हल्ली तो मला देवळात दिसतच नाही



हल्ली तो मला देवळात दिसतच नाही
वाटत ..हात जोडण्यासारख उरलंच नाही तिथे काही 

शेवटच्या पायरीवरून पावलं परत फिरतात 
कोमेजलेल्या दुर्वा सायंकाळपर्यंत करंडीत उरतात 

अष्टगंधाशी पूर्वीइतका जाणवत नाही आपलेपणा 
मस्तक टेकवून टेकवून वाकला रे बाप्पा आता माझा कणा 

गाभाऱ्यातल्या फुलांचा गंध टाकत नाही वेडावून 
पावणारा तूच तू ... अशी कुठलीच सापडत नाही खूण 

२१ प्रदक्षिणा घालण्याइतका विश्वास नाही राहिला तुझ्यावर
परतफेडीचे  हल्ली मला परवडत नाहीत तुझे दर 

नवसाच्या फुलांमध्ये नाही टाकणार तुझा श्वास गुदमरून 
खांद्यावरच बिऱ्हाड पेलत चालेन एकटी फुटेस्तोवर ऊर   

अंगारा - धुपारत्या ,उगाच कशाला नैवेद्याचा घाट ?
" वाट पाहणाऱ्या " मोदकानीच जर भरल असशील तू माझ ताट   

देत असेल तुझा उंदीरमामा आणून तुला वाटीवाटीभर गुळ 
काय उत्तर देऊ तूच सांग ... पिल्लाला बाबांना भेटायचं खूळ 

वाटत नाही कधी तुला , तू अंत पाहतो आहेस माझा 
एक एक कारणं उघडतो आहेस , मुलामा देऊन ताजा 

"आयुष्य फक्त वादळालाच नसत " म्हणून मी शांत आहे 
पण तेवणाऱ्या पणतीलाही  कशाचीतरी खंत आहे 


View Facebook Comments



4 comments:

  1. :(
    ek pradakshina majhyakadunhi... :)

    ReplyDelete
  2. Mr. / Miss. Anonymous,

    Thank you for your feelings.

    ReplyDelete
  3. speechless
    khrach great ahes tu.. :)

    ReplyDelete

Thank you for your comment :)