ही पोस्ट वाचण्याआधी एक विनंती … या पोस्टमधील " निळ्या रंगातील शब्द " reference link म्हणून वापरले आहेत. हे शब्द म्हणजे या ब्लॉगवरची एक कविता …. जवळपास सगळ्या कवितांची शीर्षके माळून ही पोस्ट लिहिली आहे . एक छानशी गोष्ट . संबंधित कविता वाचण्यासाठी कृपया reference link ( blue letters ) वर click करा .
आजची ही पोस्ट म्हणजे मी मजल दरमजल करत गाठलेला पहिला टप्पा …. या ब्लॉग वरची माझी शंभरावी पोस्ट . तुमच्या या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद :)
तश्या माझ्या कवितांनी हा आकडा कधीच पार केलाय म्हणा माझ्या डायरीमध्ये. तरीही … तुमची दाद मिळालेली ही शंभरावी.
पण ही शंभरी नाकी नऊ आणणार अस वाटतंय कदाचित . म्हटलं १०० वी पोस्ट म्हटल्यावर काहीतरी खास लिहावं .काहीतरी सुरेख…कविता जमली पाहिजे …. माझ्या ब्लॉगच सेलिब्रेशन मी नाही करणार तर कोण ? पण म्हणतात ना …. काहीतरी ठरवून लिहायला बसल की शब्द रानातल्या पाचोळ्यासारखे सैरभैर उडून जातात . कुठेच काही गुंफता नाही येत.
सरस्वतीसमोर मांडी घालून, लेखणी घेऊन बसताना जर तुम्ही वहीच्या पानाच्या डोक्यावर विषय कोरून बसलात तर कितीही वेळ तिची आराधना करा …. पान कोर ते कोरंच राहील :) . त्याऐवजी रिकाम्या मनाने बसून लेखणीतून उमटेल ते लिहित जावं …. अप्रतिम निर्मिती झाल्यावाचून राहणार नाही. आणि हे माझ शंभराव पान … पहा , अजूनही कोर :)
शंभरी म्हटली की ब्लॉग ची काय आणि माणसाची काय …… सगळ गणित एकचं . आकडे १ पासूनच सुरु होत १०० पर्यंत पोहोचणार . म्हणजे असं ….
आई चिमुकल्या पावलांची वाट पहात असते. " फक्त एकदा येऊन जा " म्हणत बाळाच्या बोबड्या बोलांसाठी आतुर झालेली असते . आणि ती प्रतिक्षा संपते तब्बल ९ महिन्यांनी . जखमा कशा सुगंधी झाल्यात म्हणत आई सगळ्या वेदना अगदी धैर्याने सहन करते . पोटातला जीव " माझाच कुणीतरी " असतो ना तिच्यासाठी . :) .
" आई म्हणून घडताना …. " काय काय होत हे तेव्हाच जाणवत . हातात येत ते कन्यारत्न . बघता बघता " एक वर्ष झालं " तिला . " बाबा आज राहू दे office " म्हणणारे निरागस भाव चिमुकल्या डोळ्यात दाटलेले . आजी आजोबा खेळायला नाहीत म्हटल्यावर बाप्पाच्या पायरीवर रांगत जाऊन " आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे " ही विनवणी करायची … " तिला इतकंच कळत " :)
" आई म्हणून घडताना …. " काय काय होत हे तेव्हाच जाणवत . हातात येत ते कन्यारत्न . बघता बघता " एक वर्ष झालं " तिला . " बाबा आज राहू दे office " म्हणणारे निरागस भाव चिमुकल्या डोळ्यात दाटलेले . आजी आजोबा खेळायला नाहीत म्हटल्यावर बाप्पाच्या पायरीवर रांगत जाऊन " आजी आजोबाना माझ्या तू लग्गेच घरी पाठवून दे " ही विनवणी करायची … " तिला इतकंच कळत " :)
या आणि अशा बर्याच तिच्या त्या बालिश आठवणी
मुलगी नाशिबवानाच्या घरी जन्माला येते म्हणतात .मुलगी म्हणजे … विश्वनिर्मात्याला पहाटेच्या साखरझोपेत एक सुंदर स्वप्न पडाव … अशी निर्मिती … पण तरीही " मुलगा असते तर … " अस वाटतच हो कधीतरी कारण मुलगी म्हणजे " निखारा " आणि हे कधी कळत ?? जेव्हा ती एकाच वेळी दोन जिवलग मित्रांना आवडते " अशीच एक भावना , जिला शब्दच फुटत नाही " आणि समोर उभा राहतो तो Propose Day
हे झाल पहिल्या कन्यारात्नाबद्दल.
आता बायको आई झाली म्हणून पन्नाशी थोडीच गाठली लगेच ? " तो आणि त्याची सौ … " दोघांचेही सोनेरी दिवस आत्ता कुठे सुरु झालेत ." सगळ किती सहज पेललस " म्हणत तो ही तिची दाद देतो . एक दिवस जरी त्याच्याशिवाय काढायचा म्हटला कि लग्गेच " तुझ्याशिवाय …. " !!!! अस वाटत न अजून तिला. आणि एखाद गुलाबाचं फूल " बघ माझी आठवण येते का " हे सांगायला
जाता जाता तीच हे वाक्य " मुडकर न देखना " आणि मग रात्रभर दोघांचीही " आज झोपच आली नाही " अशी अवस्था ठरलेली . आता तुम्हीच सांगा " काय राव … हे काय बर आहे ".
जाता जाता तीच हे वाक्य " मुडकर न देखना " आणि मग रात्रभर दोघांचीही " आज झोपच आली नाही " अशी अवस्था ठरलेली . आता तुम्हीच सांगा " काय राव … हे काय बर आहे ".
" तसं पाहिलं तर " अहो " I miss my college days "म्हणतच दोघांच्या संसाराची सुरवात झाली. दोघे एकाच कॉलेजचे म्हटल्यावर या लवस्टोरी मध्ये " तू मात्र अशीच " ही तक्रार करत एखादी " बालमैत्रीण " तिला सोडून गेली तर त्यात नवल ते काय ? अहो ते दिवसच मंतरलेले " पाहिलं प्रेम कस विसरायचं ? ". साठवलेल्या ओल्या चिंब भेटी " आठवतंय तुला ? " म्हणत म्हणत
आनंदाने भरलेल्या अंगणात " ओठावरच हसर गाण … देठासहित खुडून दिलस " म्हणावं असा एक सखा ज्याचे आयुष्यभर धन्यवाद मानले तरी थोडेच . त्या सख्याच्या प्रेमात ती … प्रेम म्हटलं कि चंद्र आलाच पाहिजे की हो सोबतीला " चंद्राबरोबर तू ही हवा होतास " अस कितीतरी वेळा वाटत . आणि आजूबाजूचा प्रत्येकजण मग विचारत राहतो " प्रेमात कुणी पडलंय का ? ". मग " भावनांचा गुंता " अगदी अपेक्षितच. नको वाटते ही माणसांची गर्दी… " सगळ्यांपासून दूर ", " चंद्रालाही दूर लोटत " " सुटत चाललेली वीण " ओवायला पहिली की एकाकी रात्री " चांदण मुक्याने बरसत " आणि नेमक त्याच वेळी " कुणीतरी पाहत " :)
बर …. हे झाले जुने दिवस जुन्या आठवणी
आणि आत्ता … कन्यारत्नाला एक वर्ष झाल रे झाल की त्याच onsite आ …… वासून उभ राहत त्यांच्या समोर … तो जातो …ही इथेच …… :( " Being a mother " चा रोल पुरेपूर निभावत
" त्याच्या श्वासातला एक अखंड श्वास बनून " इतके दिवस त्याचा " पारिजात " " स्पर्श " अनुभवल्यावर तिला त्याची रोजच " आठवण होते ". अराशासामोरच तिचं ते " एकाकी देखणेपण " आणि डोळ्यात धारा पण " वाहायचं थांबेल … तर पाणी ते कुठल ? "
छोट छोट पिल्लू आईला सांगत " Distance does't matter " मम्मा :) .आपण " एरोप्लेन " नवीन आणू . बाबा रे " या आईला खरच नाही कळत काही " बघ एकदा कसे " साचलेत डोळ्यात तिच्या कोपर्यावाराचे ढग "
हि आणि अशी बरीच समजावयाची चिमुकली वाक्य . मग आईने कौतुकाने जवळ ओढल कि म्हणायचं " अग बाई … तुझाच आहे मी , कशाला उगाच भितेस ? "
" डोळ्यातले थेंब " बघून " ब्लॉग रायटिंग " वाली मैत्रीण विचारते " कशी आहेस ग ? " . यावर तीच ओलं चिंब उत्तर : संध्याकाळी " शुभंकरोती " म्हणायला बसल तरी तिला " हल्ली तो मला देवळात दिसतच नाही ". काय करू ? " हल्ली हे असच होत हो "
सगळ अंगण आनंदाने भरल तरीही प्रत्येकाकडे " माझ्या मनाचा रिकामा राहिलेला एक कोपरा " असतोच नेहमी आणि वाईफची " हाउसवाईफ " होता होता " सुटून गेलेले क्षण " परत आले तरी " आता काय कामाचे ? "
ही गोष्ट अशीच चालू राहील …. पुन्हा कधीतरी बोलू
फार लिहावस वाटतंय … " तरीही आज ठरवलंय " बस … इथेच " The End च पोस्टर " लावायचं आणि ही नऊ महिन्यांपासून सुरु झालेली ही पोस्ट " सराणावरच्या मरणा " पर्यंत येउन शंभरी पूर्ण करायची :)
धन्यवाद !
Congratulations on this Century.... :) Hope you get your blog's 100th Century soon.... :)
ReplyDeleteYou have chosen nice birth date for this Shambhari... Babancha B'day add nahi kelas g... :)
Congrats once again.... Thanks for giving us so nice poems to read.. Waiting for many more... :)
God bless you all...
Thank you :)
DeleteYes...Was waiting for that special moment ......his birthday with our love Arya at Eiffel tower :)
And about बाबांचा बर्थ डे !!!....... How can I miss that poem ? Please click on link " त्या बालिश आठवणी "
Are you in Paris ???
DeleteOhhhh.... Sahhhhii Yaar.....
Enjoy :)
Congrats ... पोस्टशंभरी la udand ayushya milo :)
Very nice post Amruta ... nicely organized all poems titles in this story
YOU ARE AMAZING :s
Mr. / Miss Anonymous,
DeleteThanks you so much :)
Superb
ReplyDeleteThank you Anumapa :)
DeleteFar chan ahe , kharch old days chi athvan zali
ReplyDeletecongratulations for century! !
:) Thank you Neha
DeleteExcellent, keep it up
ReplyDeleteThank you Prashant Kaka :)
DeleteEk no. meeow ... keep it coming
ReplyDelete:) Thank you Roshan
Delete