कसा ठेवू विश्वास ??


चेहऱ्यावरचे रंग.. कपडे बदलावे तसे बदललेस 
दोघांसाठी आवाजाचे चढ-उतारही वेगळे दिलेस 
फरक तर तुला कधीच नाही पडला माझ्या असण्या - नसण्याचा 
मग आता अट्टाहास कशाला मागच सगळ पुसण्याचा ?
हक्क गाजवायला ... तुझ्या मालकीच होत का धन ?
हात नाही कापला ... ओरबडताना माझ मन ?
कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??
परत अस घडणारच नाही 
वाळूचच घर ते ...कशावरून मोडणार नाही



देव सुद्धा धजावत नाही बांधल्या गाठी सोडायला 
माझच घर मिळाव तुला राज्य करण्यासाठी फोडायला ?
आपल्या - परक्या नात्यातही  बराच असतो कि रे  बाप्पा भेद
बांधलेल्या धाग्यातही निघू शकतो कधी कधी असा छेद
चिखल उडवायला .... तुझ्या दाराची होती का ही तुळस ?
माझच अंगण सारवायला निघालीस ... माझ्या उंबऱ्याचा मोडून पळस   
कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??
माझ घर कधी उकरणार नाही 
नंदादीप लावणाराच  ... माझा देव्हारा पोखरणार नाही











ओठात एक न पोटात एक .. कस जमत वागायला 
कुठल म्हणून लक्षात ठेवायचं ... चुकीची माफी मागायला   
वाट दुसरी दिलीये ठरवून  देवाने सगळ्यांना चालायला 
मी म्हणते .. का याव ... माझ्या गुलाबात वाटा घालायला ?
आलं होत लक्षात ... मग सावरता नाही आलं स्वतःला वेळीच ?
का टाहो फोडणार नाही ... माझ रक्तबंबाळ काळीज ?
कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??
खपली परत उघडी पडणार नाही 
पाठीवरचा मायेचा हातच छातीत अस्त्र सोडणार नाही 


कसा ठेवू विश्वास ??
कसा ठेवू विश्वास ??

Forgiving someone is easy but being able to trust them again is totally different thing. :)




2 comments:

  1. Chaan ahe... pan kharach khoop bhayankar ahe... kharach jar asa koni vagal asel... tar vishwas na thevlelach bara.... :)
    pan kharach asa kahi hot ka...??

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय वाचकहो,

      हे माझं भावविश्व...

      यातील सर्व पात्र व कथा काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. आढळल्यास योगायोग समजावा.

      मंडळ आपले आभारी आहे :)

      Delete

Thank you for your comment :)