डोळ्यातले थेंब

कुणीतरी हाक  दिली 
म्हणून ती थांबली 
अन पायाखालची वाट
नको इतकी लांबली 

पाठ फिरवून वाट पाहणारा
वळणावरती बसला होता 
आज पुन्हा तितक्याच
मनापासून हसला होता

थरथरणाऱ्या  डोळ्यातलं 
पाणी सांडल  न्हवत 
मनातल दुखण आजही 
तिच्यासमोर मांडलं न्हवत 

ओठावरच्या हसण्यामाग 
जखम लपवली होती 
हृदयातली  वेदना  आज 
चेहऱ्यापर्यंत झेपावली होती

काळ्याकुट्ट अंधारात 
एकच दिवा होता साथीला 
दोन पावलांचा आधार होता 
विखुरलेल्या मातीला    

उंचावलेल्या हातांना 
क्षितीज नवं होत 
झुकल होत धरणीसाठी 
भेटायला हवं होत 

सोसाट्याच्या वाऱ्याला 
किनाऱ्याची सीमा न्हवती 
झुकलेल्या आकाशाला 
जमिनीची तमा न्हवती 

उठलेल्या वावटळीत 
दोघेही उडून गेले 
डोळ्यातले दोन थेंब 
गालावर सोडून गेले 


Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)