळे यजमान ही घरी . तुम्ही मला हल्ली वेळच नाही देत या समस्त बायको जातीवर या कोरोना ने काढलेला उपाय म्हणा हवं तर.  मग रोज नवीन पदार्थ . माझ्या रेसिपी च्या  YouTube channel साठी भरपूर रुचकर व्हिडिओ मिळाले. खादाडाच्या पंगतीतील आमचं कुटुंब अजुन धष्टपुष्ट होणार असं वाटतंय 😀 भाज्या आणि इतर सामानाच्या खरेदी साठीही बाहेर जाणं टाळत होतो आम्ही ... मग घराच्या गच्चीत उगवली कोवळी लुसलशीत कोथिंबीर आणि हिरवी गार मेथी... घरचा भाजीपाला ... आपलं काही तटत नाही ... अस्सल कोल्हापुरी बाणा 😎

शाळेत असताना गुरुजी शिकवायचे तेव्हा कधीही मन लावून प्राणायाम शिकले नाही. पण आता जीवाच्या भीतीने सकाळी न चुकता प्राणायाम करते. तुमच्या पासून काय लपवायचे. आज सगळच मान्य करायचं ठरवलं. 

कित्तीतरी दिवसांची अपूर्ण इच्छा... महाभारत पाहणे... ती ही पुर्ण करून घेतली . आता जर्मनी मध्ये राहणाऱ्या माझ्या मुलांनाही भीष्म पितामह कोण ? कर्णानेही पांडव बंधुंशी का युद्ध केलं ? ह्या सर्वांची उत्तर माहीत आहेत. आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते आणि त्याचं प्रेम कधीही कमी होत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले.

"आपला भारत देश खरंच खूप छान आहे ग आई " हे वाक्य जेव्हा ८ वर्षाच्या मुलाच्या तोंडून ऐकलं तेव्हा वाटलं कोरोना अशा मागे पडलेल्या दिव्यांची आठवण करून देण्यासाठी तरी नसेल आला ? मोदी आजोबांचं भाषण न चुकता ऐकलं पिल्लानी. आपल्या मदत करणाऱ्या भारतीय योध्यांसाठी गच्चीत उभे राहून इथूनच टाळ्या वाजवल्या, दिवे लावले. याचा एक व्हिडिओ ही मी ट्विटर ला पोस्ट केला होता. कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या माझ्या वडिलांचा उर अभिमानाने भरून आला हे पाहताना. 

मला सांगा ... सुख म्हणजे अजुन नक्की काय ? हेचं ... आजोबांना नातवाचा अभिमान वाटावा. हे वर्तुळ पुर्ण करण्यात मी यशस्वी झाले .आणि मला मदत केली या Corona  लॉकडाऊनने. Corona च्या भीतीने किंवा काळजीपोटी म्हणा ... नातेवाईक, मित्र परिवार सर्वांना फोन करून झाले ... नात्यातील लांबत जाणार अंतर या लॉकडाऊन मुळे नक्कीच कमी झालं . आपण एकमेकांच्या अजुन जवळ आलो .

घरी बंदिस्त असण्याच्या काळात एक सुंदर विरंगुळा म्हणजे आमचे शेजारी . दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास न चुकता तो मुलगा रोज खूप छान बासरी वाजवायचा. आम्ही सगळे गच्चीत बसून मंत्रमुग्ध होऊन ऐकायचो. त्याची बासरी वाजवून झाली की सगळे आपापल्या घरातून टाळ्या वाजवत असू. आभार प्रदर्शनाचा हा एकच पर्याय समोर दिसत होता तेव्हा. जितका होता होईल तितका साकारार्थी राहण्याचा चाललेला एक निष्फळ प्रयत्न म्हणा हवं तर आपला. पण अशाच छोट्या छोट्या गोष्टी बळ देत राहिल्या. 

लॉकडाऊन थोडं शिथिल झाल्यावर थोडे पाय मोकळे करावे म्हणून बाहेर पडलो आम्ही सगळे. इतके दिवस सगळे घरी बंधिस्त होते . नियम हे फक्त काटेकोर पाळण्यासाठीच असतात हे जर्मन लोकांकडून नक्की शिकावं असं. त्या दिवशी  रस्त्यात एक ओळखीचे जर्मन कुटुंब भेटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भारतीय पद्धतीने हात जोडून नमस्कार केला आम्हाला. दोघांत ठराविक अंतर पाळण्यासाठी , corona ला हरवण्यासाठी जे जग आत्ता शिकते आहे , ते आपण सर्वांना जन्मापासून देणगी म्हणून मिळालं आहे. जर्मनी मधे वास्तव्यास असताना भारतीय असल्याचा आज पुन्हा एकदा अभिमान वाटला. 

बाहेरून फिरून आल्यावर माझी आजी पायावर पाणी घेतल्याशिवाय घरी घेत न्हवती आम्हाला. आज सगळं जग ओरडून सांगत आहे …बाबांनो, या सवयी लावून घ्या. पहा, खरंच प्रगत आहोत आपण. 

Corona च वादळ काय आज ना उद्या जाणारच .... पण जाता जाता खूप गोष्टी शिकवत आहे.  उन्हाळा सुरू झाला की सहली करणारे जर्मन रहिवासी घरी थांबले आहेत या वर्षी ... या वादळाने आपल्याला गरज आणि चैनी यातील रेषा ठळक करून दिली. कुटुंबासाठी दिलेला वेळ कितीतरी पटीने आनंद उत्पन्न करतो , हे आपण विसरलेले सत्य ओंजळीत परत आणून ठेवलं . 

आता आपलं कर्तव्य हेचं ... या ओंजळी मधील आनंदाला पुन्हा सुटू न देणे. हा आनंद जमेल तितका ओंजळीत भरून घ्या. ठणका मारणारी जखम भरून आली की उठलेल्या व्रणचा अभिमान वाटतो कधी कधी. Corona ही अशीच जखम आहे .  आपण यातून सही सलामत बाहेर पडलो .. कसे याचे किस्से पुढच्या पिढीला आपण अभिमानाने सांगू हे मात्र नक्की. 


PASSING MARKS ... Only 35 out of 100

Actually I wrote same blog in Marathi language. But one of my non Marathi friend was eager to know what I have written there . I tried to write same in English . 
Thanks to her . 
Thanks Akhila for asking me English translated version . 😊


When I looked at my acrylic canvas painting , first words shined in my head were 
 PASSING MARKS ... Only 35 out of 100  

 So I decided to give same name to my this blog writing. 



⛅⛅ SUNRISE ACRYLIC PAINTING ON CANVAS ⛅⛅


I was thinking to give this stylish, fancy name to my blog post.  But as said by many  "pearls seem to be heavier than the nose😀😆". I dropped that plan .

 What comes in mind at first glance is always perfect ... PASSING MARKS ... Only 35 out of 100😛

 The story of PASSING MARKS starts from my schooling . I was able to earn only 36 or 35 marks in drawing  and that too because school could not fail any student in  subject drawing . 😝  A girl who earned lots of points in other subjects got only PASSING MARKS in drawing ... always.

My drawing teacher tried hard but all vain.  If he will read this blog today, he will give me at least  40/100😉


 For the first time I wished to play with colors.  Now another wonder was ,  how such a different idea came to my mind ...  A pleasant surprise for me too 💖  

I never had any connection with paintings n all , but that day I wanted to buy a canvas ...

 I picked a canvas of smallest available size. Ask me why ? 
  
Shade of my fear was darker than my desire toward colors. That was a fight between brain and mind . My brain was telling me again and again , "Painting, drawing is not your liking.It is not your expertise .  Don't jump in it "

I my canvas size is 20×20cm.. ONLY

If you want to see a video , how I painted this canvas, click here. I shared it on YouTube.





Then I  turned my march towards color's cupboard.  I was totally unaware of what colors  canvas needs .....  I  had never painted  before...

Decided to have a smallest pack of acrylic with 8 shades. Just because , I didn't want to waste too much if nothing comes out perfect . 

 Out of which I used below 5 colors.

Generally artists use many types and many sized brushes for canvas. But for this shopping I accepted myself as uneducated . 😃 I used only one brush and that too basic . 





 Looking at this white canvas, I remembered my blank exam answer sheet. 
 In memory of the 35 points earned in  school days , a color I picked was red. Red remark in my drawing book is my today's first color

First strip of the canvas was painted to look as brighter as sunrise.





Then came my saffron ... who taught me to keep my head always high.  The Hindu ....
Slightly wider than red strip.  I gave him more room for his greatness.
BHAGAVA .. I always respect this color. 






 Our drawing teacher always taught us to paint yellow water color as background . Ohh that I forgot here  .... Let's paint it now. Yellow background  .  



My canvas is as colorful as the HOLI.   Heaven...😍





 Now I had to paint a black dot on it . " NAJAR NA LAGE " 😂


 I spread these dots on canvas like a kajal in my eyes.  My loneliness, fear, tension whatever was there  in my mind, all poured out with this black color.

All ups and downs experienced in life, I painted them today as it is here in mountains  .  
Climbs .. few were smaller and few were too high 




Looks like assembling.  My guess and attempt about colors is not so bad as I thought 😎
Yes ..come on . You can do it Amruta .  😎


Now what do you think guys ? Shall I erase memory of red mark, my chosen first red color ? 
 Real life's  tensions are stronger and deeper than the red marks of the drawing book.... so a little black shade on red strip.... a little bit.



 Well, it looks like rising sky .Even though nobody likes it , I liked it.


 My first painting I liked the most  ...  honestly
I can not lie with you people today . 


 These black hills are pinching me up a lot.  Our life is not so bad . 
 Do we really need this much darkness , this much black color ?

Ohh yes .... We have a stress reliever in our coloring box ..... a symbol of peace .... white color ....



I painted a layer of white on yellow wash. It was looking calm now .Exactly same like when Surya Narayan rises while everyone else is in a deep sleep.






A fear that I will not be able to play with these colors has so far gone away.  Today I have decided, no matter how many problems I have, no matter what points I earn ...I will always paint my sky the way I like.

My mind is flying high up in colorful sky like a  flock of birds.  
Freely , happily .


My PASSING MARKS story finished here with freely flying birds. 

Gave a birth to my a beautiful painting and a sweet story.

Hope you like both  .... 🥰

So how many points are you giving me this time?  35,36 or 40 ?😅 

~ Amruta

काठावर पास 😛

माझ्या या चित्राकडे पाहून माझ्या डोक्यात चमकलेल पाहिलं वाक्यं 
काठावर पास ... जेम तेम ३६ गुण 
म्हणून या पोस्ट ला ही हेचं नाव 😄


⛅⛅ SUNRISE ACRYLIC PAINTING ON CANVAS ⛅⛅
असं काहीसं भारी नाव द्यायचं मनात होत या पोस्ट ला . पण म्हटलं नाकापेक्षा मोती जड वाटतोय. आपल्या डोक्यात जे घोळतयं तेच खरं खुर..... काठावर पास 😛

या काठावर पास ची कहाणी माझ्या शालेय जीवनातील . ईयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चे माझे चित्रकलेचे गुण ३६ 😝 ते की कोणाला कलेमध्ये नापास करू शकत न्हवते म्हणून . बाकी विषयात ढीगभर गुण गोळा करणारी मी चित्रकलेत काठावर पास ... नेहमीच.

बिचाऱ्या चित्रकलेच्या सरांनी हात टेकले माझ्या समोर 😄. आज वाटतंय ... हे "काठावर पास " माझ्या सरांनी वाचलं तर कमीत कमी ४० तरी मिळतील गुण 😝😄


कधी नाही ते हातात रंग आणि ब्रश घ्यावासा वाटला. आता असा आगळा वेगळा विचार आलाच कसा डोक्यात हे अजुन एक आश्चर्य ... . माझ्यासाठीही. चित्रकलेचा कुठेही लांब लांबपर्यंत संबंध नसलेली मी .. पण आज कॅनव्हास विकत घ्यावा वाटला ...

घाबरत घाबरत तो ही छोट्या आकाराचा उचलला. कारण, माझ्या रंगांच्या इच्छे पेक्षा " आपल्याला काही हे जमणार नाही . हा आपला प्रांत नाही " ही भावनाच जास्त ठळक होती. 

म्हणून कॅनव्हासचा size 20×20cm.. फक्त

Click below link to see it's detailed video.

https://youtu.be/bFQrhQORghI



मग मोर्चा वळवला तो रंगांच्या कपाटकडे. कधीही चित्रकला केली नसल्यामुळे कॅनव्हास ला कोणते रंग लागतात याबद्दल अज्ञान ...

त्यातल्या त्यात छोट्या आकाराचे , कमी रंगछटा असलेले उचलले. म्हणजे कसं, काहीच नाही जमलं तर फारसं वाया नको जायला 😄

८ रंगछटा असणारा अक्रेलिकचा छोटा पॅक घ्यायचं ठरवलं.
त्यापैकी खालील ५ रंग उपयोगी पडले .

अशा प्रकारच्या पेंटिंग साठी खूप साऱ्या प्रकारचे ब्रश वापरतात म्हणे .... म्हणे बरं का ..... माझ यातही अज्ञान ... 😛 म्हणून आपला एकचं ब्रश बरा आहे ...



या शुभ्र कॅनव्हास कडे पाहून मला माझी कोरी करकरीत उत्तरपत्रिका आठवायला लागली.
३६ गुणांची आठवण म्हणून पाहिलं रंग उचलला तो लाल. चित्रकलेच्या वाहितल्या लाल रेषा माझा आजचा पाहिला रंग.

उगवतीला गडद दिसावं इतकं लाल चुटुक करून टाकलं कॅनव्हास च्या पहिल्या पट्ट्याला


मग उमटवला माझा भगवा ... ज्याने मला मान उंच ठेवायला शिकवली. लाल पट्ट्यापेक्षा थोडा जास्त रुंद. त्याच्या भव्यतेबद्दल त्याला जास्त जागा दिली.


चित्रकलेचे सर पाहिला पिवळा वॉश द्यायला सांगायचे. तो विसरला च
की द्यायचा . चला, आत्ता देवून घेऊया.


रंगपंचमी मधे रंगलेल्या कपड्या सारखा रंगीबेरंगी दिसतोय माझा कॅनव्हास. कसला भारी 🥰


आता त्याला द्यायचा काळा टिळा. नजर नको लागायला कोणाची.

मग डोळ्यात काजळ पसरल्या सारखं त्याला मस्त पसरवलं. डोळ्यात साठलेला सगळा एकाकीपणा , भीती, तणाव ... सगळं सगळं बाहेर पडलं ह्या काळया रंगासोबत.

आयुष्यात आजपर्यंत चढून पार केलेले सगळे उंचवटे आहे असे रेखाटले. काही मोठे आणि काही छोटे.


जरा वाटतंय जमल्या सारखं. इतकाही वाईट नाही माझा रंगसंगतीचा अंदाज. जमतंय की रावं आपल्याला. 😎

मग मिटवावी का वरची लाल रेषेची आठवण? चित्रकलेच्या लाल शेऱ्या पेक्षा खऱ्या आयुष्यातील तणाव जास्त ठळक अणि खोल आहे .... म्हणून लाल रंगावर थोडी काळी छटा .... थोडीशीच.


बरं दिसतंय हे उगवतीच आभाळ ... कुणाला आवडो न आवडो ...मला आवडलं.
माझच मला आवडलं असं पहिलं चित्र 😄.... प्रामाणिकपणा नसात भिनालय ना ....काय करणार 😄


हे काळे डोंगर मला जास्तच खात आहेत . इतकाही वाईट नाही चाललं काही आपल्या जगात .
मग कशाला हा काळपट पणा ? तणावाला मुक्त करणारा एक रंग आहे की आपल्या कडे ..... शांततेच प्रतीक .... रंग पांढरा ....

पिवळ्या वॉश वर त्याचा एक थर चढवला. आता कसं शांत शांत वाटतंय .पहाटेला सगळे साखरझोपेत असताना सूर्यनारायण डोकावून पाहतो तेव्हा असतं तसं.


हे रंगांशी खेळ आपल्याला जमणार नहीं ही भीती आत्तापर्यंत कुठल्या कुठे उडून गेली . आत्ता ठरवलं, कुणी कितीही गुण देवो .... आपण आपलं आभाळ आपल्या आवडीप्रमाणे रंगवायचं .

मुक्त झालेले मन पक्षांच्या थव्या सारखं भरारी घेत उंच उंच उडायला लागलं होत आज. अगदी स्वच्छंद.... आनंदी


काठावर पास चा प्रवास आज या स्वच्छंदी पक्षापर्यंत येवुन पुर्ण झाला .

आणि जन्म झाला  एका छान चित्राचा आणि त्यासोबत एका गोड गोष्टीचा ♥️
तुम्हाला आवडेल ही अपेक्षा .... 🥰

मग किती गुण देताय या वेळी ?

~ अमृता

सगळं इथेच .... ते ही व्याजासहित



" सगळं काही इथेच फेडाव लागतं आणि ते ही व्याजासहित "

आज इतक्या वर्षांनी  माझ्या आजीच तोंडून कधीतरी ऐकलेल हे वाक्य कानात घुमत होतं. सगळे हिशोब आपोआप जुळून आले की काय अशी भीती वाटून गेली.

या भीतीची सुरवात तिच्या फोन पासून झाली

सकाळी एका मैत्रिणीशी बोलणं झालं ... Coronavirus चा लॉक डाऊन असल्यामुळे फोनवरच गप्पा ...  तिच्या आईबद्दल चौकशी केल्यावर , बोलता बोलता ती बोलून गेली

" ट्रेन चं तिकीट रद्द केलं बघ आताच . वर्षभर साठवून ठेवली होती रजा, आईकडे जाऊन राहता येईल सुट्टीला म्हणून .. आणि नेमका हा व्हायरस .  आता कधी माहेरी जायला मिळतंय देव जाणे .
 रात्री गादीला पाठ टेकली की डोळ्यातून पाणी वाहायला सुरू होतं आई बाबांच्या आठवणीने .  जीव कासावीस झाल्यासारखं काहीतरी. नेमकं काय होतंय कळतंच नाही. पोटातल्या आतड्याला पीळ पडल्यासारखं अस्वस्थ मन ... कोणाला सांगता ही नाही येत.
सगळं इथेच फेडाव लागतं का ग खरंच ? कर्म वैगरे खरं असेल ? "

मला तिच्या या बोलण्याचा सुर आईच्या आठवणी पासून कर्म वगैरे पर्यंत का अणि कसा गेला ?  हे काही कळेना ...
थोडासा उलघडा करून विचारलं तर सगळं सविस्तर .... मनाने मोकळी झाली .

८ वर्षापूर्वीची गोष्ट ... तीच पिल्लू जेमतेम ६ महिन्यांचं आणि नेमकी हिची टाळता न येण्यासारखी अडचण . त्यामुळे पिल्लाला  आईकडे ठेवून तिने ऑफिस सुरू केलं . तशी दर आठवड्याला भेटायला जायची ती बाळाला पण ६ महिन्याच्या पोरासाठी ६ दिवस आईवाचुंन काढणे म्हणजे दिव्य. तिची सुध्दा घालमेलच की... बाळाच्या डोळ्यात पाणी बघून शेवटी कसेतरी ४ महिने काम करून तिने कायमच सोडून दिलं.  बाळाच्या वाट पाहणाऱ्या नजरेला पुर्ण विराम .

आणि आज इतक्या वर्षांनी पुर्ण जगावर बेतलेल्या अनपेक्षित संकटामुळे माहेरी जाण्यासाठी बघावी लागणारी वाट, रात्रभर डोळ्यातून वाहणार पाणी, कुणालाही न सांगता येणार शल्य ... या सगळ्या मुळे तिला ८ वर्षांपूर्वीच सगळं डोळ्यासमोर उभ राहत होते.

" बाळाच्या डोळ्यातून वाहून गेलेल्या प्रत्येक थेंबाचा हिशेब तर नसेल मांडला गणपती बाप्पाने ?
६ महिन्यांच्या बाळाला आईपासून लांब रहावं लागलं काही दिवस .... त्याची ती वेदना आज  माझ्यासमोर उकल न  सापडलेली कोडी म्हणून उभी राहिली असतील का ?
आईची वाट पाहणाऱ्या त्याच्या नजरेचा सगळा हिशोब आज माझ्या नजरेला फेडावा लागतोय का ? आणि तो ही व्याजासहीत ?
आणि जे जर खरं असेल तर .....
गणपती बाप्पा समोर हात जोडून मदत मागण्याची तरी योग्यता असेल का माझी उरली ? "

सगळे प्रश्न एका दमात विचारून घेतले तिने . ज्यातील एकही प्रश्नाचं उत्तर आज माझ्याकडे नाही.

सगळं काही इथेच फेडाव लागतं आणि ते ही व्याजासहित.... आजीच हे एकच वाक्यं पुढच्या क्षणाला माझ्या डोक्यात चमकून गेलं .

तिला जे वाटतंय तसं कदाचित नसेलही काही ..
म्हणतात ना मन चींती ते वैरी न चिंती ... तसं उगाचच भीती वाटून गेली असेल तिला
 कदाचित ..... असेलही
बाप्पाने लेकाच्या डोळ्यातला वाहून गेलेला पुर आज हिच्या डोळ्यातून वाहून रिकामा करायचं ठरवलंच असेल तर ?

कोण सांगावं?
या कोरोना मुळे पटावरचे सगळे फासे उलटे पडलेत. प्राणी संग्रहालय पाहायला जाणारी मंडळी, खिडकीच्या गजातून रस्त्यावर मुक्त विहार करणारे मोर केविलवाण्या नजरेने पाहत आहेत .

लंबोदरा ... तुझ्या उदरा इतका मोठेपणा दाखव आणि सगळ्या चुका पोटात घे .... 🙏
अखंड भारताने एकत्र येऊन ९ मिनिटांसाठी तुझ्यासमोर लावलेला दिवा ... खूप मनापासून प्रार्थना करत होता .
बळ दे . 🙏