आज ८ फेब्रुवारी .....
आणि तो दिवस उजाडला
propose day
त्या निमित्ताने काहीतरी सुचत जाईल तसच्या तसं उतरवलय इथे :)
आवडेल अशी आशा
तो आणि ती दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखत होते .. तशी त्यांनी ४ वर्ष एकत्र काढली होती इंजिनीयरिंगची. एकदम गळेपडू किंवा कुणीही येवून उगीचच चर्चा करून जावी अशी काही मैत्री न्हवतीच त्यांची.
दोघांना एकत्र आणण्याचं काम केल ते त्यांच्या रिझल्टनी .
" पुस्तकी किडा " कॅटेगरीत मोडणारे होते ते ... अगदीच आदराने बोलायचं झाल तर खरच ... दोघेही University Topper :) सेमिनार्स आणि प्रोजेक्ट ची डिस्कशन करत करत कधी एकमेकांत गुंतले गेले कळलही नाही दोघांना.
ती त्याला नेहमीच म्हणायची " कसा रे तू असा . कुठलीच मुलगी नाही आवडत तुला . अशाने बायको कशी शोधणार ? कसा होणार आमच्या साहेबांच देव जाने " .
तिच्या या कमेंटवर त्याच मान हालवत उत्तर " मिळेल हो मिळेल ... सापडली कि पहिले तुलाच कळेल :) " हि आणि अशी बरीच जुळवा - जुळवीची उत्तर .. पण त्याच्या " तिला " कधी साधी शंका हि नाही आली कि हे सगळ तो आपल्याबद्दल बोलतोय . ती आपली सेमिनार्स , पझल्स आणि टक्केवारीच्या पुढे कधी गेलीच नाही
त्याने तिला कॉफीसाठी विचारलं ... कधी न्हवे ते madam स्वतःच practicle चुकवून कॉफी घ्यायला जायला तयार झाल्या. तिने कॉफी साठी हो म्हटल्यापासून याच्या काळजाची धड - धड मात्र वाढतच चालली होती . AC त बसून घाम सुटायला लागला होता .
" काय म्हणेल ती कोण जाने ? कशी react होईल? हो म्हणेल ? कि काहीही न बोलताच उठून निघून जाईल ? काहीही झाल तरी मला माझी इतकी चांगली मैत्रीण हरवायची नाही . बाकी तिने काहीही म्हणावं बस..... आजपासून बोलू नको माझ्याशी अस काही सांगायला नको . आई शप्पथ .... इतक टेन्शन कंपनीच्या इंटरव्ह्यू वेळीही न्हवत आल मला "
तो विचारच करत होता ... तितक्यात ती आली . नेहमीप्रमाणे अगदी Good Girl सारखी येउन त्याच्या समोर बसली .
काय घेणार रे तू ? मी तर नेहमीच sandwich .. तुला काही हवा असेल वेगळ तर सांग . त्यानंही कोरडा पडलेला घसा ओला करायला ज्यूस मागवला
पहिले १० -१५ मिनिटे तर त्याला काहीच बोलायला सुचेना ...पण काहीतरी बोलावच लागेल म्हणून त्याने शेअर मार्केटच काहीतरी सुरु केल ... जे तिच्या डोक्यात काही केल्या शिरेना . सगळे बाउन्सर .... ती नुसतीच हो.....हो.....करत होती
शेवटी धाडस करून त्याने विषयाला हात घातला
तो : मी काहीतरी सांगायला बोलावलं आहे तुला इथे
ती : (आता ह्याने कोणतातरी नवीन पझल शोधून आणाल असणार. डोक्याला नवीन खुराक) काय झाल रे ? काही प्रोब्लेम झालाय का ? सेमिनार ला जायचं का ? मी तयार आहे तुझ्या ग्रुप मध्ये यायला .
तो : ( काय सांगणार आता हिला ? प्रोब्लेम तूच आहेस . म्हणून तर बोलावलंय इथे तुला . ए UT आता बाहेर ये अभ्यासातून . माझा निकाल लागायची वेळ आलीये ग ... ) मला एक मुलगी आवडते .
ती : (आता ही कोण नवीन ...मला विचारलं असत याने ... तर एका मिनिटात मी हो म्हटलं असत )
काय सांगतोस .... जगातलं आठवे आश्चर्य म्हणावं लागेल. :) आणि हो रे ..मुलगी आवडायला तू मुलींकडे पाहायला कधीपासून लागलास ? गेले ४ वर्ष मी इतक्या मुली दाखवल्या तुला ..एकीकडेही वळून पहावास वाटल नाही तुला ... आणि अचानक 'मला एक मुलगी आवडते ?' .
हे पहा .. तू माझी चेष्टा करायची ठरवली असशील तर तस सांग .
तो : अग बाई ...बोलू का मी ?
ती : बोल बोल ... आज तूच बोल ..मी ऐकणार नुसत . कळू तरी दे मला अशी कोणती अप्सरा आवडली तुला . Mr . मजनु .... नाव कळेल का आम्हाला तुमच्या लैलाच ?
(तो शांतच ...... काय आणि कसा सांगाव त्याला कळेना )
ती : अरे बोल की ..... उखाणे आठवतो आहेस कि काय बाबा आता ?
तो : तू ... हो तूच
त्यानंतर सगळीकडेच स्मशान शांतता . तो तीच्या उत्तराची वाट पाहत होता.आणि ती ...ती मात्र एकदमच निश्चल ...काय ती पापण्यांची हालचाल जाणवत होती तिच्या फक्त .
एका सुंदर जलाशयात एक सुवासिक फुल वरून पडाव . अगदी अनपेक्षितपणे . २-३ तरंग उठावेत जलाशयाच्या पृष्ठभागावर.. आणि फुल तसच पाण्यात विरून जाव .... तरंगासहित.... पुन्हा जलाशय शांत ..निश्चल ..
तसच काहीस झाल तीच . उपरवाला देता है तो छपर फाड के देता है ..म्हणतात ते काही खोट नाही . जे स्वप्न कधी तिने झोपेतही नाही पाहिलं ते आज जागेपणी तिच्यासमोर उभ होत ..तिच्या हो ..ची वाट पाहत .
त्याच्या नजरेला नजर मिळवायची तर हिम्मत हि होईना तिची . कंप सुटलेल्या हातातून sandwich आपोआप प्लेट मध्ये पडू लागल. त्याने ज्यूस चा ग्लास पुढे केला . बिचारीच तो हि ओठापर्यंत पोहोचेना .
ती : (काय सांगू याला ? कस सांगू ? आजपर्यंत फक्त तूच मला आवडलास . आणि त्याने खरच माझी मस्करी केली असेल तर .. विनाकारण हसत बसेल पुढे आठवडाभर...
आणि खर असेल तर ? तरीच हा कुठल्या मुलीकडे वळून पाहायचा नाही . )
तो : मी वाट पाहतोय उत्तराची तुझ्या . जे वाटेल ते मनापासून सांग .
२ दिवस भाषणाची तयारी करावी आणि ऐनवेळी व्यासपीठावर काहीच आठवू नये अशी काहीशी अवस्था होती तिची . कस सांगाव हो म्हणून ?
कसतरी धाडस करून तिने आपली नजर वर उचली .. त्याची नजर तिच्यावर केव्हापासून खिळली होती . काय बोलाव सुचेना ...बस ...त्याच्याकडे पाहून तिने एक सुंदरस स्मितहास्य केल . आणि तिच्या गालावरच्या खळीत त्याच सगळ टेन्शन विरघळल . एक मोठ्ठा उसासा सोडला त्याने आभाळाकडे पाहत . जग जिंकल्याचा आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर आज . आणि तिच्या ... तिला तर तीच जगच मिळाल होत .
देवाने न मागता तिच्या पदरात टाकलेलं हे दान :)
Its true :)
ReplyDeleteAwesome writing Amruta
Keep rocking
:)
Thank you so much
Deleten yes ...Its true story :) with dates as well
khupach sundar........ Apratim ..
ReplyDeleteGod bless you n your family :)
Thank you Sneha.
DeleteGreat Amurta.
ReplyDeleteThank you Bhauji :)
DeleteGreat Amruta !!
ReplyDeleteThank you Rajani :)
DeleteKharach khup sundar....Tu je kahi lihilays te vachtana feel kelay mi...
ReplyDeleteThank you so much Haresh :)
DeleteWow...simply beautiful as like you!!! :)
ReplyDeleteThank you Gayatri
DeleteThe best write up on your blog!
ReplyDeleteThank you Kumar Kaka:)
DeleteNICE TO READ TRUE LOVE STORY..
ReplyDelete:)
ReplyDeleteThanks Swati
:)
ReplyDeleteThanks Swati
Khup chaan....Amruta...Lovely presentation
ReplyDeleteThank you :)
DeleteAwesome representation!!!
ReplyDeleteThank you 😊
DeleteAwesome representation!!!
ReplyDeleteThank you 😊
DeleteKhup sundar lihila aahes👍👌
ReplyDeleteThank you 😊
DeleteAwesome..Stay happy.
ReplyDeleteThank you dear 😊
ReplyDelete