चौथ्या मजल्यावरून
खाली बघताना
तेवढ्या गाड्यांमध्ये
ती एकच पल्सर
धुळीने रापलेली दिसते
ठसठशीतपणे ..
उठून दिसणारी
बऱ्याच मुलांनी त्या धुळीवर
आपली नाव हि लिहिली आहेत
त्याला Airport वर सोडून आल्यावर
मी त्या गाडीला
शेवटचा हात लावला होता
गुडघ्यावर बसून सकाळीच सावंत रखवालदार सांगत होता
"ते साहेब बाहेर गेलेत
वहिनींनी गाडी धुवू नको अस सांगितलय "
माझ्या डोळ्यातला एक अश्रू मात्र
गच्चीतून नक्की जाऊन पडतो
रोज त्या सीटवर :)
बाहेरच्या रिकाम्या गच्चीत
संध्याकाळी पिल्ला बरोबर हवा खात बसल्यावर
जत्रेतल्या पाळण्यात झुलल्यासारख वाटत
पिल्लू पण गच्च धरून बसत मला
एकटेपणा बरोबर सगळ आभाळ झुलतय
तो मात्र नसतो,
पिल्लाला सावरून घ्यायला.
एवढ्या मोठ्या पसार्यात,
छातावाराच्या झुम्बरासारख वाटत .. एकाकी देखणेपण
मनाच्या समाधानासाठी
सकाळच्या चहाबरोबर एक रिकामा कप हि ठेवते चवीला
सवयीप्रमाण माझ्या कपातला घोट पिउन
"साखर कशी जास्त होते ग तुझ्यात :P"
म्हणणार कुणीही नसल तरीही
एकटा एकटा कप माझ्याकडे पाहून हसतो
म्हणे "तो नाही तोवर कमी साखरेचाच चहा प्यावा लागेल "
रागारागाने जीभ पोळेतोवर घटाघट संपवून टाकते
चाहतल एकटेपणाच वादळ
ते हि एकटच
कविता अपूर्ण वाटते..... शेवट सुचलाच नाही... "तो" आल्यावर करेन पूर्ण :)
ReplyDelete