तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली


कधी चिडतोस
टोकच भांडण कधीतरी असच सोडतोस 
स्वतःच बांधलेलं, कधी कधी मोडतोस
पण तरीही 
तू सगळ्यांना आवडतोस 

कधीतरी मनापासून खळखळून हसतोस 
तासनतास माझ्याशी बोलत बसतोस 
पण प्रत्येक चेष्टेवर माझ्या 
कसा रे तू फसतोस ?

स्वतःच मारलेली गाठ 
कधी तुला सुटत नाही
अन मी सोडवावी 
असही वाटत नाही 
खरच .. पण तू कधीतरी सोडवताना 
एक धागाही तुटत नाही 

डोळ्यात बघताना तुझी 
नजर कधीच हलत नाही 
अशावेळी मग 
मी ही काही बोलत नाही 
पण माझ्या पापण्यांना खरच 
तुझा हा वार झेलत नाही 

कधीतरी अगदी 
अचानक शांत होतोस 
काहीही न बोलता  
तसाच निघून जातोस
अन अर्ध्या वाटेतून माझ्यासाठी 
पुन्हा परत येतोस 

तूच म्हणतोस नेहमी 
मला खोट बोलत येत नाही 
तुझ्या पावलात पाऊल मिसळून 
मला कधीच चालता येत नाही 
पण नसल्यावर तू 
एकलेपणा पेलत येत नाही 

तुझ्या डोळ्यातले माझे अंदाज 
कधीच चुकले नाही 
असतील लवल्या वादळात पापण्या 
पण मी डोळे कधीच झाकले नाही
एक मात्र खर
तुझ्याशिवाय कुणासमोरही मी वाकले नाही 

माझ्या चेहऱ्यावरची हललेली रेषही
लगेच तुला कळते 
अन प्रत्येक गोष्ट 'मी 'सांगितली 
तरच तुला कळते 
म्हणूनच कदाचित ... माझी वाट नेहमीच 
तुझ्या वळणाला येवून मिळते   

तूच शिकवलस नात्यांची 
घट्ट वीण बांधायला 
तुटत चाललेलं प्रेम 
पुन्हा एकदा सांधायला 
कस जमत रे तुला 
वेदनेला मनातल्या कोपर्यात कोंडायला ?

लांब उभा असलास तरी 
नजर माझ्यावर असते 
परक्यान वळून पाहिलं तर 
नांगी तुला डसते 
तूच सांग तुझ्याशिवाय 
मी कधी कुणाशी हसते ?

गुलाबी थंडी तुला 
नेहमीच बोचते 
मनगटा वरची राखीही 
हल्ली तुला कचते
तुझ्या डोळ्यातले थेंब अजूनही 
मी माझ्या ओंजळीने वेचते 

वाईट वाटेल तुला 
अस कधीच वागणार नाही 
तुझ्या सोबतीत मला माझी 
सावलीही लागणार नाही 
'तू फक्त सोबत रहा '
मी आणखी काही मागणार नाही 

खेळातली प्रत्येक चाल 
तुझ्यासाठी हरलेली 
तुझ्या चंद्रात नेहमी
माझी चांदणी कोरलेली  
अन पहाट होवूनसुधा
रात्र थोडी उरलेली 

सगळ्यांना देवूनही 
तुझी ओंजळ भरलेली 
अन गुलाबाची चार फुल 
माझ्या नावे ठरलेली 
कारण ....
नेहमीप्रमाणे तू तुझी ओंजळ 
माझ्या ओंजळीत धरलेली :)

3 comments:

  1. Its when you were in Mysore.
    23-11- 2007

    "MISSION AMRUTA" डोक्यातही नसेल आल आपल्या ... तेव्हा माझ हे सगळ लिहून झाल होत :h




    ReplyDelete

Thank you for your comment :)