काठावर पास 😛

माझ्या या चित्राकडे पाहून माझ्या डोक्यात चमकलेल पाहिलं वाक्यं 
काठावर पास ... जेम तेम ३६ गुण 
म्हणून या पोस्ट ला ही हेचं नाव 😄


⛅⛅ SUNRISE ACRYLIC PAINTING ON CANVAS ⛅⛅
असं काहीसं भारी नाव द्यायचं मनात होत या पोस्ट ला . पण म्हटलं नाकापेक्षा मोती जड वाटतोय. आपल्या डोक्यात जे घोळतयं तेच खरं खुर..... काठावर पास 😛

या काठावर पास ची कहाणी माझ्या शालेय जीवनातील . ईयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चे माझे चित्रकलेचे गुण ३६ 😝 ते की कोणाला कलेमध्ये नापास करू शकत न्हवते म्हणून . बाकी विषयात ढीगभर गुण गोळा करणारी मी चित्रकलेत काठावर पास ... नेहमीच.

बिचाऱ्या चित्रकलेच्या सरांनी हात टेकले माझ्या समोर 😄. आज वाटतंय ... हे "काठावर पास " माझ्या सरांनी वाचलं तर कमीत कमी ४० तरी मिळतील गुण 😝😄


कधी नाही ते हातात रंग आणि ब्रश घ्यावासा वाटला. आता असा आगळा वेगळा विचार आलाच कसा डोक्यात हे अजुन एक आश्चर्य ... . माझ्यासाठीही. चित्रकलेचा कुठेही लांब लांबपर्यंत संबंध नसलेली मी .. पण आज कॅनव्हास विकत घ्यावा वाटला ...

घाबरत घाबरत तो ही छोट्या आकाराचा उचलला. कारण, माझ्या रंगांच्या इच्छे पेक्षा " आपल्याला काही हे जमणार नाही . हा आपला प्रांत नाही " ही भावनाच जास्त ठळक होती. 

म्हणून कॅनव्हासचा size 20×20cm.. फक्त

Click below link to see it's detailed video.

https://youtu.be/bFQrhQORghI



मग मोर्चा वळवला तो रंगांच्या कपाटकडे. कधीही चित्रकला केली नसल्यामुळे कॅनव्हास ला कोणते रंग लागतात याबद्दल अज्ञान ...

त्यातल्या त्यात छोट्या आकाराचे , कमी रंगछटा असलेले उचलले. म्हणजे कसं, काहीच नाही जमलं तर फारसं वाया नको जायला 😄

८ रंगछटा असणारा अक्रेलिकचा छोटा पॅक घ्यायचं ठरवलं.
त्यापैकी खालील ५ रंग उपयोगी पडले .

अशा प्रकारच्या पेंटिंग साठी खूप साऱ्या प्रकारचे ब्रश वापरतात म्हणे .... म्हणे बरं का ..... माझ यातही अज्ञान ... 😛 म्हणून आपला एकचं ब्रश बरा आहे ...



या शुभ्र कॅनव्हास कडे पाहून मला माझी कोरी करकरीत उत्तरपत्रिका आठवायला लागली.
३६ गुणांची आठवण म्हणून पाहिलं रंग उचलला तो लाल. चित्रकलेच्या वाहितल्या लाल रेषा माझा आजचा पाहिला रंग.

उगवतीला गडद दिसावं इतकं लाल चुटुक करून टाकलं कॅनव्हास च्या पहिल्या पट्ट्याला


मग उमटवला माझा भगवा ... ज्याने मला मान उंच ठेवायला शिकवली. लाल पट्ट्यापेक्षा थोडा जास्त रुंद. त्याच्या भव्यतेबद्दल त्याला जास्त जागा दिली.


चित्रकलेचे सर पाहिला पिवळा वॉश द्यायला सांगायचे. तो विसरला च
की द्यायचा . चला, आत्ता देवून घेऊया.


रंगपंचमी मधे रंगलेल्या कपड्या सारखा रंगीबेरंगी दिसतोय माझा कॅनव्हास. कसला भारी 🥰


आता त्याला द्यायचा काळा टिळा. नजर नको लागायला कोणाची.

मग डोळ्यात काजळ पसरल्या सारखं त्याला मस्त पसरवलं. डोळ्यात साठलेला सगळा एकाकीपणा , भीती, तणाव ... सगळं सगळं बाहेर पडलं ह्या काळया रंगासोबत.

आयुष्यात आजपर्यंत चढून पार केलेले सगळे उंचवटे आहे असे रेखाटले. काही मोठे आणि काही छोटे.


जरा वाटतंय जमल्या सारखं. इतकाही वाईट नाही माझा रंगसंगतीचा अंदाज. जमतंय की रावं आपल्याला. 😎

मग मिटवावी का वरची लाल रेषेची आठवण? चित्रकलेच्या लाल शेऱ्या पेक्षा खऱ्या आयुष्यातील तणाव जास्त ठळक अणि खोल आहे .... म्हणून लाल रंगावर थोडी काळी छटा .... थोडीशीच.


बरं दिसतंय हे उगवतीच आभाळ ... कुणाला आवडो न आवडो ...मला आवडलं.
माझच मला आवडलं असं पहिलं चित्र 😄.... प्रामाणिकपणा नसात भिनालय ना ....काय करणार 😄


हे काळे डोंगर मला जास्तच खात आहेत . इतकाही वाईट नाही चाललं काही आपल्या जगात .
मग कशाला हा काळपट पणा ? तणावाला मुक्त करणारा एक रंग आहे की आपल्या कडे ..... शांततेच प्रतीक .... रंग पांढरा ....

पिवळ्या वॉश वर त्याचा एक थर चढवला. आता कसं शांत शांत वाटतंय .पहाटेला सगळे साखरझोपेत असताना सूर्यनारायण डोकावून पाहतो तेव्हा असतं तसं.


हे रंगांशी खेळ आपल्याला जमणार नहीं ही भीती आत्तापर्यंत कुठल्या कुठे उडून गेली . आत्ता ठरवलं, कुणी कितीही गुण देवो .... आपण आपलं आभाळ आपल्या आवडीप्रमाणे रंगवायचं .

मुक्त झालेले मन पक्षांच्या थव्या सारखं भरारी घेत उंच उंच उडायला लागलं होत आज. अगदी स्वच्छंद.... आनंदी


काठावर पास चा प्रवास आज या स्वच्छंदी पक्षापर्यंत येवुन पुर्ण झाला .

आणि जन्म झाला  एका छान चित्राचा आणि त्यासोबत एका गोड गोष्टीचा ♥️
तुम्हाला आवडेल ही अपेक्षा .... 🥰

मग किती गुण देताय या वेळी ?

~ अमृता

9 comments:

  1. सदर विषयात अपेक्षित गुण १०० पैकी ३५
    पण मिळालेले गुण ० पैकी १००
    शेरा - जबरदस्त इच्छा शक्ती

    ReplyDelete
  2. गुण 99/100
    100 देता येत नाहीत म्हणून

    आणि चित्रकला माझा ही आवडता विषय नव्हता

    ~ Sandip Pol

    Thank you Sandip for your comment.

    ReplyDelete
  3. Jayashree Jadhav1:38 am, April 14, 2020

    Tu kahihi karu shakates
    No ha shabda tuzya dictionary madhye nahi ��������

    Mast ����

    ReplyDelete
  4. श्रीरंग जाधव3:58 pm, April 14, 2020

    डॉली मला अजूनही लक्षात आहे ... तू चित्रात घरावर गाडी काढायची आणि मी तुला त्यावरून खूप चिडवत होतो . ��
    या आणि अजुन भरपुर आठवणी चांगल्याच लक्षात आहेत .

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Kaka :)

      माझ्या लहानपणीच्या भरपूर आठवणी आहेत तुझ्या कडे .... फुगेवाला, सायकल फेरी , अन्नाचे चार घटक ( भात , भाजी, आमटी, भाकरी )

      Delete

Thank you for your comment :)