आज ३१ डिसेंबर ! म्हणता म्हणता अजून काही क्षणांत २०१४ ला निरोप द्यायची अन २०१५ चे स्वागत करायची वेळ येउन ठेपेल .
बरच काही घडलय या गेल्या वर्षात . खरतर घडून गेलंय !
अपरिवर्तनीय बदल झालेत . खूप काही शिकायला मिळालंय . समृद्ध होतानाचा अनुभव अविस्मरणीयच .
पण नेमक काय समजायचं ?
सुरवातीचा शेवट की पुन्हा नव्याची सुरुवात
विझत आलेला नंदादीप की अखंड तेवणारी वात
नव्याने चमकणारी लकाकी की मागे टाकून दिलेली कात
पहाटेचे किरण पहिले की सरत आलेली रात
नेमक काय समजायचं ?
अनाकलनीय वळण की नवी पाऊलवाट
काळवंडलेल्या आठवणी की सुरुवातीचा जरीकाठ
मनातला उसळणारा समुद्र की किनाऱ्यावर शांत झालेली लाट
सोडून दिलेली वीण की नव्याने बसणारी गाठ
नेमक काय समजायचं ?
मागे राहिलेली घराची सावली की पायाखालची बर्फाची नवी शाल
खुणावणार क्षितीज की उंबरठा जो ओलांडला होता काल
कोडी , सोडवलेली सगळी की कुणाची अजून एखादी चाल
कुठलातरी जुना घंटानाद की आपलस करू पाहणारा अनोळखी ताल
नेमक काय समजायचं ?
नव्याने ओळख झालेला मनमोकळा संवाद की घरच्यांशी राहून गेलेल्या गप्पा
बंद कुपीतील अत्तर की त्यासाठी उघडलेला अजून एखादा कप्पा
नवा कोरा संकल्प की गेल्या वर्षीच्या पचलेल्या थापा
अंगणात वाट पाहणारा मोगऱ्याचा दरवळ की श्वासात जपलेला चाफा
नेमक काय समजायचं ?
पुढ्यात मांडलेल पक्वान्नाच ताट की आईचा राहून गेलेला मायेचा घास
गावाच्या मातीचा बेधुंद वास की सातासमुद्रावरचा नवा प्रवास
दोन पावलांवरचा आपल्यांचा गलका की पुन्हा एकाकीपणाचा भास
कडेला बांधून ठेवलेल अनुभवाचं गाठोड की काहीतरी नवं शिकण्याची लागलेली खरीखुरी आस
नेमक काय समजायचं हो ?
हा ३१ डिसेंबर म्हणजे …
थोडासा गोंधळ ,बरीचशी हळहळ
एखादी लपवलेली कळ ,आतल्या आत भळभळ
संकल्पामागे झालेली आपली विनाकारण पळापळ :)
पण उद्याची पहाट अवर्णनीय …।
नशिबाने वाढवून दिलेला अजून एक श्वास
ओंजळीत नव्याने दरवळणारा जुनाच एखादा सुवास :)

wonderful
ReplyDeleteThank you and Happy new year :)
Delete