दुडू दुडू पळत कित्ती खेळून झाल ?
पावलातून तुझ्या आम्हाला बालपण परत मिळाल
कॅलेंडरवर फिरून आज परत तेच पान आलं
पावलातून तुझ्या आम्हाला बालपण परत मिळाल
कॅलेंडरवर फिरून आज परत तेच पान आलं
माझ्या पिल्लाला इथे येऊन आज एक वर्ष पूर्ण झाल :)
इवला इवलासा दिसत होतास , बाबांच्या हातात
आजोबांनी केली रोषणाई, नातवाच्या थाटात
आजीच्या साडीची पहिली वहीली उब
तू तर ... आईची कार्बनकॉपी, अगदी हुबेहूब :)
काकाच्या आनंदाला तर पारावारच न्हवता
नुसता तुझ्याकडे एकटक बघत उभा होता
बऱ्याच दिवसांनी ओळखीची नजर पहात होता
म्हणे .... ह्या डोळ्यांना तो आधीपासून ओळखत होता
बऱ्याच दिवसांनी ओळखीची नजर पहात होता
म्हणे .... ह्या डोळ्यांना तो आधीपासून ओळखत होता
ता.... तर वेड्यासारखी धावतच आली
(ता ... म्हणजे आर्य ची मावशी , अंकिता)
(ता ... म्हणजे आर्य ची मावशी , अंकिता)
फुग्यांनी तुझी रूम मस्त सजवून दिली
डॉक्टर काका म्हटले .. हा तर golden boy
दसऱ्यादिवाशीच देव बाप्पा कडून सोनं घेऊन आलाय :)
१ वर्ष झाल तरी goldy च तू काकी आजीचा
डॉक्टर काका म्हटले .. हा तर golden boy
दसऱ्यादिवाशीच देव बाप्पा कडून सोनं घेऊन आलाय :)
१ वर्ष झाल तरी goldy च तू काकी आजीचा
आणि बाबांनीच जिंकला मान तुझ्या पहिल्या पैजेचा :)
माहिती आहे ....तुम्हा बाप लेका मध्ये एक सिक्रेट पैज होती
समुद्राला पहिले कोण भेटेल ??? शिंपला आधी कि मोती ? :)
(आई जवळ पहिला कोण पोहोचणार ? बाबा कि मुलगा)
अरे सोन्या ... २५ पावसाळे पाहिलेत त्यांनी तुझ्यापेक्षा जास्त
आले कि नाही तुझ्या आधी ... विमानातून मस्त मस्त
पैज बीज काही नाही रे .... तुलाच घ्यायचं होत जवळ
म्हणून कालच्या सूर्याला सांगितलं .... बाबारे आज जरा लवकर मावळ :)
पिल्लू आमच वाट पाहिलं , आई च्या कुशीत
त्यापेक्षा मीच जावून घेईन त्याला खुशीत
कळल हि नाही कधी ... पटपट १ वर्ष सरलं
रांगता रांगता पाळायला हि लागलास ... आता काय उरल ?
बोळक्यातून दात सुद्धा बाहेर पडायला लागले
उच्चार हि येतात आम्हाला आता स्पष्ट आणि चांगले
ओ बाबा ओ ... ओ बाबा ओ ... चा तर जपच असतो
आणि न कंटाळता माझा बाबा प्रत्येक हाकेवर गोड हसतो
आई तर जाते दमून माझ्या मागे पळून
"बस आता थोडीशी " कधीतरी मीच म्हणतो वळून :)
आज परत माझा बाबा विमानातून भूर गेला
जाताना माझ्या tiger ला कशाला घेऊन गेला ?
म्हणतो कसा ... "पिल्ला आठवण येईल न मला तुझी
रात्री झोप नाही आली तर tiger सोबत करेल माझी
आई नी तू ..लवकर या ह दोघेही इकडे
Written on 6th Oct 2012
ReplyDeleteआर्यच्या वाढदिवशी ... त्याच्यासाठी खास