तो आहे ना . करेल तो , पाहील सगळ …… हे अगदी नेहमीचे शब्द . पण तो घरी नसतो तेव्हा ?
काहीतरी कारणाने एखाद्या दिवशी खरंच तो घरी नसतो …. घर खायला उठत राव !!!
सकाळपासून ३ वेळा तरी उघडलंच दार , माहीत आहे तो नाही येणार आज
पण मग पायऱ्या चढणाऱ्या त्याच्या पावलांचा कुठून आला आवाज ?
धुक्यापासून ते उन्ह डोक्यावर येईतोवर ८ फोन तरी झालेच की हो करून
तरीही त्याचा तो आवाज मला असा का बसलाय घेरून ?
घर आज पहिल्यांदा इतक शांत शांत वाटतंय
२ दिवसांचाच तर प्रश्न , तरीही आठवणींच वादळ दाटतय
रोजच्या जेवणात ही आज केलाय फक्त वरण आणि भात
कसय …… त्याच्याइतकं चवी - रवीच घरी कुणीच नाही खात
रोजच्या त्या स्पेशल डिश मागे माझा वेळ नाही पुरायचा
दिवसभर नवीन पदार्थांनी कसा स्वयंपाक कट्टा भरायचा
आज सकाळी अर्ध्या तासातच आटपल की हो दिवसभराच गाण
वाटतंय , उपाशी ठेवणार मला त्याच हे असं जाण :(
दिवस कसाही सारून जाईल , रात्र सरेल तर खरी
पिल्लू दाराशी उभारून विचारतंय "बाबा अजून कसे नाही आले घरी ?"
पंचाईत झालीये हो सगळी , बिचाऱ्याला खंर सांगताही येत नाही
मुसमुसू लागेल "जाताना बाबा मला का नेत नाही ? "
कसातरी करून थांबवलाय … पूर डोळ्यात त्याच्या दाटलेला
डोळे बाबाच्या वाटेवर , पतंग हातात धरून फाटलेला
रात्रीचा दुधाचा पेलाही थांबलाय बाबाच्या घोटासाठी
अन कपाळावरचा गोड पापा , अजून जागतोय बाबाच्या ओठासाठी
खेळून खेळून , घालून धिंगाणा , इटुकली पावलं शेवटी विसावली
बाबाची चादर कवटाळून गच्च , गादीभर पसावली
येईलच की २ दिवसात तो , समजावणार कोण या कृष्णाला
आठवणीने जीव कसा हा इतका कासावीस झाला
घरी असतो तो …. कोपरा न कोपरा वसंतासारखा असतो जिवंत
सगळचं कसं थंडावलय आज , पहाटेच्या पहिल्या झुळुकीलाही त्याच्या नसण्याची खंत
इतक्या पहाटे दारावरची बेल ???? तो एका दिवसातच आला परत ????
नाही रहायचंय एकट्याला मला …… म्हणाला टपोरे डोळे भरत
तो आलाय ना , करेल तो , पाहील की सगळच ……. पुन्हा एकदा सावलीत त्याच्या शांत निवांत वाटलं
अन हसर खेळत घर माझ , त्याच्या भरल्या डोळ्यात नटलं

Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)