बालमैत्रिण

दोघेही एकत्रच लहानाचे मोठे झाले .... खेळले,भांडले, रडले , हसले . 
सारकाही बरोबरीने .... दिवस कसे सरत गेले दोघानाही कळलच नाही ...
आणि अचानक .. एके दिवशी ... तीच लग्न ठरलं ...
काहीच सुचेना त्याला ... आपल्याला अस अस्वस्थ का वाटतंय ? 
का मन इतक बैचेन झालाय ? डोळे बंद केल्यावरही अजून तीच का उभी राहते डोळ्यासमोर ?का ? ? ? 


ती मला अजूनही आठवते .....
कैरीच्या एका फोडीसाठी माझ्याशी भांडणारी 
चिंचेच्या हौसे खातीर मला झाडावर चढायला लावणारी 
लपाछपीच्या डावात मलाच राज्य देणारी 
लपायला माझ्याच आईच्या पदराचा आडोसा घेणारी 

भातुकलीच्या खेळामध्ये शेंगदाण्याची भाजी 
भर दुपारच्या दंग्याने काठी घेऊन मागे धावणारी आजी 
जुईच्या फुलासाठी नाहीच पोहोचला कधी तिचा हात 
लांबसडक वेणीसाठी  तिच्या , नेहाकाकुच्या दारात माझीच वरात 

शेवटी काहीही करून मुलगीच ती , catch कधीच घेतला नाही 
अन बिचारीच्या भातुकलीतला भात तिला कधीच भेटला नाही :)
खाउन  फस्त करून मी , हळूच हात पुसायचो हाफ चड्डीला 
दिवाळीतला किल्लाही बांधायला जमला नाही कधी आमच्या त्या गुड्डीला 

त्यादिवशी बाईसाहेब ओढणी पांघरून आल्या 
मी आपल त्याला पकडून नको इतक्या मस्त्या केल्या 
काही दिवसातच दुपारचा दंगा  दोघांनीही  कमी केला 
तिच्या खोलीला माझ्या आईने नवीन पडदा शिवून दिला 

काकुबाई आता मस्त मस्त साड्या खरेदी करतात 
अन माझ्याशी तिला बोलताना पाहून गल्लीतल्या ४ मजनूंच्या चिता जळतात 
दिवसाची सुरवात माझ्या अजूनही तिच्याच आवाजान होते 
माझ्या आईला रोज न चुकला ती सकाळी फुलांची करंडी द्यायला येते 

रात्री झोप तरी च्यामारी कुठली लागते पडल्या पडल्या
तिचा गुड नाईट message आल्या शिवाय मी माझ्या रजई कधीच नाही काढल्या 
परवा रात्री मी आपला वेड्यासारखा करतोय call 
madamचे आईच्या कुशीत रडून लाल बुंद झालेत गाल 

आई शपथ , रात्रभर माझा mobile तिच्या GN message ची वाट पाहत होता 
नंतर कळल , राजकुमारीला आमच्या एका इंजिनिअर साहेबाचा होकार आला होता 
वाटल ...उगाच गडबड केली बाबांसारख मोठ व्हायची 
सवय झाली होती तिच्या भातुकालीतली शेंगदाण्याची भाजी खायची 

प्रेमबीम असला आगाऊपणा मी कधी नाही केला 
देव जाणो... कुठल्या नात्याने तो आम्हा दोघांना बांधून गेला ?
निखळ मैत्री हा शब्द माझ्या मित्रांच्यात कुणालाच नाही पटायचा 
मी हि कधी प्रयत्न केला नाही, तिला कुठल्या  नात्याने बाटायचा 

कोरड्या डोळ्याने निरोप देईन, अस काही मला वाटत नाही 
तिला पिडायची हौस काही केल्या फिटत नाही 
सांगेन तिच्या नवऱ्याला , थोड्या दिवसांनी तिला घरी राहायला पाठवून दे 
तू तुझ पटकन साधलस बाई , आता मला माझी अर्धांगिनी गाठवून दे   :)

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)