जरास मोकळ ढाकळ
अस एक ' मनातल घर ' असावं
बाहेरच्या बाजूला
छानशी बाग असावी
बागेतल्या हिरवळीतून
घरात जाणारी पायवाट असावी
दिवाणखान्यात आल कि
घराचा धर्म दिसावा , संस्कृती दिसावी
देवघरातल्या देवापुढे
मंद तेवणारी समई दिसावी
इथल्या जेवण खोलीत
अन्नपूर्णेचा वावर असावा
शेजघरातल्या खिडकीमध्ये
तुळस , फुलांचा गंध असावा
रम्य अशा सायंकाळी
पक्षांच्या किलबिलाटान
आभाळ भरून जाव
रात्रीच्या निळाईत
अख्ख घर
चांदण्यांनी न्हावून जाव
अन
उगवतीच्या सूर्यकिरणा च्या
प्रकाशान उजळून निघावं
जरास ....
जरास मोकळ ढाकळ
अस एक ' मनातल घर ' असावं
~ Unknown
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)