एका निःशब्द पायवाटेवरून
बोचऱ्या थंडीशी हातमिळवणी करत
ढगाआडून डोकावणारा एक सूर्यकिरण शोधायला
नजर वर करावी
अन
एखाद पिकलं पान गळून अंगावर पडाव
सो-सो करणारी वाऱ्याची एक झुळूक
अन
झोपळ्यावर झुलणाऱ्या पोरासारख
एकेक पान भिरभिरत उडायला लागत
लाल पिवळ्या रंगांच्या सूर्यकिरणानी स्वतःला नटवून
वाटत … हे पानांचं आणि वाऱ्याच संभाषण मला का नाही आलं ऐकू ?
म्हणाला असेल वारा ….
"पिकल्या पानांनो ……
काय झाली थंडी पडली म्हणून
सोनेरी लाल स्वेटर देतो न मी आणून
असं कसं कुणी घरातून नाही बाहेर पडत
सजवू ना रस्ता आपण , पानाला पान जोडत "
अन या वाऱ्याच्या एका विनंतीवर
एका मागोमाग एक सगळीच्या सगळी पान गळायला सुरु झाली
जणू काही ……
ती मातीच्या प्रेमात पडली होती
इतक्या दिवसांचा देठाशी असलेला बंध तोडून
आवेगान रस्त्याशी लोळण घ्यायला तयार :)
जस काही
Fall is falling in love with the ground
महिन्यापूर्वी हिरवीगार दिसणारी झाडं
त्यांच्या तर नुसत्या रिकाम्या फांद्याच राहिल्या आता
आणि त्या खालची जमीन ……
तो तर बिछाना झालाय
बर्फाची पांढरी शुभ्र मऊशार रजई अंगावर ओढून घ्यायला तयार :)
आश्चर्य फक्त याचंच वाटतंय ……
पानगळ ही इतकी देखणी आणि सुरेख असू शकते ?
इथं प्रत्येक पिकल्या पानच आज फुल झालंय :)
खुप सुंदर लेखन आहे. खरच..! तुमच्या लेखणीतुन जणू अमृतधाराच ओसंडून वाहते आहे.
ReplyDeleteवाचताना मन अगदी मंत्रमुग्ध, तल्लीन होऊन.
Thank you Santosh for your comment.
Delete