हे एका पिल्लाने त्याच्या बाबांना लिहिलेलं पत्र ... बाबाच्या ओढीन खुश झालेल्या पिल्लाच्या मनात काय काय चालू असेल अजून ?
आठवतंय बाबा तुला ?
आठवतंय बाबा तुला ?
नुकताच शिकलो होतो उभं राहायला तुझ बोट धरून
नेमका त्याच दिवशी गेलास भूर .. तू एरोप्लेन वरून
( एरोप्लेन च्या वर बसून जातात अस वाटत या छोट्या जीवाला )
आई ची नजर चुकवून आता मला अंगणभर पळता येत
तुझे shoes पायात अडकवून ' बाबा - बाबा ' खेळताही येत :)
अगदी तुझ्याच सारखं करू पाहतो सगळ सेम टू सेम
एकट्याला खेळता येतो मला आपला angry birds चा गेम
अख्खा आंबा आवडतो मलाही नाही घेत कापून
तू पाठवलेले perfume वापरतो अजूनही जपून जपून :)
काका म्हणतो डबल मेंदू आहे माझ्या डोक्यात
कस काय बसतं सगळ छोट्या छोट्या खोक्यात ?
मीच मग आपल secret फोडून टाकल शेवटी
poems फक्त माझ्या डोक्यात ... बाकी सगळ बाबासाठी :) ( Secondary memory )
आईपण म्हणत असते "बाई ... हा फार झालाय आगाऊ "
२ दिवस थांब , तिलाही आपण आपल्या group मध्ये घेऊ
आगाऊपणा काय मग करायचा असतो मोठ्यांनी ?
ऑफिसमध्ये देत का कुणी तुला आता खेळू गोट्यांनी ?
तूच म्हणालास ना ...सगळ्यांशी हवं तितक खेळून घे
आजी , आजोबा , काका , मामा सगळ्यांना मनसोक्त छळून घे
उद्या मोठ्ठ-मोठ्ठ प्लेन आजीच्या अंगणाशी थांबेल येउन
मला आणि "मा" ला जाईल तुझ्याकडे घेऊन :)
आजी मात्र वेडीच आहे धावत जवळ आली
माझी brave आजी आज रडवेली कशी झाली ?
सांगून टाकू का बाबा तिला .. तू ही चल बरोबर आमच्या
एरोप्लेनवाला काका friend आहे बाबाचा माझ्या :(
एक सांगू ?
आजीच ठीक आहे रे ... पण आईच गणितच कळत नाही
तू गेलास तेव्हा रडतच होती
आता येतोय तुझ्याकडे तरी, काकाजवळ बसून तिच्या डोळ्यातून पाणी वाही
कुणाकुणाच्यात आणि कित्ती रे गुंतलय तिचं मन
आपल्या आजूबाजूलाच हवा असतो तिला " आपला " प्रत्येकजण
एक काम कर ... उद्या तिला एकदा मस्त जवळ घे
विसरून जाईल बघ सगळ ....एक गुलाब तेवढ गिफ्ट घेऊन ये
बघ ...झालो कि नाही बाबा मी तुझा मित्र
तुझ्या ब्रशने रंगवायला शिकलोय मी आता तुझी सगळी चित्र
आठवण आली असेल ना रे तुलाही खूप माझी
skype वरूनच खावी वाटली असेल ताटातली मेथीची भाजी
आता waiting संपल बाबा मस्त मजेत राहू
जे काही बनवेल आई ते तू नी मी वाटून वाटून खाऊ :)