पत्रास कारण की ….
सकाळपासून कोसळतोय नुसता धो धो
तुझ्यासारखाच …… अचानक बरसायची सवयच त्याचीही
थोडस भिजून घ्यावं म्हणून बाहेर गेले आणि बंद झाला
तु ही असाच शांत व्हायाचास , मी दिसल्यावर
म्हटलं , आलेच आहे बाहेर तर थोडे पाय रिकामे करावेत
आता थांबलाच आहेस तर कशाला लागते छत्री
आणि पुन्हा तुझ्यासारखाच तो ही कोपऱ्यावरून मागे फिरला
तू मला विसरलीस कशी …. याची आठवण करून द्यायला
चिंब भिजायला ठरवून थोडीच बाहेर पडत कुणी ?
सगळ अस न ठरवताच घडत गेल …… आपल्या नात्यासारख
भिजलेल्या अंगाला मग रस्त्याकडेची पानगळ येवून चिकटली
हल्ली तुझ्या आठवणी ही अशाच बिलगतात रे ….
वाळलेली पान जास्त आवाज करतात ते त्यांना बाजूला करायला गेल की लक्षात येत
आठवणींच ही तसच काहीस , नो एन्ट्री चा बोर्ड दिसला की पहिल्या रांगेत येउन बसतात :)
आता म्हटलं जाव घरी , बराच उशीर फिरले थेंबाबरोबर
अचानक वाऱ्याचा वेग वाढला
कुठल्या रस्त्याने जावं घरी काहीच सुचेना
तू ही असाच …… पुढे यायचास आवेगाने , वाट अडवायला माझी :)
कित्ती वेळा अडवली असशील रे माझी वाट ?
काहीच हिशोब नाही लागत त्याचा आणि या बरसणाऱ्या थेम्बांचाही
खरच मोजायला सुरवात करायची की भिजायचं तुझ्यात मनसोक्त
आजही ठरवता नाही आल मला
कशीबशी पोहोचले घरी , परत लोकांची नजर चुकवत
नाही … परत म्हणतील "हे काय वय आहे हे सगळ करण्याच ?"
चिंब भिजायला वयाची नाही तरुण मनाची गरज असते
पावसातही आणि प्रेमातही
नाही रे कळल अजूनही यांना
असो ….
आता काय, मस्त गरमा गरम अल्ल्याचा चहा
तुझ्या श्वासासारख्या …. चहाच्या वाफाही रेंगाळतात गालांवर
आता जरा बर वाटतंय ……
थंडी नाही गेली अंगातली
पण ……. मनमुराद भिजल्याचा आनंद
आणि तो ही असा अचानक , न ठरवता
रस्ता क्रॉस करताना तू दिसलास परवा …
तेव्हा झाला ना अगदी तसाच
बाकी अजूनही ठरल्याप्रमाणे
तू तुझी वाट माझ्यासाठी वाकडी केली नाहीस
आणि मी …… तु घालून दिलेली रेष ओलांडायची नाही म्हणून अजून तिथेच
तुझ्या वाटेला कुठे वळण लागतय का …. आपल्या घरी येणार ?
याची वाट पहात :)
थांबेन …… थांबेन मी
माहित आहे मला
तू परतून येणार
आजच्या पावसा सारखाच, कोपर्यावरून
मी फिरायला बाहेर पडलेय हे कळल की :)
बाकी ठीक ……. छान चालू आहे सगळ
अर्रे थांब , एक सांगायचं राहिलच बघ परत
माती चीप्प भिजली होती पावसाने …
पण हल्ली तिन दरवळायचं सोडून दिलंय :)

Wow........................simply great
ReplyDeleteAwesome ..........
Speechless
You are just great Amruta
Thank you so much :)
DeleteWow...
ReplyDeleteThanks :)
ReplyDelete