टकामका टकामका काय शोधात असतोस?
खळखळून असा किती छान हसतोस
शेजारच्या चिंटूची school bus ही तुझीच
अन भारी आवडते तुला विसकटायला भाजी
घरभर धावतोस लावून पाठीला सॅक
बाबा कसे म्हणतात .... हे आमच Pillupack
:)
नवा नवा ड्रेस नवे नवे shoes
काकाची पोमपोम (कार) तर कसली cute
मऊ मऊ केस, किती छान हेअरस्टाइल
सगळे बघ कसे वळून देतात तुला स्माइल
छुम छुम करत धावत आली स्वारी
मावशी कशी म्हणते ..... ही आमची गुत्टूकली
:)
बोळंक्यातूनच हसताय कधी यायचे दात ?
भरवायचा आहे तुला दुध आणि भात
पाउल पाउल टाकत अंगण केलंस सर
तुझ्याच मागे धावतंय आता सगळ घर
कोण कोण येतात खेळायला झंप्या गम्प्या आणि गोप्या
आबा कसे म्हणतात .... हा माझा पोप्या
:)
खरं सांगू ... हल्ली कृष्ण अगदी तुझ्या सारखा दिसतो
तो ही या पायरीवर लोणी खात बसतो
लोण्याचाच शिखर त्याचा या राउळाला
अन दृष्ट झालीये बघ तुझ्या या जावळाला
अंधार झाल्यावर कुशीत शिरून झोपायाचीच तुला घाई
आणि म्हणे ..... जवळ घेते ... हीच माझी आई
:)
For my cute PRINCE :)
ReplyDeleteLovely... :)
ReplyDelete