कदाचीत मी एकटाच असेन



बाबा जर्मनीला गेल्यापासून     बाबांच pillupack....                 कधी आठवण काढून रडल नाही 
पण ...
त्याला नेमक काय वाटतंय ? 
ढगाळ आभाळ त्याच्या डोळ्यात किती वेळा दाटतय ?




हसत हसत तुला टाळी देणारे 
बरेच मित्र असतील 
पण ...
माझ्या हाताच माप बघायला तुझा हात धरणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

सकाळी तू उठण्याआधी ब्रेकफास्ट तयार ठेवणारे 
बरेच रूममेट्स असतील 
पण ...
माझ्या ग्लासभर दुधातला शेवटचा एक घोट तुझ्यासाठी ठेवणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

तुझ्या बिझी शेड्युल मध्ये दिवसभर call करणारे 
बरेच project mates असतील 
पण ...
फक्त तुझा आवाज ऐकायला धडपडत पळत येणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

रात्र रात्रभर काम देवून जागायला लावणारे 
बरेच बॉस असतील   
पण ...
तू मला झोपवताना तुलाही थोपटणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

सुट्टीदिवशी तुझ्यासोबत ख्रिसमस मार्केट फिरायला येणारे 
बरेच जण असतील 
पण ...
बागेत फिरायला जायला तुझी वाट पहात पायरीवर बसणारा
कदाचीत मी एकटाच असेन

रात्रीच्या जेवणाला तुझ्या डाळ खिचडीला सोबत म्हणून रायत बनवून देणारे 
बरेच Friends असतील 
पण ...
फक्त तुझी आठवण येतेय म्हणून , आईच्या हातच चवदार वरण सोडून ...
दुध आणि भात खाणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

मस्त मस्त जोक्स सांगून पोट दुखेतोवर 
बरेच हसवणारे असतील 
पण ...
तुला बर वाटावं म्हणून ... "पिल्ला हसतो कसा ?" या प्रश्नावर 
खोटखोटच पण मनापासून हसून दाखवणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

जर्मनीदर्शन घडवायला तुझ्या घराच्या दारात उभ्या 
बऱ्याच मर्सिडीज असतील 
पण ...
"तुला सायकल आणायला चाललोय ह मी ...." अस तूच जाताना सांगितलस म्हणून 
कुणाच्या सायकलला हात न लावता माझ्या घोड्याबरोबर एकटा एकटा खेळणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

तुझ्या upload केलेल्या Bonn ... अल्बम ला like आणि comment करणारे 
बरेच Facebook प्रेमी असतील 
पण ...
laptop मध्ये का असेना ..पण तुला पाहता याव म्हणून 
दिवस भर मम्मा जवळ रडत बसणारा 
कदाचीत मी एकटाच असेन 

तुला आठवण येते तेव्हा पाहायला ..मम्मा ने  माझे पाठवलेले
बरेच व्हिडीओज असतील 
पण ...
baba black sheep poem शिकताना , baba ..म्हणतानाच हुंदका दाटणारा  
कदाचीत मी एकटाच असेन 

काळ्याकुट्ट अंधारात झोपच लागत नाही तेव्हा 
सोबत करायला ..माझे आणि मम्मा चे
तुझ्याकडे बरेच फोटोज असतील 
पण ...
डोळे मिटल्यावर तू स्वप्नात येतोस तेव्हा 
मम्माच्या हाताला घट्ट मिठी मारून झोपणारा 
कदाचीत मी एकटाच असेन

बाबा ...प्लीज लवकर ये 

I miss my college days

कॉलेज चे दिवस.. भरभरून जगलेलं आयुष्य.. पुन्हा पुन्हा त्याच आठवणीत रमावं असे सोनेरी क्षण ..
कधीच न संपणाऱ्या असंबंध गप्पा, चहाचे कप आणि सामोसे मैत्रीत रंग भरायला..आणि बरच काही
कॉलेज चे दिवस..म्हटलं कि अस बरच काही आठवत 
सरले ते दिवस ... राहिल्या त्या फक्त आठवणी   



सकाळच लेक्चर म्हणजे पार्किंग मध्येच waiting 
आठवतात का घाटावरच्या कर्नल बरोबरच्या meetings ?
(sorry friends .... हे meeting च सिक्रेट आज फोडलं )
miss call देवून एकमेकांच्या जागवलेल्या नाईट्स 
सापडलो कॅन्टीन मध्ये तेव्हा फाटली होती वाईट :)

GS च्या इलेक्शनला उधळलेला गुलाल 
अन पोरांच्या  त्या 'हिरोइन' ची नागमोडी चाल 
(Mech च्या टोळक्याने तीच हिरोइन असच बारस घातलं होत:) 
फेअरवेल ची पार्टी म्हणजे दंगाच झाला नुसता 
नाकी नऊ आलं होत , black list वरची नावं पुसता पुसता   

 सगळ्या subject साठी वर्षभराची  नोटबुक फक्त एक
पुढून भरलय maths अन मागून suction pump च Mech  
फूडकोर्ट मध्ये तुझ्याच हातानी मला भरवला होतास तू cake
अन madam चिडून उठून गेल्या , देऊन कारण fake 
(madam म्हणजे आमच्या ग्रुप मधली famous personality. Avoiding to write her name )   

campus selection ला जणू सगळेच कंपनीचे गुलाम 
अमृताच्या hat-trick ला department ने दिलेला सलाम  :)
(hat-trick म्हणजे एका आठवड्यात  Satyam , Syntel न THE BEST PERSISTENT )
कट्ट्यावरची रंगलेली भांडण, GD च्या नादात 
tripsy ची style पेट्रोल च्या वादात :) 

back bench वर बसून निवांत काढलेल्या झोपा 
सापडल्यावर HOD कडे घालाव्या लागलेल्या खेपा 
ओरल्ससाठी मात्र चार चर वेळा सगळ्यांचीच वरात 
सरसुद्धा ओरडायचे नेहमीच अगदी सुरत    
इतक सगळ सांगितल्यावर कशाला सांगू खोट ?
" rose queen " प्रथेच्या नावान मोडली होती बोट  
पण ....असल लोढण college ने आमच्याच माथी माराव ...    
rose princes ला नेमक माझंच नाव declare कराव  :( 

तसं पाहील तर

तसं पाहील तर त्याच्याशी 
तीच  कधीच जुळल नाही
पण हव ते मिळत गेल 
कस ? ते तिलाही कळलंच नाही 

हेवा वाटावा असा 
कधीच तो हसला नाही 
पण आपल्याच दुखण्यात 
हरवलेलाही दिसला नाही 

वाटल न्हवत देवापुढे 
तिच्यासाठी' हात जोडेल 
तीच आयुष्य लांबवायला 
 स्वतःचे  श्वास जोडेल 

तिच्या अन त्याच्या आकाशात 
दोन क्षितीजांच अंतर होत 
तरीही त्याच एक टोक 
तिच्या आकाशानंतर होत 

बोलावस अस नेमक 
तेच त्याच राहून जायचं 
अन मनातल सगळ 
मुक्यानेच वाहून जायचं 

मावळतीच्या सूर्यासारखा 
कधीच तो भेटला नाही 
पण दोन पावलांवर उभा असलेला 
परकाही वाटला नाही 

दोन शब्द बोलायला 
निवांत कधी बसलाच नाही 
अन दूर राहूनही 
चुकूनसुद्धा रुसला नाही 

अस नात जुळेल अस
दोघानाही वाटल नाही 
अन जुळलेल्याला  इतक जपल 
कि कधीच ते तुटल नाही 

विहीणबाई


काल पाजविला मी 
मायेचा पान्हा - पाझर ,
वेल मोगरीची दारी 
नकळत चढली झरझर 

विभ्रम विलोल देखणे 
वाऱ्यापरी अवखळ ,
विसंबले न मी कधी 
दूर केले न पळभर   

लहानाची केली मोठी 
तेल घालूनिया डोळी , 
पूर्ण बहरेल सासरी 
फुलेल पाकळी पाकळी 

चाफ्यासाठी हिरव्या तुमच्या 
जतन केली जाई ,
पालन करा मायेने 
आता तुम्हीच तिची आई 

लाडली लाडकी आमची 
तळहाताचा असे फोड ,
शोभेल तुमच्या घरी 
नारायण लक्ष्मीचा जोड 

चंदन तुमचा लेक 
घासलिया दर्वळे वास ,
माझ्या लेकीच्या गुणांचा 
जाणावे आपोआप सुवास 

श्रीफळ तुमचा लेक 
लेक माझी द्राक्षघोस  ,
लेकीवाचून वाटे आम्हा 
घर भरले ओस - ओस 

भास्कर तुमचा लेक 
लेक माझी चंद्रमा ,
श्री शंभू तुमचा लेक
त्या शोभे माझी उमा 

हिरा पैलूदार दिधला 
माझे रिकामेच कोंदण ,
तुळस वृन्दावानीची दिली 
माझे रिकामे रिकामे अंगण 

नाही दुखावले मूळ 
प्राजक्त ठेविला हाती ,
काळजातील रितेपण अपार 
बाप मायीची आता साथ  

आठवणींची रातराणी ही 
डवरेल माझिया दारी ,
बहर खुडूनी नेता 
घर तुमचे गंधभारी

धनाची दिली पेटी 
पित्याचे उदास मन ,
ओटीत घालते विहीणबाई   
रूप गुणांची माझी खाण 

बाळीला नित लाभावी 
तुमच्या पदराची सावली ,
भर्जरी शेल्याची वेलबुट्टी 
जपा बनून माउली 

लेकीच्या कुशीतून उद्या 
वंश वेलीला लाभेल फुटवा ,
सांजेला गहिवरता लेक 
माहेर तुमचेही आठवा 

कधी पाझरता नेत्र तिचे 
पाठीवरून फिरवा हात ,
माय - पित्याची दाटता सय 
धाडा गौरीला एक रात 

जपा काळजाचा माझ्या घड 
विनविते जोडूनिया हात ,
सुख शांती समाधानाची 
लेक माझी करेल बरसात 

डोळियांच्या पंचगंगेचा महापूर 
धावतो गोदामायीच्या भेटी ,
सांगा कशी विसरावी 
तान्हुलीच्या 
चांदण हाताची गळामिठी 

~ Unknown

साडीतला देखणेपणा चोरून नेतोय jeans मधला look

काहीतरी नवीन लिहायचा पर्यंत केलाय ...कितपत जमलाय माहित नाही 

Trial version सारखी झालीत नाती 
short term साठीच उघडतात मायेची खाती 

प्रेमाच्या पदराला नाही आईचा copyright
उडून गेलेत color , आयुष्यच  सगळ black न white 

hide केलेल्या folders सारखे,अचानक गायब झालेत जुने मित्र.
अंगावर झेलल्याचा नाही देत गारवा ,पावसाच paint मधील चित्र

fad च झालाय आता chatting साठी बसण 
smiles च्या नादात हरवलय खळखळून हसण
 
नवरा इकडे बायको तिकडे, skype ची संगतच वाईट
परकाळ्याला उपरण्याची गाठ बांधणारी कुठेच नाही website 

जुन्या नवीन नावांनी , contact list भरत गेली 
कट्ट्यावरची टोळकी मात्र mobile च्या crowd मध्ये mute झाली  

Ctrl + z सारख आयुष्यात खूप काही missing आहे 
भल्या मोठ्या list मध्ये, प्रत्येकाच देवबाप्पा कडे wishing आहे

शेजार्याच नाव नाही माहित, हेच कित्ती आहे strange 
अन घरही आता शांत असत , हरवल्यासारखी range   
 
pen च्या drive सारखा , माणूस भावनेन खुजा झालाय 
अन mother नावाचा board त्याच्या आयुष्यातून वजा झालाय 

Hi , Hello , Love U च्या list मध्ये संस्कारांना जागा नाही 
अन सुटली वीण सांधणारा internet वर धागा नाही 

साडीतला देखणेपणा चोरून नेतोय jeans मधला look 
अन लग्नाच्या आमंत्रणसाठीही  आता लागतंय facebook  :)

आई म्हणून घडताना .....


           आयुष्यातला तो सर्वात कठीण काळ होता माझ्या साठी .... माझ ६ महिन्याचं पिल्लू मी कोल्हापूरला माझ्या आई कडे ठेवून पुण्यात इथे job करत होते. जरी प्रत्येक शनिवारी मी त्याला भेटायला जात असले तरी त्याला सोडून येताना नको नको वाटायचं  . वाटायचं हा सोमवार येउच नये कॅलेंडर मध्ये . तोच दिवस 

           आजचाही सोमवार नेहमीप्रमाणे भल्या पहाटे घड्याळाच्या काट्यावर नाचतच उगवला . सकाळचे ४ वाजले आणि माझ्या मोबाईल मधला कोंबडा आरवला . उठायची अशीही अज्जीबात इच्छा होत न्हवती . पिल्लाशी रात्री २ वाजेपर्यंत खेळत बसले होते . आत्ता कुठे डोळा लागला होता माझा . ह्या घड्याळालाहि इतक जलद आजच पाळायच होत ? 

कशेतरी करून डोळे उघडले. पिल्लू चिकटूनच झोपला होता . जीवावरच आल होत त्याला बाजूला सारून उठण. मग मनात विचार आला प्रत्येक सोमवारी leave नाही मिळणार madam आपल्याला . उठ .

"हे" हि अगदी निवांत झोपले होते . साखरझोपेतून उठवायचं मनच होत न्हवत . तरीही उठवलं . दोघेही थोडा वेळ पिल्लुकडे पाहत बसलो . आणि मग एकमेकांना दिलासा देत उठून आवरा आवारी करू लागलो. 

५:३० ची बस चुकवायची नाही हे टार्गेट समोर ठेवूनच हात काम आणि वेळ यांची सांगड घालत होते.बेडरूम मध्ये माझ ६ महिन्याचं पिल्लू निवांत स्वप्नातल्या चान्दोमामाशी गप्पा मारत निजल होत. आता पिल्लू उठलं तर? मम्माची चाललेली लगबग बघून आज काय डरकाळी फुटणारे आहे देव जाणे. असा विचार मनात येतो न येतो तोवरच त्याचा आवाज कानावर येउन आदळला . "मम्मा .... भूर ..... ??" (अरे देवा .... ह्याच्या डोक्यात काय माझ्या मनाचा स्कॅनर फिट केलाय काय?). "नाही कुठे जात तुझी मम्मा " म्हणत त्याच्या आजीने त्याला कुशीत घेतलं . साहेबाना थोडी कुणकुण लागलीच होती . आता मम्मा आणि बाबा मला परत आज सोडून कुठेतरी भूर जाणार :(

"तू आवर सामान . मी घेतो त्याला " म्हणत नवरोबांनी त्याला मांडीवर घेतलं. त्याचा एकच प्रश्न "मम्मा .... भूर ..... ??" आईशपथ ... हृदय पिळवटून निघायचं माझ हे सगळ ऐकताना .  
"गुड मॉर्निंग शोना . उठल कस माझ pillupack आज इतक्या लवकर ? सकाळ झाल्यावर तुला पोम्पोम मधून फिरवून आणेन  हा... अमोल काका येईल न तुला खाऊ घेऊन . रात्र झाली बाळ . झोप लवकर " - बाबा 
"उ हु ..." चिरंजीव तोंड फिरवून पलीकडे :(
"पिल्ला ... मम्मा शंभो करून झाली कि येइलच इतक्यात. आम्ही दोघे तुला नवी नवी सायकल घेऊन येतो ह ..." - बाबा 
"ना " चिरंजीवांचा कट्टर असहकार 
"आज बाबा तुला मोठं एरोप्लेन आणणार आहे " खिंड लढवायचा बाबाचा निकराचा प्रयत्न सुरु होता .

बाथरूमच्या दारावर टकटक .. "साहेब जागे झालेत टक्क ... वातावरण तापणार असा वाटतंय सौ ."  - बाबांचं मम्मा ला रिपोर्टिंग . मम्मा आताच अर्धी गार झाली 
आता मला मैदानात उतरण्यावाचून पर्याय नाही हे जाणून मी त्याची समजून काढायला पुढे झाले . कंठापर्यंत आलेला हुंदका पहिले गिळून घेतला. नवरोबानीही जवळ घेत थोडासा धीर दिला .
"मम्मा चा पिल्लू शाहन आहे .. गोड गोड हसून दाखवत . रडायचं नाही न ? आजी आणि आबा आहेत न बरोबर . मी लग्गेच येणार उद्या परत ". "हो… आणि आम्ही किनई तिकडे आईसक्रीम पण खाणार आहोत. बाबा आणि मम्माला नाहीच." आज्जीही मदतीला धावली. 

एव्हाना पिल्लाच्या डोळ्यांत पूर दाटलेला. नजरेत फसवलं गेल्याचं दुःख स्पष्ट दिसून येतंय. मम्मा खोटं बोलतेय याचा न पेलवणारा ताण काही सांगू पाहतोय. पण…..मम्माच्या डोळ्याच्या ओल्या कडा पाहून माझ पिल्लू एका मिनिटात तयार झाल मला सोडायला . 

थोडं समजावून, थोडं थोपटून, मी घराबाहेर पडले खरी. आबांच्या कडेवर बसून पिल्लूही आलंच मला बाय करायला. पण चेहऱ्यावर मनातलं सगळं स्पष्ट चितारलेलं होतं. मम्माच्या वागण्याचं कोडं आणि असं का? चं भलं मोठं प्रश्नचिन्ह. तिला बाय करताना मला स्वच्छ जाणवतंय, ‘मम्मा नको ना जाऊ आफिशला’ चा हुंदका.

आजोबा हात हलवून म्हणत होते "don't  worry ." आणि आम्ही दोघे जड पावलांनी पायऱ्या उतरत होतो .  गाडीत बसून ह्यांच्या मांडीवर डोक ठेवून मनसोक्त रडून घेतलं मी . त्यांना तर हे हि करण शक्य न्हवत. बायकोला आधार देणारा वड ढासळता कामा नये :'(

सकाळ होइतोवर कदाचित तो (माझ pillupack ) विसरेल हि हे सगळ . पुढच्या शनिवारी मी दारात उभी दिसले कि त्याच आनंदाने तो येईल झेप घेत माझ्या कडे . आत्ता या क्षणी त्याची मम्मा आणि बाबा त्याच्या जवळ आहेत इतकच त्याला माहित असेल आणि त्यातच तो खुश असेल . लहान मुलांना सगळ जग आई बाबाच्या कुशीत मिळत . 

देवबाप्पा .... कुठून रे इतका समजूतदारपणा दिलास माझ्या लेकाला ?

डोळ्यातले थेंब

कुणीतरी हाक  दिली 
म्हणून ती थांबली 
अन पायाखालची वाट
नको इतकी लांबली 

पाठ फिरवून वाट पाहणारा
वळणावरती बसला होता 
आज पुन्हा तितक्याच
मनापासून हसला होता

थरथरणाऱ्या  डोळ्यातलं 
पाणी सांडल  न्हवत 
मनातल दुखण आजही 
तिच्यासमोर मांडलं न्हवत 

ओठावरच्या हसण्यामाग 
जखम लपवली होती 
हृदयातली  वेदना  आज 
चेहऱ्यापर्यंत झेपावली होती

काळ्याकुट्ट अंधारात 
एकच दिवा होता साथीला 
दोन पावलांचा आधार होता 
विखुरलेल्या मातीला    

उंचावलेल्या हातांना 
क्षितीज नवं होत 
झुकल होत धरणीसाठी 
भेटायला हवं होत 

सोसाट्याच्या वाऱ्याला 
किनाऱ्याची सीमा न्हवती 
झुकलेल्या आकाशाला 
जमिनीची तमा न्हवती 

उठलेल्या वावटळीत 
दोघेही उडून गेले 
डोळ्यातले दोन थेंब 
गालावर सोडून गेले 


तू मात्र अशीच .....

          त्या दोघी मैत्रिणी .....मैत्रिणी ? न्हवत्याच कधी ... मैत्रीचा एकही मागमूस कधी दिसला नाही . न कधी भेटन , न कधी फोनवरच ते तासनतास बोलन , कधी कुणाजवळ विचारपूस नाही , कधी कुणाजवळ आठवण काढण नाही . पण तरीही ... त्या दोघी एका धाग्याने बांधल्या गेल्या होत्या . दोघींचाही मित्र एकच.
          एकीसाठी तो म्हणजे सर्वस्व  आणि त्याच्यासाठीही ती म्हणजे त्याच जग. आणि दुसरी .... नको म्हणतोय तर कुठल्या घोड्यावर बसू ? :) तिघांचही तस बरं चालल होत. काय झालं बिनसलं आणि रथाच तिसर चाक निखळून पडलं . निखळून कसलं पडतंय ? काढून टाकण्यात आलं . त्यान दुसर्या मैत्रीनिसाठीच्या सगळ्या वाटा  बंद करून टाकल्या ... कुणालाच त्रास नको . 
          या सगळ्याच कारण विचारायला वेळच दिला नाही. आणि त्याच्या 'तिला' ही पडलेल हे कोड ... शेवटपर्यंत कोडच राहील. ती त्याला सर्वस्व मानायची . तिच्यासाठी त्याचा शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य . एका शब्दानही प्रश्न न करता तिन हि हे सगळ समजून घेतलं . अन त्या क्षणापासून दोघी मैत्रिणी पात्राच्या दोन टोकांना गेल्या . जी कधीही एकत्र येण शक्य न्हवत.
          अधूनमधून पहिल्या मैत्रिणीलाही वाटायचं , लांबूनच का होईना पण बघून घ्यावं तिला डोळे भरून. गळ्यात गळे घालून फिरण्याइतकी प्रिय जरी नसली ती .. तरीही कुठेतरी एक धागा अजून मजबूत होता.जो दोघीनाही एकत्र आणायला पाहत होता . देवाने बहाल केलेलं एक अनोख वरदान .. दोघींच्याही लेखणीतून सरस्वती उमटत होती.   
          रथाच निखळून पडलेल चाक (दुरावलेली दुसरी मैत्रीण) रथाच्याच गतीने शेजाशेजारूनच चालत होत इतके दिवस. सरस्वतीच्या एका हाताला हि आणि दुसर्या हाताला ती. दोघीही भन्नाट लिहायच्या. वाचणार्यान वाचताच बसावं.इतक्या दिवसात कधीही दोघीनाही एकमेकींचा हेवा वाटला नाही. स्पर्धा करावीशीही नाही वाटली कधी.
          स्पर्धा ? इथच आज खर घोड अडलं . रथाची दोन चाक आनंदान चालत होती. तो आणि त्याची ती पहिली मैत्रीण . तिसर सुटलेलं चाक ( दुरावलेली दुसरी )अगदी व्यवस्थित संभाळल होत. तिच्या पावलाशी पाऊल जोडत .  तिच्या चालीशी आपली गती जुळवत .. कळत नकळत कठलाही धागा तुटू  न देत. आणि अचानक हे सगळ स्पर्धेवर कुठून गेल ?     
         त्या सुटलेल्या चाकाच एक एक पाऊल पुढे पडत गेल . आणि अंतर वाढत गेल . दोघे एकीकडे आणि तिसरी एकीकडे.
कोण काय करणार ? पावला पावलांनी पुढे धावण्यापेक्षा पाऊल जुळवत एकाच लयीत चाललेलं सगळ, सुटलेल्या चाकानच हलवून सोडलं . हरवल्या ..... सरस्वतीच्या दोन लेकी विनाकारण तुटल्या 

एका शब्दावर सगळच दुरावल होत 
एका हाकेतल सगळच हरवल होत 
तरी मी सगळ सावरून घेतलं 
तू मात्र अशीच .....  
माझ्या बोलण्याने तुला अजूनही काहीच फरक पडत नाही 
किती सांभाळून घेतलं , तरी तुझ पाऊल काय मागे पडत नाही 

कितीतरी दिवस झाले .. आठवतंय?
दोघीही पावलाला पाऊल जुळवून चालत होतो 
तुझी लेखणी माझी लेखणी ... दोन्ही समान रेषेत झेलत होतो 
तू मात्र अशीच .....
नकळत हात सोडून पुढे निघून गेलीस 
तुलाच ठाऊक ... कुठल्या race चा करंडक घेऊन आलीस ?

अंतराने अंतर वाढत जाईल 
तुझ मन नकळत तुलाच विनाकारण कुढत राहील 
" बालमैत्रिण " बरोबर आहेस असच वाटत राहील मला 
तू मात्र अशीच .....
कुणाची आठवण आली म्हणूनच घराबाहेर पडलीस 
अन मी गुफलेली सगळी वीण स्वतःच्या हाताने तोडलीस 

सोडून दिलाय मी ही दोर , आता पुन्हा जुळणे नाही 
दोन लेखाणीना एक लय आता पुन्हा मिळणे नाही 
फक्त इतकच वाटतंय .... बरोबर चालायला हवी होतीस 
दुरावलेली असो... पण प्रत्येक प्रतिभेतून तू मला नवी होतीस 
तू मात्र अशीच .....
माझ्याशी रस्सीखेच , हाच तुझा गुन्हा आहे 
तुझा हा वेडेपणा आम्हा दोघांसाठीही जुना आहे :)


  






या कथेतील सर्व पात्रं काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही; आढळल्यास योगायोग समजावा.

बालमैत्रिण

दोघेही एकत्रच लहानाचे मोठे झाले .... खेळले,भांडले, रडले , हसले . 
सारकाही बरोबरीने .... दिवस कसे सरत गेले दोघानाही कळलच नाही ...
आणि अचानक .. एके दिवशी ... तीच लग्न ठरलं ...
काहीच सुचेना त्याला ... आपल्याला अस अस्वस्थ का वाटतंय ? 
का मन इतक बैचेन झालाय ? डोळे बंद केल्यावरही अजून तीच का उभी राहते डोळ्यासमोर ?का ? ? ? 


ती मला अजूनही आठवते .....
कैरीच्या एका फोडीसाठी माझ्याशी भांडणारी 
चिंचेच्या हौसे खातीर मला झाडावर चढायला लावणारी 
लपाछपीच्या डावात मलाच राज्य देणारी 
लपायला माझ्याच आईच्या पदराचा आडोसा घेणारी 

भातुकलीच्या खेळामध्ये शेंगदाण्याची भाजी 
भर दुपारच्या दंग्याने काठी घेऊन मागे धावणारी आजी 
जुईच्या फुलासाठी नाहीच पोहोचला कधी तिचा हात 
लांबसडक वेणीसाठी  तिच्या , नेहाकाकुच्या दारात माझीच वरात 

शेवटी काहीही करून मुलगीच ती , catch कधीच घेतला नाही 
अन बिचारीच्या भातुकलीतला भात तिला कधीच भेटला नाही :)
खाउन  फस्त करून मी , हळूच हात पुसायचो हाफ चड्डीला 
दिवाळीतला किल्लाही बांधायला जमला नाही कधी आमच्या त्या गुड्डीला 

त्यादिवशी बाईसाहेब ओढणी पांघरून आल्या 
मी आपल त्याला पकडून नको इतक्या मस्त्या केल्या 
काही दिवसातच दुपारचा दंगा  दोघांनीही  कमी केला 
तिच्या खोलीला माझ्या आईने नवीन पडदा शिवून दिला 

काकुबाई आता मस्त मस्त साड्या खरेदी करतात 
अन माझ्याशी तिला बोलताना पाहून गल्लीतल्या ४ मजनूंच्या चिता जळतात 
दिवसाची सुरवात माझ्या अजूनही तिच्याच आवाजान होते 
माझ्या आईला रोज न चुकला ती सकाळी फुलांची करंडी द्यायला येते 

रात्री झोप तरी च्यामारी कुठली लागते पडल्या पडल्या
तिचा गुड नाईट message आल्या शिवाय मी माझ्या रजई कधीच नाही काढल्या 
परवा रात्री मी आपला वेड्यासारखा करतोय call 
madamचे आईच्या कुशीत रडून लाल बुंद झालेत गाल 

आई शपथ , रात्रभर माझा mobile तिच्या GN message ची वाट पाहत होता 
नंतर कळल , राजकुमारीला आमच्या एका इंजिनिअर साहेबाचा होकार आला होता 
वाटल ...उगाच गडबड केली बाबांसारख मोठ व्हायची 
सवय झाली होती तिच्या भातुकालीतली शेंगदाण्याची भाजी खायची 

प्रेमबीम असला आगाऊपणा मी कधी नाही केला 
देव जाणो... कुठल्या नात्याने तो आम्हा दोघांना बांधून गेला ?
निखळ मैत्री हा शब्द माझ्या मित्रांच्यात कुणालाच नाही पटायचा 
मी हि कधी प्रयत्न केला नाही, तिला कुठल्या  नात्याने बाटायचा 

कोरड्या डोळ्याने निरोप देईन, अस काही मला वाटत नाही 
तिला पिडायची हौस काही केल्या फिटत नाही 
सांगेन तिच्या नवऱ्याला , थोड्या दिवसांनी तिला घरी राहायला पाठवून दे 
तू तुझ पटकन साधलस बाई , आता मला माझी अर्धांगिनी गाठवून दे   :)

आप क्या जाने...........

टूटेहुए दिलसे आवाज आती है 
तनहाई में आसुंओ की बरसात होती है 
आप क्या जाने .....मौत क्या होती है ?
हमारी तो आखरी साँस भी 
आपके लिए जीती है 

सिमटेहुए  लम्होसे यादें छुट जाती है 
हमारी हसी भी हमसे रूठ जाती है 
आपको छूकर आयी  हवासे अक्सर 
हमारी नींद टूट जाती है 

झुकीहुई पलाकोमे बेकरारी नहीं होती 
हर एक ग़ज़ल प्यारी नहीं होती 
आप क्या जाने .....महफ़िल क्या होती है 
जो अपनोंके बिना पूरी नहीं होती 

आप क्या जाने 
     बेवफाई किसे कहते है 
आप क्या जाने 
     तकलीफ  किसे कहते है 
आहट भी नहीं इनकी 
     पहुचेगी आपतक 
क्योंकि 
    आप तो हमारे दिल में रहते है 


साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !

बाबा जरा इकडे ये ...आई कडे बघ
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !

हसून दाखवतेय..... आजीला उगाच 
दिसतोय चेहरा जरा वेगळा वेगळाच आज 
मी वरण मागितलं कि भात आणून देते 
कित्ती नको म्हटलं तरी आज उगाच कडेवर घेते 
आळीमिळी गुपचळी नाही आवडत तिला खेळायला 
पण घर कस शांत असावं .... जणू आजच लागलाय हिला कळायला    
बाबा ... विचार तिला ...मोकळ्या आभाळात कुठे हरवलय तीच जग 
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !

काम नाही ..बीम नाही ..कुणाला काहीही वाटो 
पाहत बसते Latpot (Laptop) वरचे नुसते तुझे फोटो
खेळली पण नाही आज माझ्याशी घोडा घोडा 
गार्डन मध्ये न्यायाची तर गोष्टच सोडा   
एकटी एकटी काहीतरी विचार करत बसते 
कुणी हात लावला तरी कशी दचकून उठते ?
म्हणते कशी .... दोन टोकांच्या पोकळीतली जाणवतेय धग 
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !

कारण बिरण काही नाही .... उगाचच रडते 
मी जवळ गेलो तरी , डोळ्यात पाणी काढते 
हे काय बर दिसत का ? मला तूच सांग 
बघे म्हणे , "कुठल्या कोड्याचा लागतोय का तुला थांग "
घाबरतो तुझा हा strong boy , आई अशी काय बोले 
रोजच्या बडबडीतले तिच्या जणू  शब्द उडून गेले  
कशाला भिते ? सांग तिला .... जिरवेन मी असे हज्जार नग  
साचलेत डोळ्यात तिच्या कोपऱ्यावरचे ढग !

बाबा एक खर सांगू ?
दुसर तिसर काही नाही रे  ...तिला तुझी आठवण येते 
आणि आईच्या ओठावरच हसण , कुठेतरी भूर.... पळवून नेते 
नको करू काळजी मित्रा , मी सांभाळून घेईन 
(हे सगळ बोलताना , खरच ...बाबाचा बच्चा त्याचा मित्रच झाला )
येत चालता मला आता ,तिला मीच फिरायला नेईन 
काळजी बिळजी करत नको बसू तू आमची  
मस्त ठेवतो हसत खेळत बायको बघ तुमची 
आहे न मी तुझी कार्बन कॉपी .... सगळ कस सांभाळतोय तरी बघ 
पळवून लावतो तिच्या डोळ्यातले  कोपऱ्यावरचे ढग !

पाहिलं प्रेम कस विसरायचं ?


आयुष्य म्हणजे खेळ नव्हे ,फुकट मिळालेला वेळ नव्हे
आयुष्य एक कोड आहे सोडवाल तेवढं थोड आहे 
या वळणावर एकदाच घसरायचं...... 

या वळणावर एकदाच घसरायचं .....
राव ....पाहिलं प्रेम 
पाहिलं प्रेम कस विसरायचं ? :)

दवबिंदू होऊन जगताना 
मनात धुक दाटल होत 
अळवावरच्या मोत्याहून 
सुंदर वाटल होत 

वार्यासारख  वाहील 
चांदण्यात राहील होत 
एकदाच क्षितिजाकडे 
निराभ्रपणे पाहील होत 

खळखळणारा झरा 
वळणावर वळला होता 
वाहण्यातला आनंद 
तेव्हा खरा कळला होता 

रातराणीच्या सुवासाशी 
मी ही स्पर्धा केली होती 
पहाटेच्या गारव्यापर्यंत
चंद्राला संगत केली होती 

तलावातल्या कमळासारख 
नाजूक नटल होत 
त्याच्याइतकच कोवळ प्रेम 
मलाही भेटलं होत 

पावसाच्या सरीसारख भेटलं 
अन गारांसारख विरून गेल 
माझी ओंजळ मात्र 
सुखाने भरून गेल   

सगळ किती सहज पेललस


Read it as 
तो तिला म्हणाला "......"
ती म्हणाली "....."

तो तिला म्हणाला "चल आज खाऊन  येऊ कोपर्यावराची  भेळ "
ती म्हणाली "आत्ता कुठे ?? पिल्लू उठायची झालीये बघ वेळ "
तो म्हणाला "इतकं काय त्यात ? त्यालाही घास घास भरवू "
ती म्हणाली "चालेल .... पण हे सगळ त्याला दात आल्यावर ठरवू "

"ok madam मग कोल्ड कॉफी तरी नक्कीच चालेल त्याला "
"sinarest संपलय ...कालपासून लेकाच नाक लागलाय वहायला "
"आई शपथ .... विसरलोच मी आपला सिंहगड plan "
"pillupack फार लहान आहे हो , असले plan थोडेदिवस ban "

"सौ .... लग्नानंतरचे गोल्डन days ... इतक्या लवकर काही संपले नाही "
"बायको बरोबर आता आहे मी तुमच्या गोल्डन बॉयची आई "
"लग्नाचा पहिला वाढदिवस ...कुठे जाऊयात फिरायला ?"
"चार महिन्याचं तान्हुल....घेतलाय मी घरीच केक करायला "

सकाळ झाली , दुपार झाली, संध्याकाळ ही संपून गेली 
रात्री उशिरा सौ ना त्यांच्या आहो ... ची आठवण झाली 
पिल्लूला कुशीतून गादीवर झोपवल्यावर ...मग लक्ष गेल 
गरम गरम मसाला दुध त्याने तिला आणून दिल

"बस जरा निवांत , खरच दमली असशील"
"मला वाटल होत दुपारीच तू माझ्यावर चीडशील "
"चिडू बिडू कशाला ग .... खरच फार मस्त झाला होता ... सगळा केक मी संपवला "
त्याच्या खांद्यावर डोक टेकल्यावर तिचा सगळा क्षीण विरघळला 

केसातून हात फिरवत तो तिला म्हणाला 
"माझी बायको आणि आपल्या लाडोबाची आई .. सगळ किती सहज पेललस "
ती .."माप ओलांडून घरी आले तेव्हा तूच नाही का वचन दिलस ?
यापुढे सगळ दोघे मिळून करू ... म्हणत माझ नवीन घरात स्वागत केलस 
बायको , आई , वाहिनी .... सगळ सगळ तुझ्यामुळेच मिळाल 
गुटूकली ( त्याचं बाळ ) ची cute cute smile हेच anniversary गिफ्ट ....
मी आपल मुद्दाम तुला दिवसभर छळंल :)"


सगळ कळत असूनही

14-03-2007


My college days were golden days due to her. She was a single person in my life for whom I could do anything.
One day ... unexpectedly ... she left me alone, broken my heart ... I was feeling just like I was missing my valuable part.  
This poem was written when I was trying to search my lost friend inside her ...again..


डोळ्यातला प्रत्येक थेंब ,पापणीवर दाटू लागतो 
खरच....
मोगर्याचा दरवळही,नकोसा वाटू लागतो 
              ओलावलेल्या कडा ,सांत्वन मागत नाहीत 
              अवसेच्या रात्री ,मग चांदण्याही जागत  नाहीत  
वाहणाऱ्या वार्याला, गारवाही बोचू लागतो 
आपलेपणा दोघींमधला ,नको इतका बोचू लागतो 
              खरखुर प्रेम, तिन साखळदंडानी बांधल होत 
              सुटत चाललेल्या धाग्यांना ,नकळत सांधल  होत
गाठींचा गुंताही तिने,मनात जपला होता 
म्हणे... 
वेदनेचा दाह त्यात लपला होता 
              कुणाच्यातरी शब्दांनी, घाव केला होता 
              भावनेच्या बाजारात प्रेमाचा तिच्या, इथे भाव केला होता
विखुरलेल्या तुकड्यांनी ,स्वतः च्या हातानी वेचल 
अन कोसळलेल आभाळ मी ,पुन्हा एकदा रचल 
              तुटलेलं जुळत नाही ,दुरावलेल मिळत नाही 
              सगळ कळत असूनही, माझ मन वळत नाही