चुकलच आज ...पण कुणाच ?

दिवसभर एकट  एकट वाटतंय
डोळ्यात विनाकारण पाणी दाटतय
बोलले असेन कमी जास्त काही
पण मनात माझ्या अजूनही तसं काहीच नाही
चुकलच आज ...पण कुणाच ?

मी ही गेले निघून काही न ऐकता
तू तरी थांबवायला हवं होतस
चेष्टा केली ग तुझी .....
मी नाही म्हटलं पण तू तरी म्हणायला हवं होतस
चुकलच आज ...पण कुणाच ?

अजून तिथेच उभा आहेस माझी वाट पहात
देऊन तरी बघायचास एकदा मला आवाज
माझी पावलांनी वळायच धाडस नाही केलं
का  असा हा  एकटीच प्रवास ?
चुकलच आज ...पण कुणाच ?

बोलायचं होतं ... पण शब्दच फुटले नाहीत
एकदा जवळ यायचं होतं तुझ्या ...पण शहारेच उठले  नाहीत
बस्स.. दूरवर उभा राहून परक्यासारखं पहात राहीलास
म्हणूनच कदाचित मी तिथे थांबले सुद्धा नाही !!!!
चुकलच आज ...पण कुणाच ?


पण तरीही.... तू माझाच आहेस .....
आणि मी आजही फक्त तुझीच
मी तुला शांत करायला हवं होतं
किंवा तू तरी मला समजून घ्यायला हवं होतस
पण....
पण.....
चुकलच आज ..
पण नक्की कुणाच ?

~ अमृता