आकाशातल्या ताऱ्यालाच पडायची भीती असते
तोच फक्त जाणतो त्याची उंची किती असते
जमिनीवरच्या दगडाला ,नसतच तुडवलं गेल्याच दुख
जन्मापासून मरणापर्यंत त्याच मातीतच असत डोक
मातीसुद्धा कधीकधी उसळून वर येते
पायाखाली तुडवल्यावर , डोक्यावर चढून बसते
जगायचंच असेल तर ताऱ्यासारख जगावं
जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कौतुकाचा विषय असावं
नाहीच जमल तर कमीत कमी माती तरी व्हावं
दगडासारख खितपत पडण्यापेक्षा स्वाभिमानाला जपावं
स्वप्नाच क्षितीज जेव्हा आपल्याला सामावून घेईल
समाधानान क्षितिजावर लुकलुकत राहावं
आणि संपूनच जायचं असेल तर अशावेळी गळाव
अख्ख आकाश या मरणावर ढसढसून रडावं
कारण ......
कुणीतरी आठवण काढल्याशिवाय
मरणाला अर्थ येत नाही
आणि गरुडझेप घ्यायला शिकल्याशिवाय
जमिनीकडे आकाश झुकत नाही ...
Inspiration: व पु काळे ...आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)