Showing posts with label Collection. Show all posts
Showing posts with label Collection. Show all posts

पैठणी


लाल काठ तिच्या
हिरव्याकंच पैठणीला
अन् पदरावर मोर भरलेला.
गालावारती खळी अन्
गळ्यातला साज खुललेला.
पायात नाजूक जोडव
हातात भरदार बाजूबंद,
नाकात मोत्याची नथ
अन् पैजणांचा नादच वेगळा.
हातातल कंकंण तीच माहेरच अंगण
निखळ हास्य तिच्या चेहर्‍यावरी.
अन् मनी मात्र भरलेल्या
आनंदाच्या सरी.......

~ Unknown

Graceful... ग्रेस

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

ग्रेस 

मनातल घर

जरास मोकळ ढाकळ 
अस एक ' मनातल घर ' असावं 
बाहेरच्या बाजूला 
छानशी बाग असावी
बागेतल्या हिरवळीतून 
घरात जाणारी पायवाट असावी 
     दिवाणखान्यात आल कि 
     घराचा धर्म दिसावा , संस्कृती दिसावी 
देवघरातल्या देवापुढे 
मंद तेवणारी समई दिसावी 
     इथल्या जेवण खोलीत 
     अन्नपूर्णेचा वावर असावा 
शेजघरातल्या खिडकीमध्ये 
तुळस , फुलांचा गंध असावा 
      रम्य अशा सायंकाळी 
      पक्षांच्या किलबिलाटान
      आभाळ भरून जाव 
रात्रीच्या निळाईत 
अख्ख घर 
चांदण्यांनी न्हावून जाव 
अन 
उगवतीच्या सूर्यकिरणा च्या 
प्रकाशान उजळून निघावं 
जरास ....
जरास मोकळ ढाकळ 
अस एक ' मनातल घर ' असावं 

~ Unknown

तूच सांग आता

"तूच सांग आता "
तूच सांग आता 
कस जगायचं ?
लिहिलेलं खोडायच कि 
पानच फाडायच 

तुझ्या आठवणीत डुंबायची
माझ्या मनाला खोड आहे  
कारण तुझ्या आठवणीत डुंबण
हे तुझ्या एवढंच  गोड आहे 
दाटून आलेल्या सायंकाळी 
अवचित सोनेरी उन पडत 
तसच काहीस पाऊल न वाजवता 
आपल्या आयुष्यात 
प्रेम येत 

प्रेम एक स्वप्न 
छान वेलीवर फुललेल 
कुणालाही न कळता 
ह्रदयात दडलेलं 
जे मनातल सांगायचं 
हे तुझ्या ओठांनी 
जमत नाही आणि .....
आणि ते सांगितल्याशिवाय 
तुझ्या डोळ्यांना राहवत नाही 

"तूच सांग आता "
कस जगायचं ?
लिहिलेलं खोडायच कि 
पानच फाडायच 

~ Unknown

विहीणबाई


काल पाजविला मी 
मायेचा पान्हा - पाझर ,
वेल मोगरीची दारी 
नकळत चढली झरझर 

विभ्रम विलोल देखणे 
वाऱ्यापरी अवखळ ,
विसंबले न मी कधी 
दूर केले न पळभर   

लहानाची केली मोठी 
तेल घालूनिया डोळी , 
पूर्ण बहरेल सासरी 
फुलेल पाकळी पाकळी 

चाफ्यासाठी हिरव्या तुमच्या 
जतन केली जाई ,
पालन करा मायेने 
आता तुम्हीच तिची आई 

लाडली लाडकी आमची 
तळहाताचा असे फोड ,
शोभेल तुमच्या घरी 
नारायण लक्ष्मीचा जोड 

चंदन तुमचा लेक 
घासलिया दर्वळे वास ,
माझ्या लेकीच्या गुणांचा 
जाणावे आपोआप सुवास 

श्रीफळ तुमचा लेक 
लेक माझी द्राक्षघोस  ,
लेकीवाचून वाटे आम्हा 
घर भरले ओस - ओस 

भास्कर तुमचा लेक 
लेक माझी चंद्रमा ,
श्री शंभू तुमचा लेक
त्या शोभे माझी उमा 

हिरा पैलूदार दिधला 
माझे रिकामेच कोंदण ,
तुळस वृन्दावानीची दिली 
माझे रिकामे रिकामे अंगण 

नाही दुखावले मूळ 
प्राजक्त ठेविला हाती ,
काळजातील रितेपण अपार 
बाप मायीची आता साथ  

आठवणींची रातराणी ही 
डवरेल माझिया दारी ,
बहर खुडूनी नेता 
घर तुमचे गंधभारी

धनाची दिली पेटी 
पित्याचे उदास मन ,
ओटीत घालते विहीणबाई   
रूप गुणांची माझी खाण 

बाळीला नित लाभावी 
तुमच्या पदराची सावली ,
भर्जरी शेल्याची वेलबुट्टी 
जपा बनून माउली 

लेकीच्या कुशीतून उद्या 
वंश वेलीला लाभेल फुटवा ,
सांजेला गहिवरता लेक 
माहेर तुमचेही आठवा 

कधी पाझरता नेत्र तिचे 
पाठीवरून फिरवा हात ,
माय - पित्याची दाटता सय 
धाडा गौरीला एक रात 

जपा काळजाचा माझ्या घड 
विनविते जोडूनिया हात ,
सुख शांती समाधानाची 
लेक माझी करेल बरसात 

डोळियांच्या पंचगंगेचा महापूर 
धावतो गोदामायीच्या भेटी ,
सांगा कशी विसरावी 
तान्हुलीच्या 
चांदण हाताची गळामिठी 

~ Unknown