मातृदिन आलो की हो या रविवारी ...
ओह ... सॉरी बरं का ... मातृदिन म्हणजे Mother 's Day हो ....
मातृदिन वगैरे असा अवघड भाषेत बोललं की १० पैकी ८ जणांच्या भुवयांच्या कमानी उंचावतात आणि त्या कमानीखालच्या डोळयांची होते एक प्रश्नार्थक हालचाल .
विषय पटकन लक्षात यावा म्हणून आपलं सगळ्यांना कळेल अशा आपल्या बोलीभाषेतच (आपली मातृभाषा कुठली याबद्दल अजून गोंधळात आहे बरं का मी ) सुरुवात केलेली बरी .
आता या रविवारी बघा कस्सलं प्रेम उफाळून येईल सगळ्यांचं आईवरचं . फेसबुक काय , व्हाट्सअप काय ... सगळीकडे अचानक एक दिवसांसाठी आईचे फोटो दिसायला लागतात . माझं आईवरच हे प्रेम चुकून जरा २ दिवस आधी उफाळून आलं . त्याबद्दल ही कैफियत
दोनशे - तीनशे मातृदिनाच्या लेखांच्या ढिगात माझा अजून एक .... बाकी नवल काहीच नाही .
तर सांगायचं मुद्दा असा ...
सुरुवातीलाच प्रामाणिकपणे मान्य करते की मातृदिन आहे याची मला पुसटशीही कल्पना न्हवती. ७ तारखेच्या संध्याकाळी हे मला कळलं याला कारण म्हणजे लेकाच्या शाळेतून आलेलं आमंत्रण . हो ..... भलंमोठं पत्र छापून आलं होत ना माझ्या नावे :) . "१3 तारखेला शाळेत मातृदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत हजर रहावे. "
हे वाचून लेकाने विचारलंच (शंका न विचारानं राशीन बसत नाही आमच्या ) ... " Mother 's Day जसा असतो तसा आज्जी डे करूया का आपण ? "
हा नातू आजीप्रेमी असल्याचा अजून एक पुरावा ... घ्या
त्याची idea ऐकून भारी वाटलं . त्याचा आणि लाडक्या आज्जीचा एक जुना फोटो मी माझ्या व्हाट्सअप अकाउंटच्या स्टेटसला सेट केला. (व्हाट्सअप अकाउंटच्या स्टेटसला मराठीत काय म्हणतात ते काही मला माहित नाही त्यामळे चुकभुक माफी असावी )
गडी एकदम खुश . आजीच्या मांडीवर बसलेला फोटो बघून .
दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ तारखेला सकाळी सकाळीच मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला . "अगं बया , Mother 's Day आज नाहीये . तो १० तारखेला आहे . आज का लावलाय काकूंचा फोटो ?"
मी एकदम चूप ..... काही बोलायलाच सुचेना की हो . आता आईच्या प्रेमाला मला या मुहूर्तासाठी २ दिवस थांबावं लागणार ? आणि खरंच मला आजचं सांगायचं असेल तिला "आई , तू कसली भारी आहेस ." तर मग ? सगळे असाच समजतील का की हिच्या कॅलेंडरच्या तारखा विसकटल्या ?
तिचा हा फोन संपल्या संपल्या मी सगळ्यांचे स्टेटस धडाधडा वाचून काढले ... सगळीकडे आईच. मग लक्षात आलं , असा फोन करण्यामागे तिची काहीच चूक न्हवती . माझ्यासारखं अजून बऱ्याच लोकांचं आईप्रेम २ दिवस आधी उफाळून आलं . माझं कारण जरा वेगळं होत ही गोष्ट वेगळी , आमचं आज्जी प्रेम होत ओ ते...... आता अजून काय सांगणार .. जाऊ दे ...
मग काय .... Google आपला हक्काचा गुरु . त्याने सांगितलेलं ज्ञान . मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सर्वांनी आपल्या आईवर जीवापाड प्रेम करायचं . हा...... खरी गोम इथे आहे तर . २ वर्षांपूर्वी मी महिन्याचा दुसरा रविवार ८ तारखेला आला असणार ना . मग तीच तारीख नोंदवून घेतली मेंदूने आपल्या आणि म्हणून झालेला हा संगळ्यांचा मातृदिनाचा गोंधळ :)
असो ... इतरांना काय वाटत यापेक्षा मला काय वाटतं हे ऐकून घ्या की एकदा ... आई म्हणजे तो काय सण आहे काय ज्या त्या तारखेला साजरा करायला ?
आई म्हणजे अख्ख आनंदपर्व आहे की आपल्या आयुष्यच . सगळं आनंद तिच्या आजूबाजूला घुटमळत असतो आपला . जरा २ मिनिट आई शेजारच्या काकूंकडे जाऊदे , का बरं लगेच शोधायला उठता तिला ? तुम्हाला खर तर काहीचं नको असतं त्यावेळी आईकडून . पण ती १ मिनिट डोळ्यासमोरून हलून चालत नाही . घर कसं खायला उठतं लगेच . एकटे वाटायला लागतो आपण .
म्हणूनच तर आनंदपर्व म्हटलं तिला . आपल्याला कित्ती भारी वाटतंय हे सुद्धा सांगायला आईच लागले आणि तुम्हाला भारी वाटतंय हे बघून तिला त्याहून छान वाटतं . सगळ्या घरादारात मिसळूनहीगेली इतके वर्ष स्वतःच वेगळं अस्तित्व टिकवून ठेवणारी आजवर पाहिलेली ही एकमेव व्यक्ती ... आई.. मग ती माझी असो वा तुमची ...
सगळ्यांचीच आई कस्तुरीमृग असते .. ती जिकडे जिकडे जाते तिकडे तिकडे सुगंध दरवळत असतो . पण हा सुगंध कुठून आलाय हे कुणाच्या लक्षातही येत नाही . आणि आईला तर हे माहीतही नसत की अख्ख घर आपल्यामुळे दरवळतय. ती आपली अंगणातल्या जाईला , मोगऱ्याला , निशिगंधाला आणि रातराणीचा न चुकता पाणी घालते .
मी आपलं नेहमीप्रमाणे आजही आईला फोन केला . भरपूर वेळ आजही बोलले पण Happy Mother 's Day वगैरे असलं काही म्हटलं नाही बाबा . कसंय ती मला माझ्या जन्माच्या आधीपासून ओळखते . कपाळावर पालथा हात लावून ताप चढलाय का मला हे बघायलाही कमी करायची नाही . वर आणि माझंच हस व्हायचं .
अहो अहो ..... थांबा .... विषयांतर करतेय ... क्षमस्व ....
हे सगळं वाचून तुम्हाला नक्की वाटलं असणार मी असल्या Day च्या विरोधात आहे . तुम्ही काही प्रतिक्रिया देण्या अशीच माझी बाजू मांडते .... तसं अजिबात नाहीये .
३६५ दिवसांपैकी १ दिवस आईच्या नावे केला म्हणून काय झालं .... आई नाही का ९ महिने आपल्या नावे करत ? आणि त्यानंतरचही सगळं तिचं आपल्यासाठीच सुरु असत की .
Day मी ही करतेच की साजरे . आणि तुम्हाला काय वाटलं ? इतकं सगळं लिहिल्यावर मी काय लेकाच्या शाळेत Mother 's Day ला जाणार नाही ? जाणार की हो .... अगदी हौसेनी . माझी ममा (आई म्हणायला शिकलाच नाही हो हा शेवटी ... अव्यक्त दुःख ) किती ग्रेट आहे हे कसल्या शब्दात सांगतोय हे मलाही ऐकायचं आहेच की .
माझा मुद्दा इतकाच ... तुमच्या माहितीपैकी कुणाचं आईप्रेम लवकर व्यक्त झालं असेल तर कृपा करून त्यांना तारखेची आठवण करून देऊ नका . तारखेने सण साजरे करणाऱ्यांपेक्षा आवडीने सोहळे मांडणारी माणसं खरचं भारी असतात आणि दुर्मिळही .
बाकी तुमच्यातल्या सगळ्यांना १3 तारखेच्या मातृदिनाच्या शुभेच्छा !
शुभेच्छेसोबत तारीखही टाकलीये .... अंगात कमी कळा नाहीत .... असच म्हटला ना मला :P