सगळ किती सहज पेललस


Read it as 
तो तिला म्हणाला "......"
ती म्हणाली "....."

तो तिला म्हणाला "चल आज खाऊन  येऊ कोपर्यावराची  भेळ "
ती म्हणाली "आत्ता कुठे ?? पिल्लू उठायची झालीये बघ वेळ "
तो म्हणाला "इतकं काय त्यात ? त्यालाही घास घास भरवू "
ती म्हणाली "चालेल .... पण हे सगळ त्याला दात आल्यावर ठरवू "

"ok madam मग कोल्ड कॉफी तरी नक्कीच चालेल त्याला "
"sinarest संपलय ...कालपासून लेकाच नाक लागलाय वहायला "
"आई शपथ .... विसरलोच मी आपला सिंहगड plan "
"pillupack फार लहान आहे हो , असले plan थोडेदिवस ban "

"सौ .... लग्नानंतरचे गोल्डन days ... इतक्या लवकर काही संपले नाही "
"बायको बरोबर आता आहे मी तुमच्या गोल्डन बॉयची आई "
"लग्नाचा पहिला वाढदिवस ...कुठे जाऊयात फिरायला ?"
"चार महिन्याचं तान्हुल....घेतलाय मी घरीच केक करायला "

सकाळ झाली , दुपार झाली, संध्याकाळ ही संपून गेली 
रात्री उशिरा सौ ना त्यांच्या आहो ... ची आठवण झाली 
पिल्लूला कुशीतून गादीवर झोपवल्यावर ...मग लक्ष गेल 
गरम गरम मसाला दुध त्याने तिला आणून दिल

"बस जरा निवांत , खरच दमली असशील"
"मला वाटल होत दुपारीच तू माझ्यावर चीडशील "
"चिडू बिडू कशाला ग .... खरच फार मस्त झाला होता ... सगळा केक मी संपवला "
त्याच्या खांद्यावर डोक टेकल्यावर तिचा सगळा क्षीण विरघळला 

केसातून हात फिरवत तो तिला म्हणाला 
"माझी बायको आणि आपल्या लाडोबाची आई .. सगळ किती सहज पेललस "
ती .."माप ओलांडून घरी आले तेव्हा तूच नाही का वचन दिलस ?
यापुढे सगळ दोघे मिळून करू ... म्हणत माझ नवीन घरात स्वागत केलस 
बायको , आई , वाहिनी .... सगळ सगळ तुझ्यामुळेच मिळाल 
गुटूकली ( त्याचं बाळ ) ची cute cute smile हेच anniversary गिफ्ट ....
मी आपल मुद्दाम तुला दिवसभर छळंल :)"


1 comment:

  1. ह्या सगळ्या भावना लेखणीतून कागदावर उतरवल्याच खरं समाधान आज मिळाल :)
    ज्याच्यासाठी हि कविता लिहिली .... त्याने वाचल्यावर... दिलेल्या त्याच्या त्या खोडकर comments आणि त्यावर आम्हा दोघांचही पोट दुखेतोवर हसण :)
    Thank You Ashish

    ReplyDelete

Thank you for your comment :)