मुड़कर न देखना.....

प्यार तो हजारोसे पाओगे 
खुशबू नजारोसे लाओगे 
हमें ढून्डते हुए मगर 
कहा तक जाओगे ?

हमें मत पुकारना 
आवाज नहीं देंगे 
क्या पता आपसे 
बहोत दूर होंगे 

आखोंमे यादो की नमी
पलाकोंको रुला देगी 
दिलमे हमारी कमी 
आपकोही गिला देगी 

दुनियाकी मुस्कराहट कही 
कम सी लगेगी 
एक अधुरिसी शाम 
गम सी लगेगी 

याद आ अगर 
तनहाईमें कही 
प्यारभरी हमारे लिए 
मुस्कराहटही सही 
  
लौट जाओ यहासे 
आगे चल नहीं सकेंगे 
हमारी तलाशमे कभी 
चलातेहुए रुकोगे 

थक गए तो पल्कोंको 
आखोंसे मिला लेना 
दिलकी आवाजसे हमें 
एकबार बुला लेना 

हम आयेंगे जरुर 
अगर अभी आ सके तो 
हमारेलिये फिरसे एकबार गाना 
अगर गा सके तो 

बिना अलविदा कहे जाओगे 
तो हम रूठ जाएँगे 
आपके जानेके बाद 
कसमसे...... टूट जाएँगे 

पर मुड़कर न देखना 
जा नहीं पाओगे 
रो पड़े  हम गलतीसे कही 
तो वापस आ भी नहीं पाओगे 


कुठल कोडं सोडवलं ?

पुराच्या पाण्यातून तारलं अन
किनाऱ्यावर आणून बुडवलं 
कळलंच नाही नात्यातला 
कुठल कोडं सोडवलं ?

तळपत्या उन्हात् सुद्धा तिन 
नाही मागितली सावली 
पण कोसळत्या पावसात तिला 
टीप गाळायला लावली 

ओठावरच हसर गाण 
तिच्यासाठी खुडल पण 
रंगलेल्या मैफिलीत तिला 
एकटीला आणून सोडलं 

काचेची सुंदर मूर्ती 
चुकून हातून  सुटली 
जपलेली आठवण त्याच्याच 
डोळ्यासमोर फुटली 

फुललेल्या फुलातला 
गंधच वाहून गेला 
बिलगलेला थेंब  
पाकळीला सोडून गेला 

मोत्यासारखी सजवली  होती
पायाखालची माती
 तिच्या पावलाखाली उरली 
आता फक्त विस्कटलेली रेती  
    
दोघांची ओंजळ भरलेली 
पण देण्यासारख उरलच नाही 
वाट अडवून धरलेली 
पण पाउल तिकडे वळलाच नाही 

बोलायला हव होतं 
ते मनातच राहून गेल 
अन उरलेलं सगळ तिच्या 
डोळ्यातून वाहून गेल 

                          " मुळातच नात जुळल नाही तर 
                            तुटण्याच दुः ख जाणवत नाही 
                            पण जुळलेल नात तुटलं तर 
                            होणार्या वेदनेस अंत राहत नाही "

काय राव ..हे काय बर आहे.....

नेहमीच हे अस कस रे ... 
तिनं करायचं miss आणि तू करायचा call ?
तू गुणगुणत असलेल्या गाण्यालाच
लावत असते ती नवीन चाल ?
काय राव ..हे काय बर आहे....मनापासून सांग..जे खर आहे !

नेहमीच हे अस कस रे ...
जीव ओवाळून टाकावा इतक प्रेम 
पण रोज रोज तीच लिहिणार letter 
इटुकली पिटुकली भांडणातल तीच cute cute smile 
अन तू मात्र म्हणणार ... hmm Thats better 
काय राव ..हे काय बर आहे....मनापासून सांग..जे खर आहे ! 

नेहमीच हे अस कस रे ...
आवडीच तिच्या रटाळ नाटक म्हणजे 
तुझ्या डोक्याला होणारा नेहमीचा त्रास 
अन नेमका उम्बरयातच कसा येतो रे तुला 
तिच्या तळलेल्या भजीचा वास ?
काय राव ..हे काय बर आहे....मनापासून सांग..जे खर आहे ! 

नेहमीच हे अस कस रे ...
पहाटे उठून .. आल्ल घालून केलेला चहा 
तापाने जिभेची चव गेलेली असली तरी ...वाटतो तिला फिका 
आणि म्हणे ... कित्ती कराल ऑफिस ऑफिस ?
बायकोची काळजी घ्यायला शिका 
काय राव ..हे काय बर आहे....मनापासून सांग..जे खर आहे !


नेहमीच हे अस कस रे ...
किमान एक तास तरी लेक्चर नक्की ऐकावं लागणार
जर घातलीस चुकून कधी कोणाला एखादी शिवी 
पण कधीतरी हळूच सांगते ...जमल तर बघा 
मला जाऊबाई शिवाजी पेठेतील हवी :D 
काय राव ..हे काय बर आहे....मनापासून सांग..जे खर आहे !

नेहमीच हे अस कस रे ...
तिच्या आवडीच .. ते ग्रीन कलरच bedsheet 
तू म्हणणार ......हे काय पिराच अंथरून घातलंय ?
अन तुझ्या आवडीचे पिवळे सोनेरी पडदे पाहून madam रोजच म्हणतात 
साहेबांनी आमच्या घर पिवळ धमक करून टाकलाय :D 
काय राव ..हे काय बर आहे....मनापासून सांग..जे खर आहे !


नेहमीच हे अस कस रे ...
तुला अजूनही जाणवतंय नेमक तिला कधी काय वाटतय
तीच आपल उगच ... आपल कुठेतरी चुकतंय 
आपल्या या प्रेमाच्या गोष्टीत चूक भूल सगळ मान्य 
संसाराच्या जमाखर्चात ...फक्त प्रेमच  जमा आणि भांडण शून्य  
काय राव ..हेच बर वाटतंय ....
मनापासून सांग..तिच्यासोबत राहताना सगळ सगळ पटतंय :)