सहज कुणीतरी बोललं आणि उगाच पाणी डोळ्यात साठलं
अख्ख जग आज माझ्या विरोधात उभ असल्यासारख वाटल
डोळ्यातलं पाणी सगळ्यांपासून लपवत पहिले गच्चीच टोक गाठल
पण वाहायच थांबेल ...तर पाणी ते कुठल ?
एक एक करत आठवणींच वादळ साऱ्या आकाशभर उठलं
ठिणगी ठिणगी पेरत सार रान वणव्यासारख पेटलं
मनातल्या खोल जखमांची खपली काढत सुटल
कधी भरलीच न्हवती ही भळभळनारी जखम .. हे मात्र पटलं
डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावरच खोट हसू.. आमच हे भांड सगळ्यांसमोर फुटलं
अन माझी धार कमी झाली म्हटल्यावर , सगळ्यांच्या तलवारीच पात माझ्यावर उठलं
म्हणूनच आज परत .....
नुसता तुझा आवाज ऐकायला हि माझ मन नटल
कस सांगू तुला ... माणसांच्या घोळक्यात मला तू दिलेल्या एकटेपणान गाठल
रात्रीचा अंधार खायला उठतो, धडधडत्या उराला मी घट्ट मिठीत घेतलं
अन तुला स्पर्शून आलेल्या वाऱ्याच्या झुळूकीन माझ पहाटेच स्वप्न तुटल
बस झाल आता ..परत ये तू .. म्हणत मी ही माझ्या घराच दार लोटलं
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)