Specially for my Aai on her 50th birthday :)
बाबा अजून मोगऱ्याचा गजरा तिच्या वेणीत माळतात
केसांच्या कुरळ्या बटा आजही तिच्या गालांवर खेळतात
बांगड्यांची किणकिण … गणपती स्तोत्रापेक्षा पवित्र वाटते
अंगणातली जाई आजही तिच्या अंगाईने पाकळ्या मिटते
उंबरातरी कुठे जागा होतो तिच्या हळदी कुंकवाच्या बोटांशिवाय
वृन्दावनातल्या तुळशीलाही तिच्याच ओंजळीच अर्घ्य हवय
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही
हौसेखातर सुनेच्या, गौरीचा खेळ आजी अजून अंगणात मांडते
आईच्या हाकेने बहिणाबाई आमची अजून दुधाचा पेला सांडते :P
कपाळावरच कुंकू ती अजूनही तितक्याच कोरून लावते
नातवालाही अंघोळ घालताना ती पूर्वीसारखाच पदर खोवते
बायको , सून , वाहिनी , आई वरून आता ती आजी झाली
तरीही तिच्या चेहऱ्यावर एक सुरकुती नाही आली
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही
काजळ कोरते डोळ्यात … वाटत आजही ढग दाटून येतील
तिची माती सुगंधायला पुन्हा सरी भेटून जातील
ओठावरच्या तिळाने तिची रोजचं द्रुष्ट निघते
आरसा कशाला लागतो तिला …. सगळ्यांच्या डोळ्यात ती दिसते
मंगळसुत्राच्या वाट्यांची आजही करते पूजा
तसूभरही प्रेम तिचं अजून नाही झालं वजा
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?
पन्नाशी गाठली आईने असं वाटतंच नाही
कोल्हापुरी साजावर आजही मनापासून भाळते
रम्मीचा डावही अजून त्या एका पेप्सीसाठीच खेळते :)
दंडातल्या बाजुबंदासाठी चाललाय गेली २५ वर्षे हट्ट
म्हणते " वाढवून घ्या हो तोळ्याभराने, झालाय आता घट्ट "
लग्नातला परकाळा ही जपलाय लॉकरच्या कप्प्यात खाली
म्हणे …. सासरी जाताना माहेरपण जपतील यातच माझ्या मुली
(खरंच …. माझ्या लग्नात मी आईचा २५ वर्षापूर्वीचा शालू आणि परकाळा घेतला होता )
इतकी वर्ष सरून गेली तरी कुठे बदललय काही ?
काकू अजूनही तश्याच … मस्त दिसतात :)
ReplyDelete:)हो ती अजूनही …… सुंदर दिसते :) पन्नाशी गाठली म्हणून काय झाल ? :)
Deleteतुला ही देखणेपणाची भेट आईकडून मिळाली आहे ……
DeleteSimplicity is Beauty
तू नेहमीच म्हणतेस ना ……… नजरेला नजर देणाऱ्यापेक्षा झुकलेल्या पापण्या कधीही जास्त गोंडस दिसतात :)
:) Thank you so much dear .....
DeleteThis is awesome!
ReplyDeleteThank you :)
Deleteकेक घरी आल्यावर मिळेल :)
काजळ कोरते डोळ्यात … वाटत आजही ढग दाटून येतील
ReplyDeleteतिची माती सुगंधायला पुन्हा सरी भेटून जातील
Ekadam chhan lihili ahes :)
:) Thank you Neha
Deleteमाथ्यावरच्या हऴदी कुकंवाच्या टिळ्यात आर्य स्त्रीचं रुप दिसतं,
ReplyDeleteहिरव्या बांगड्याच्या खनखनाटात साधेपण झळकतं,
खरं सांगु आमृता, ह्या माझ्या काकु हे अभिमानानं सांगाव वाटतं.
तुझ्या आईला पाहताच दिवसभराचा कंटाळा पळुन जातो
सावळं सौदर्याचा ठेवा, कुठं तरी मनात घर करुन राहतो.
अन्नपुर्ना खरी ती सुग्रनीचा आहे हात तीचा,
मटनाच्या खाल्लेल्या जेवनाचा श्यन आहे माझ्या आठवनीचा.
इतके वेळा भेटलो मी त्यांना हे कधी जानवलंच नाही,
पन्नांशी गाठली तुझ्या आईनं हे कधी वाटलचं नाही.
-काव्यस्वामी
God always give strength n bless to her...
Thanks a lot Swapnil :)
Deleteजेव्हा मटण खावं वाटेल तेव्हा केव्हा ही जा घरी हक्काने …ती तुला परत करून वाढेल :)
And about your blog ...
http://bharatisut.blogspot.in/
Its too nice
Amruta .... mast lihili ahes :)
DeleteMazya kadunahi BDay wish sang
Swapnil tu hi chhan lihitos ki re :) Amruta, thanks for sharing his blog's link
:) Thank you
DeleteRead this ..Too good
ReplyDeletehttps://www.facebook.com/notes/amruta-ashish-pednekar/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/641682045850988
बापपण अनुभवताना...............
Deleteamazing birthday gift!!!
ReplyDelete:) Yes .... This is the best birthday gift ever... she said :)
DeleteThank you Rajani