एकदा माझ्या अंगणात , जा चांदण सांडून
विखुरलेलं आभाळ, पुन्हा एकदा मांडून
फुललेला प्राजक्त , हवाय मला परत
पसरलेला सुगंध , ओंजळीने भरत
गुदमरलेल्या वाऱ्याला, पुन्हा एकदा वाहायचय
भर दुपारच्या वेळी , तुझ्या सावलीत रहायचय
मिटलेल्या पापण्यांनी स्वप्न तुझी आठवली
मुसमुसणाऱ्या डोळ्यातच , आजपर्यंत ती साठवली
खळाळनाऱ्या समुद्रालाही , किनाऱ्याची ओढ असते
वाट पाहणाऱ्या माणसाची आठवण किती गोड असते
सारेच प्रश्न येऊन , तुझ्यापर्यंत थांबतात
पण उत्तरच शोधायची तर , ती नको इतकी लांबतात
पावलं उमटवून घेणारी , विखुरलेली माती
ज्याला नावं नसतात , अशी ही नाती
कधीतरी नकळत , हे दोन्ही हात जुळतात
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)