घरट्यातल्या पाखरांना
क्षितिजापल्याड फिरताना
इवल्या इवल्या नजरेन
आभाळ भरताना
निरभ्र मनाने घिरट्या घालताना
पाहील होत मी सावन सरताना
तळपणारा भास्कर
जलधारात शिरताना
इंद्रधनूची कमान
रेखीवपणे कोरताना
मेघाराजासमोर आनंदाने हरताना
पाहील होत मी सावन सरताना
बरसणाऱ्या धारांना
काळ्या मातीत मुरताना
जीवापाड काळेपणावर
प्रेम करताना
थेंब न थेंब मोती होवून पेरताना
पाहील होत मी सावन सरताना
वाहणाऱ्या वार्याला
गारवा चोरताना
सुगंधासाठी राताराणीभोवती
फेऱ्या मारताना
रिमझिमताना भिरभिरताना
पाहील होत मी सावन सरताना
हळव्या मनाला
डोळे भरताना
कुणाच्या तरी आठवणीत
तिला घेरताना
मुक्यानेच आज त्याला साद घालताना
पाहील होत मी सावन सरताना
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)