आज एक वर्ष झालं

दुडू दुडू पळत कित्ती खेळून झाल ?
पावलातून तुझ्या आम्हाला बालपण परत मिळाल 
कॅलेंडरवर फिरून आज परत तेच पान आलं  
माझ्या पिल्लाला इथे येऊन आज एक वर्ष पूर्ण झाल :)

इवला इवलासा दिसत होतास , बाबांच्या हातात 
आजोबांनी केली रोषणाई, नातवाच्या थाटात  
आजीच्या साडीची पहिली वहीली उब 
तू तर ... आईची कार्बनकॉपी, अगदी हुबेहूब :)  

काकाच्या आनंदाला तर पारावारच न्हवता 
नुसता तुझ्याकडे एकटक बघत उभा होता
बऱ्याच दिवसांनी ओळखीची नजर पहात होता
म्हणे .... ह्या डोळ्यांना तो आधीपासून ओळखत होता

ता.... तर वेड्यासारखी धावतच आली
(ता ... म्हणजे आर्य ची मावशी , अंकिता)
फुग्यांनी तुझी रूम मस्त सजवून दिली
डॉक्टर काका म्हटले .. हा तर golden  boy
दसऱ्यादिवाशीच देव बाप्पा कडून सोनं घेऊन आलाय :)

१ वर्ष झाल तरी goldy च तू काकी आजीचा
आणि बाबांनीच  जिंकला मान तुझ्या पहिल्या पैजेचा :)
माहिती आहे ....तुम्हा बाप लेका मध्ये एक सिक्रेट पैज होती 
समुद्राला पहिले कोण भेटेल ??? शिंपला आधी कि मोती ? :)
(आई जवळ पहिला कोण पोहोचणार  ? बाबा कि मुलगा)

अरे सोन्या ... २५ पावसाळे पाहिलेत त्यांनी तुझ्यापेक्षा जास्त 
आले कि नाही तुझ्या आधी ... विमानातून मस्त मस्त
पैज बीज काही नाही रे .... तुलाच  घ्यायचं होत जवळ
म्हणून कालच्या सूर्याला सांगितलं  .... बाबारे आज जरा लवकर मावळ  :)
पिल्लू आमच वाट पाहिलं , आई च्या कुशीत 
त्यापेक्षा मीच जावून घेईन त्याला खुशीत 

कळल हि नाही कधी ... पटपट १ वर्ष सरलं 
रांगता रांगता पाळायला हि लागलास ... आता काय उरल ?
बोळक्यातून  दात सुद्धा बाहेर पडायला लागले 
उच्चार हि येतात आम्हाला आता स्पष्ट आणि चांगले 

ओ बाबा ओ ... ओ बाबा ओ ... चा तर जपच असतो 
आणि न कंटाळता माझा बाबा प्रत्येक हाकेवर गोड हसतो 
आई तर जाते दमून माझ्या मागे पळून 
"बस आता थोडीशी " कधीतरी मीच म्हणतो वळून :)

आज परत  माझा  बाबा विमानातून भूर गेला 
जाताना माझ्या tiger ला कशाला घेऊन गेला ?
म्हणतो कसा ... "पिल्ला आठवण येईल न मला तुझी 
रात्री झोप नाही आली तर tiger सोबत करेल माझी 
आई नी तू ..लवकर या ह दोघेही इकडे
वाट पाहतोय बाबा तुझी , सगळी तयारी करून तिकडे :) "

View Facebook Comments




आकाश झुकत नाही ...


आकाशातल्या ताऱ्यालाच पडायची भीती असते 
तोच फक्त जाणतो त्याची उंची किती असते 

जमिनीवरच्या दगडाला ,नसतच तुडवलं गेल्याच दुख
जन्मापासून मरणापर्यंत त्याच मातीतच असत डोक 

मातीसुद्धा कधीकधी उसळून वर येते 
पायाखाली तुडवल्यावर , डोक्यावर चढून बसते

जगायचंच असेल तर ताऱ्यासारख जगावं 
जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कौतुकाचा विषय असावं 

नाहीच जमल तर कमीत कमी माती तरी व्हावं 
दगडासारख खितपत पडण्यापेक्षा स्वाभिमानाला जपावं 

स्वप्नाच क्षितीज जेव्हा आपल्याला सामावून घेईल 
समाधानान क्षितिजावर लुकलुकत राहावं 

आणि संपूनच  जायचं असेल तर अशावेळी गळाव
अख्ख आकाश या मरणावर ढसढसून   रडावं 

कारण ......
कुणीतरी आठवण काढल्याशिवाय 
मरणाला अर्थ येत नाही 
आणि गरुडझेप घ्यायला शिकल्याशिवाय 
जमिनीकडे आकाश झुकत नाही ...


Inspiration:  व पु काळे ...आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.  समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.


लांबलेल्या वाटा...

एकदा माझ्या अंगणात , जा चांदण सांडून
विखुरलेलं आभाळ, पुन्हा एकदा मांडून 

फुललेला प्राजक्त , हवाय मला परत
पसरलेला सुगंध , ओंजळीने भरत

गुदमरलेल्या वाऱ्याला, पुन्हा एकदा वाहायचय
भर दुपारच्या वेळी , तुझ्या सावलीत रहायचय

मिटलेल्या पापण्यांनी स्वप्न तुझी आठवली 
मुसमुसणाऱ्या डोळ्यातच , आजपर्यंत ती साठवली 

खळाळनाऱ्या समुद्रालाही , किनाऱ्याची ओढ असते
वाट पाहणाऱ्या माणसाची आठवण किती गोड असते 

सारेच प्रश्न येऊन , तुझ्यापर्यंत थांबतात 
पण उत्तरच शोधायची तर , ती नको इतकी लांबतात

पावलं उमटवून घेणारी , विखुरलेली माती
ज्याला नावं नसतात , अशी ही नाती 

कधीतरी नकळत , हे दोन्ही हात जुळतात 
अन लांबलेल्या दोन वाटा, एकाच वळणावर मिळतात :)

View Facebook Comments