जेव्हा येईन परतून मी

आठवत अजूनही तुझ 
किलकिल्या डोळ्यांनी पाहण 
' मी तुलाच शोधतेय '
फक्त नजरेनीच सांगण 

वेड्यासारखा आलो 
तुझ्याचसाठी धावत 
तू आठवण काढलीस म्हणून 
पावलाला पाऊल लावत 

तुझ्यापर्यंत पोहोचलो खरा 
पण माझ मलाच राहावल नाही 
एकट सोडून जाण तुला
मला सुद्धा भावलं नाही 

हसवते अजूनही ती काच 
जिथे पाठमोरी उभी असायचीस 
कळलही नाही कधी कुणाला 
त्यातून मला पहायाचीस 

प्रत्येक नजरेचा माझ्या 
अचूक अर्थ लावायचीस
मी कुठेही जावो , तुझी नजर मात्र 
माझ्याच मागे धावायची 

पडणाऱ्या प्रत्येक पावलाच माझ्या 
मनापासून कौतुक केलस
कसं सांगू आज तुला ?
माझ होत न्हवत ते सगळ तुझ केलस

विचारणार नाही कधी तुला 
तू मला काय दिलस ?
ओठावरच हसर गाण 
देठासहीत खुडून दिलस 
हे काय थोड केलस ?

कालच्या माझ्या पटलावर 
आज तुझ्या सोंगट्याना पोहोचवायच 
माझ्या आठवणी आणि तुझे शब्द 
सगळ एका सुरात गायचं 

जशी रागावली होतीस माझ्यावर 
तशी एकदातरी रुसत जा 
ज्या पारावर आपण बसायचो 
त्याकडे बघून एकदातरी हसत जा 

खळखळून हसण तुझ 
साठवून ठेवलंय अजून 
हसशील पुन्हा माझ्यासाठी 
तेव्हा दाखवीन मोजून 

याची खात्री आहे ...
जेव्हा येईन परतून मी 
बाग फुलांनी बहरलेली असेल 
तुझ्या गुलाबाची पहिली पाकळी 
माझ्यासाठी राखून ठेवली असेल :)


2 comments:

Thank you for your comment :)