हे नेहमी असच होत हो




केस कुरवाळत, पावडर लावत प्रेमाच्या सुरात 
अचानक आज विचारलं तिने आपल्या देखणेपणाच्या तोऱ्यात 
" झालेय न मी पूर्वी इतकी स्लिम ट्रिम पुन्हा ?"
मी :  हो …. डोळ्याखाली दिसत आहेत सगळ्या अशक्तपणाच्या खुणा :(

हे नेहमी असच होत हो …. 

ती आपली दाखवत असते खिडकीतून बहरलेली झाडं 
त्याचवेळी दिसतात नेमकी मला तिची बाहेर आलेली हाडं 
फिगरच्या नावाखाली हल्लीच्या पोरीं सगळ्या  नाटकी 
jeans मात्र टाईट हवी , मग नसेना का त्यात  १० ची नोट फाटकी 
   
हे नेहमी असच होत हो …. 

ती आपली कौतुकाने आकाश असते न्याहाळत 
मला मात्र त्या ढगांच्या आकारातलं काहीच नाही कळत 
वाटतो … गादीतला कापूस विस्कटून झालाय नुसताच कचरा 
आणि ती म्हणते …थांबा ,  ढगांच्या गर्दीतून सुटलेल्या किरणावर कविता लिहिते जरा  

हे नेहमी असच होत हो ….

दिवसभर पिल्लाच्या poems गात असते ती सुरात 
सुट्टी दिवशी फुटबॉल घेऊन मी अन पिल्ला दारात 
कृष्णाची अंगाई , शिवाजीचा पाळणा सगळचं तिला म्हणता येत
मी झोपवायला गेलो तर pillupack  खेळायला जाग होत 

हे नेहमी असच होत हो ….

अगदी सहजपणे resolve करते माझी error कधीतरी 
मला आपलं उगाच वाटत , कामात अडकत चालली आहे बायको माझी घरी :)
कधी कधी वाटत … multitasking तर तिने कोळून पिलंय अगदी
मीचं सारखं वाचत राहतो उगाच तिच्या कामाची यादी :)

हे नेहमी असच होत हो .....


' ये जवळ ' म्हटलं असतस

तू गेल्यापासून ...

अख्खं आकाश या पाठीवर एकटीने झेललंय 
सगळ ओझं कित्ती दिवस एकाच खांद्याने पेललंय 
२ मिनिट विश्रांती मलाही हवी होती 
तुझ्या खांद्याची उणीव आजही नवीच होती 
कुणासमोर मोकळ करू मन , काठोकाठ भरलं होत 
फक्त ' ये जवळ ' म्हटलं असतस तरी पुरेसं होत

डोळ्यातलं पाणी आणताच नाही काठावर 
कुठलंच दुखण हल्ली कण्हत नाही ओठावर
डोक्यावर हात फिरवला असतास तरी शमल असतं 
पुन्हा एकदा सगळ मला एकट्याने जमल असत 
काय झालंय ? एकदातरी विचारायला हवं होत 
फक्त ' ये जवळ ' म्हटलं असतस तरी पुरेसं होत

वेळकाढूपणाची कुठलीच न्हवती दिली कारणं 
नाही सापडलं कुणी म्हणून न्हवत मांडल तुझ्यासमोर गाऱ्हाण
रात्र रात्र जागून माझेही डोळे दमलेत 
तुला न दाखवलेले बरेच काटे पावलात झोंबलेत
बडबडणार मशीन आज नको इतक शांत होत 
फक्त ' ये जवळ ' म्हटलं असतस तरी पुरेसं होत  :'(