मी उगाचच हळहळतो
पाहून झाडताना पारिजाताचा सडा
आणि मला लोक म्हणतात
" हा खरा वेडा... "
हे वाचल असेलच या पूर्वी कुठेतरी
आजची ही कविता वाचून तुम्ही असच काहीस म्हणालं
" पारिजाताचा सडा पाहून हळहळनाऱ्या वेड्यानंमध्ये आता हिलाही मोजायला हरकत नाही "
:)
असो .... असं म्हटलत तरी चालेल मला
पण तो सडा पाहून मलाही गलबलून येत
ज्या पानांशी आयुष्यभर सोबत केली .. त्यांना सोडून या पारिजाताच्या फुलाला जमिनीवर याव लागत ... एक दिवसच आयुष्य
सुवासाची देणगी मिळालेली असूनही
आणि तरीही ..
तरीही ही सुवासाची उधळण अखंड चालूच असते ...
कुणी त्याला पायदळी तुडवलं तरीही
असाच एक प्रयत्न ....
काय वाटत असेल परीजातला ?
जर त्याला बोलता आलं असत तर ..... काय बोलला असता तो पारिजाताचा सडा ?
परवा माझ्या मनाला
मी हसताना पाहील
पापण्यांच्या काठावरच पाणी
पुसताना पाहील
ओलावलेले नयन
ओठांवर हास्य
मुक्या या शब्दांनी
लपवली कितीतरी रहस्य
जगायचं असेल इथं
तर हसावच लागत
दुखऱ्या या वेदनेला
सोसावच लागत
वेदानासुद्धा कधीकधी
शिकवते खूप सार
का गळत फुल प्राजक्ताच
जेव्हा वाहत वार
सुमनांचा तो सडा
दिसायला सुंदर दिसतो
पानाच्या विरहात मात्र
ढसढसून रडत असतो
बघणारा समजतो दवबिंदू
त्याच्या अश्रुथेम्बला
आणि म्हणतो मेघगर्जना
पावसाच्या फुटलेल्या हुंदक्याला
दुनियेस वाटले मी
चांदणे अवसेचे
हृदयात कोंडले मी
काळोख पावसाचे
वाहणारा वारा
हलणारी पान
कुणी सांगाव केव्हा
बदलेल हे सार
गालांवर ओघळणारे थेंब
ओठातल्या हस्यात येवून मिळतील
बघणाऱ्या प्रत्येकाला तेव्हा
माझ्या वेदना कळतील
पाकळीवरच हे हसू
नेहमीच फुलत राहील
आणि झडवणारी पानगळ सुद्धा
माझ्या सुवासाकडे कौतुकाने पाहील
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)