आज जे काही मनाच्या देव्हार्यात नंदादीपाइतक पवित्र आणि अखंड प्रेम तेवतय ते फक्त तुझ्यासाठी .
रात्रभर चांदण्यांची उधळण फक्त तुझ्यासाठी ...
रात्रीच्या रजईत लपवलेला चंद्राचा हिरा फक्त तुझ्यासाठी ...
पुढे काही लिहिण्याआधी तुझी क्षमा मागते . क्षमस्व ...
कारण अगदी दोन क्षणांसाठी का होईना पण मला तुझ्या सौ चा हेवा वाटला . खरच , फार नशीब घेऊन जन्माला घातलं आहे देवाने तिला . अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या लोकांनाच देव हे भाग्य देतो . ते तुझ्या सौ च्या पदरी देवाने न मागता स्वखुशीने घातलेलं दान ...
पाहिलं असशीलच तू
आभाळाइतका प्रेम करणारा तू ... अजून काय हवंय ?
खर सांगू ? जेव्हा तू म्हणालास न ..
" प्रेमान जवळ घेणार कुणी असेल
तर जास्तच जवळ याव वाटत "
अगदी त्या क्षणी , तुझी सौ तुझ्या डोळ्यात अखंड दिसत होती . हात पसरून उभी ...
निरपेक्ष प्रेम बघून
इतका नाजूक हसलास
खर सांग तेव्हा
तुझ्याजवळ तू किती उरलास ?
आणि अगदी असच झाल ... सगळीच्या सगळी सौ तुझ्याकडे अगदी वाऱ्यासारखी धावत आली . तू तुझ्या हक्काच माणूस जाताना स्वतः बरोबर घेऊन गेलास आणि रात्रभर कस्तुरीमृगाप्रमाणे आपल्याजवळील कस्तुरी बाहेर शोधत झोपी गेलास
अरे .... एकदा डोळे बंद कर आणि अगदी मनापासून तिला साद घाल .
बघ ... लगेच आवाज देईल ती ."ओ ..."
कुठून आला रे हा आवाज ?
बाहेरून ??? नाही ...
शेजारून ??? नाही ...
हा आवाज तुझ्या आतून आला . इतक्या अलगदपणे ती तुझ्यात एकरूप झाली कि कधी तुला कळालाही नाही.
आई जस आपल्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवते . आपल्याच शरीराचा एक भाग बनवून . तसच काहीस ..त्यापेक्षाही जास्त .तूला तुझी सौ सांभाळायची आहे .
आयुष्यभर ... तुझ्या श्वासातला एक अखंड श्वास बनवून
रात्रीच्या कुशीत शिरून पाहिलेल्या गोड स्वप्नांना जोपर्यंत पहाटेची कोवळी पालवी फुटेल तोपर्यंत ही गुलाबाची कळी तुला अशीच सांभाळायची आहे ......
तळहातावर घरट बांधून ....
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)