दोघी मैत्रिणी . का वेगळ्या झाल्या दोघीनाही माहित नाही ...
पावला पावलाला तिच्या आवडी , सवयी, नखरे ..सारकाही अस्सच्या अस्स आठवत . आणि वाटत आजही
अशीच असेल का ती ? कि बदलल असेल सगळ ?
कशी दिसत असेल ?
अजूनही तशीच हसत असेल ?
कपड्यांना अजूनही मी दिलेला परफ्युम फासत असेल ?
तळ्याकाठी पाय सोडून आता एकटीच बसत असेल ?
कशी दिसत असेल ????
कशी आहेस ग... ?
आपण शेवटच भेटलो होतो .. तेव्हा दिसत होतीस अजून अगदी तशीच ?
अजून उडवतेस चेहऱ्यासमोर आलेली बट
फुंकर घालून ओठांनी ?
घालतेस का अजून कोडी
वाकडे चाळे करून बोटांनी ?
अजूनही पौर्णिमेच्या चंद्राशी
चालू असतात का ग तुझ्या एकट्या गप्पा
माझ्या ग्रीटींग्सनी आहे का भरला
अजून कपाटाचा वरचा कप्पा ?
वाटत का आता कधी तुला
ताटातली मेथी वाटून वाटून खावी ?
ट्रीप्सी बसून ट्राफिक पोलिसाला
एक आगाऊ स्माईल द्यावी ?
निशिगंधाच्या फुलांनी
घमघमत असते का अजून तुझे घर
एकटी बसल्यावर आठवत कधी
"अमू .. आठवण आलीये सांगायला कधीतरी मला फोन कर :) "
रंगलेल्या मेंदीचा वास आजही करतो बेधुंद ?
परवा पाहील ... तुझ्या रूमची खिडकी आजही असते बंद
"शुभेच्छा फोनद्वारे स्वीकारल्या जातील " आठवतो तो दिवस ?
तुला पेस्ट्री खायला आवडते म्हणून रोज माझा वाढदिवस
मंदिरामागच्या तळ्याकडे पाहून
येते का ग कधी माझी आठवण ?
बस.... अस निघून जायला नको होतस तू
This one is to one of my best friend. Some of you may guess it :)
ReplyDeleteYou guessed it right Devika :)
Delete:-)
ReplyDelete:)
Deleteekdam chhan kavita ahe !
ReplyDeleteThank you Yogendra :)
Delete