कविता जमली पाहिजे


इयत्ता सहावीत असल्यापासून शब्दाला शब्द जोडत, अगदी बाल ...(बालकविता) पासूनच  कविता लिहायला सुरुवात केली .
त्यातल्या बऱ्याच अजूनही तशाच डायरीत आहेत .. कुठलीतरी अर्धवट राहिली म्हणून,एखादी आवडलीच नाही म्हणून , कधीतरी शेवटच नाही सुचला म्हणून  
अशी बरीच कारण .. लिहिण्यासाठी आणि न लिहिण्यासाठीही . प्रत्येक वेळी लिहायला जमतेच अस नाही  
पण जेव्हा जेव्हा म्हणून लिहायला घेतलं , तेव्हा तेव्हा वाटायचं 
कविता जमली पाहिजे
ज्या बद्दल लिहितेय , ते खोलपासून सगळाच्या सगळ खर खर उतरवता आल पाहिजे 
बस्स  ..... वाचणाऱ्याला वाटावं .. हे आपल्याबद्दल लिहिलंय  
अगदी अस्सच ....  

गौरीचा खेळ खेळणाऱ्या माहेरवाशिणी सारखी 
कविता घागरीत घुमली पाहिजे 
स्सुसू...र  स्सुसू...र आवाज करत हातभर ओघळणाऱ्या 
बर्फाच्या गोळ्यासारखी जमली पाहिजे 
कविता जमली पाहिजे

भूतकाळावर वार करून जुनी खपली काढत 
कुणाच्यातरी मनाला झोंबली पाहिजे
शब्दांच्या लाटेवर जरी असेल झाली स्वार 
तरी त्या दोघांसाठी किनाऱ्यावर थोडावेळ थांबली पाहिजे  
कविता जमली पाहिजे

आजीच्या घरी रहायला गेलेल्या २ वर्षांच्या नातवासारखी 
प्रत्येकाच्या बालपणात रमली पाहिजे 
हातगाडीवाल्याच्या खांद्यावरून ओघळणाऱ्या घामाइतकी
शब्दांना एकमेकांत ओवता ओवता दमली पाहिजे  
कविता जमली पाहिजे

देऊळ नसणाऱ्या देवाच्या 'शिवाजी महाराज कि .....जय ' इतकीच
ती आकाशापर्यंत दुमदुमली ही पाहिजे
आणि तितक्याच नम्रतेने रसिकाच्या चरणावर  
नमली ही पाहिजे 
कविता जमली पाहिजे

तिच्या लांबसडक केसांपासून सुरु होत...
भांगातल्या लालचुटुक कुंकवाशी खाली येत
कमरेभोवती नेसलेल्या साडीसोबत एक विळखा घेत  
उंबऱ्यावरच माप ओलांडणाऱ्या पावलापर्यंत येउन थांबली पाहिजे 
कविता जमली पाहिजे   

पहाटेच्या सोनसळी स्वप्नांसोबत उठून 
१२ च्या डोक्यावरच्या सूर्याला पायाखालच्या सावालीसोबत भेटून 
सायंकाळच्या इंद्रधनूच्या कमानिसारखी नटून 
रात्रीच्या पिल्लाच्या अंगाई गीताने ...डोळ्यातल्या निजेसोबत शमली पाहिजे 
कविता जमली पाहिजे

कविता ....जमली पाहिजे

आजपर्यंत लिहिलेल्या बऱ्याच कवितांचे विषय इथे ..या एका कवितेतून मांडायचा प्रयत्न केला 
लोकं विचारतात ... कशावर लिहितेस ग तू ?
गौरीचा खेळ, बर्फाचा गोळा , मनातला गोंधळ ,आजीच घर , कष्टाची भाकरी ,  त्या दोघांची भांडण , तिचा साडीतला देखणेपणा , निसर्ग , बाळाची अंगाई  आणि बरच काही
आणि हो .. "तुमच्यासाठी कायपण " म्हणणाऱ्या साठीही :)  

7 comments:

  1. This one is awesome :)
    तिच्या लांबसडक केसांपासून सुरु होत...
    भांगातल्या लालचुटुक कुंकवाशी खाली येत
    कमरेभोवती नेसलेल्या साडीसोबत एक विळखा घेत
    उंबऱ्यावरच माप ओलांडणाऱ्या पावलापर्यंत येउन थांबली पाहिजे
    कविता जमली पाहिजे

    ReplyDelete
  2. Jamali re jamali :)

    ReplyDelete

Thank you for your comment :)