तू गेल्यापासून ...
अख्खं आकाश या पाठीवर एकटीने झेललंय
अख्खं आकाश या पाठीवर एकटीने झेललंय
सगळ ओझं कित्ती दिवस एकाच खांद्याने पेललंय
२ मिनिट विश्रांती मलाही हवी होती
तुझ्या खांद्याची उणीव आजही नवीच होती
कुणासमोर मोकळ करू मन , काठोकाठ भरलं होत
फक्त ' ये जवळ ' म्हटलं असतस तरी पुरेसं होत
डोळ्यातलं पाणी आणताच नाही काठावर
कुठलंच दुखण हल्ली कण्हत नाही ओठावर
डोक्यावर हात फिरवला असतास तरी शमल असतं
पुन्हा एकदा सगळ मला एकट्याने जमल असत
काय झालंय ? एकदातरी विचारायला हवं होत
फक्त ' ये जवळ ' म्हटलं असतस तरी पुरेसं होत
वेळकाढूपणाची कुठलीच न्हवती दिली कारणं
नाही सापडलं कुणी म्हणून न्हवत मांडल तुझ्यासमोर गाऱ्हाण
रात्र रात्र जागून माझेही डोळे दमलेत
तुला न दाखवलेले बरेच काटे पावलात झोंबलेत
बडबडणार मशीन आज नको इतक शांत होत
फक्त ' ये जवळ ' म्हटलं असतस तरी पुरेसं होत :'(
काय झालंय ग..? :(
ReplyDeleteकविता सुचली … बाकी काही नाही :)
Delete