स्विमिंग स्विमिंग खेळताना , पोटावर आईच्या अलगतच घेतली उडी
काठीच घेऊन आले हे बाबा … वाटलं देतात आता एखादी छडी
तसा माझा बाबा कध्धी कध्धी चिडत नाही
डोळे करतो मोठे मोठे , पण त्याचा आवाज कधी वाढत नाही
आईला होता विचारात …. लागलं का ग फार ???
विचारतोस का रे कधी मला …. खाल्ल्यावर आईचा मार ?
त्याचं हे असलं वागण माझ्या डोक्यातच शिरत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
" कर रे अभ्यास " म्हटल्या म्हटल्या येउन बसतो ना मी मांडीवर
आता कसं कळेल मला पोपट पिंजऱ्यात राहतो की फांदीवर
परवा नाही का , मामा आजोबांच्या गेलो होतो घरी
पोपट चावला बोटाला तुझ्या …. तेव्हा घाबरली होतीस खरी
आता मग हा पिंजऱ्यातून फांदीवर उडाला बर कधी ?
पुस्तकवाल्या काकांना सांग …. पोपटाच घर पिंजरा… असं लिहा आधी
पुस्तकात वाचून पाठ करायला … मी काय रट्टा मारत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
काल आई म्हणाली चल तुला A B C D शिकवते
फळ्यावर लिहिताना ही I ची दांडी कशाला इतकी वाकवते ?
विचारलं तर म्हटली …… याला J म्हणतात रे बाळा
पण परवा मी याच J मध्ये पाहीला … माझ्या छत्रीचा अडकलेला गळा
त्याला म्हणे म्हणतात छत्रीचा वाकलेला दांडा
हिला काही अभ्यास येत नाही हो …… म्हटलं उगाच कशाला हिच्याशी भांडा ?
दांडी बिंडी वाकवायला …… मी काय तुझ्या I चा एकुलता एक पाय चोरत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
म्हणाली D for Dog, पण D ला काढलीच नाही शेपूट
कधी सांगते B for Ball तर कधी सांगते बूट
बिना शेपटीचा Dog कधी कसा असू शकतो ?
दर वेळी वाद घालून शेवटी मी मात्र थकतो
O for Orange म्हणताना करते चंबू ओठांचा
Potter का काहीतरी शिकवते , जे गारवा देतात माठांचा
या Potter आणि Porter मधील फरक काही केल्या डोक्यात शिरत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
वैताकून म्हटली … चल तोंडी अभ्यास करू
बोलायला आपल्याला कारणच लागत … माझ्या तोंडाचा पट्टा सुरु
१० तोंडवाल्या राक्षसाच विचारत होती मला नाव
दसऱ्याला जाळला म्हणतात …… नको त्याची आठवण कशाला राव ?
त्या अशोक स्तंभवाल्या काकांनी ठरवलंय म्हणे ४ सिहांना पाळायच
(भारताच्या प्रतिक चिन्हाचा अपमान करण्याचा हेतू नाही …… इथे बालमन बोलताय )
मला वाटलं …… भरपूर तोंड असणाऱ्या सगळ्यांनाच जाळायचं
४ असले की आदर …… आणि १० वाल्याला जाळण , ही आकडेमोड आता परत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
अलिमन्स अलिमन्स म्हटलं तर तिला काही काही कळेना
( अलिमन्स बंर का …अनिमल्स नाही )
कपाळावरच्या आठ्यांचा गणित तिच्या काहीच कसं जुळेना
बाई …… Tiger , Lion , Elephant ला अलिमन्स म्हणतात , शेवटी सांगितलं हो समजावून
वेड्यासारखी अलिमन्सवर दिवसभर हसली मला कडेवर घेऊन
अशी कशी सगळ विसरते ही …. टिचरची भिती कशी मनात धरत नाही ?
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
झाली आज्जीशी बोलायची वेळ सांगून काढला कसातरी पळ
भोकाड पसरून बसेल उगाचम्हणून सोसली इतकी कळ
S for Skype दिसलं ना ……… laptop सुरु झाल्यावर :D
हात जोडून राहिली हो उभी , हुशारीच दर्शन झाल्यावर
मी ही देऊन टाकला आशीर्वाद ……
बाप्पा तुला अभ्यास करायची बुद्धी देओ, आपण आईची तक्रार बाप्पाजवळही करत नाही
माझ्या घरी ना …… कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही
ag .... ha tuza krush barach upadwyapi disatoy g :)
ReplyDeletepan ahe hushar....
itakya lahan wayat tuala barach yet nahi