तसं पाहील तर

तसं पाहील तर त्याच्याशी 
तीच  कधीच जुळल नाही
पण हव ते मिळत गेल 
कस ? ते तिलाही कळलंच नाही 

हेवा वाटावा असा 
कधीच तो हसला नाही 
पण आपल्याच दुखण्यात 
हरवलेलाही दिसला नाही 

वाटल न्हवत देवापुढे 
तिच्यासाठी' हात जोडेल 
तीच आयुष्य लांबवायला 
 स्वतःचे  श्वास जोडेल 

तिच्या अन त्याच्या आकाशात 
दोन क्षितीजांच अंतर होत 
तरीही त्याच एक टोक 
तिच्या आकाशानंतर होत 

बोलावस अस नेमक 
तेच त्याच राहून जायचं 
अन मनातल सगळ 
मुक्यानेच वाहून जायचं 

मावळतीच्या सूर्यासारखा 
कधीच तो भेटला नाही 
पण दोन पावलांवर उभा असलेला 
परकाही वाटला नाही 

दोन शब्द बोलायला 
निवांत कधी बसलाच नाही 
अन दूर राहूनही 
चुकूनसुद्धा रुसला नाही 

अस नात जुळेल अस
दोघानाही वाटल नाही 
अन जुळलेल्याला  इतक जपल 
कि कधीच ते तुटल नाही 

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)