हाउसवाईफ


हाउसवाईफ 

              एक अस प्रोफेशन …. जिथं ROR , JAVA सारख्या प्लाटफॉर्मवर बसून नाही, तर पायाला चाकं लावून एक्स्प्रेसच्या गतीने धावत काम कराव लागत . जिची शिफ्ट मुलं अंथरुणातून उठण्याआधी पहाटे ५ ला सुरु होते.

               स्वाइप - इन वेळेत नाही झाल तर एक दिवसाचा पगार कमी झालेला चालतो हो कोणालाही. पण इथे … दुर्गेसारखी हातात हत्यार घेऊन सगळी एकावेळी चालवत, clock cycle short करून प्रोसेसर स्पीड वाढवून  ८ ला डबा तयार ठेवावाच लागतो . आणि तो टेबलवरचा डबाही नवरोबा विसरून जातात :) का ??????  तर म्हणे …… " bag मध्ये नाही का ठेवता येत ग तुला ? " :D 

               तिचा चहा रोज थंड झाल्यावरच पिते ती . फक्त इतकच घरच्यांना माहित असत . पण का कुणी विचारलच नाही ??  चहाचा पहिला घोट घेतला रे घेतला कि तिचं पिल्लू अंथरुणात जाग होत " मम्मा … " ( अरे देवा …. कॅमेरा आहे का ह्याच्याकडे ? कसं कळत ह्याला मी चहा घेणार ते ? ) 

               दिवस कसा निघून जातो तिचं तिलाही कळत नाही . त्या एका दिवसात ती टीचर होवून मुलाला २ तास शिकवते  . कामवाली मावशी होऊन कपडे धुते . स्वयंपाक ही  तीच बनवते ( जो बऱ्याच वेळा खारट , जास्त गोड किंवा सपक लागतो सासूबाईना ) तिच्याशिवाय दुसऱ्या कुणीही भाजी आणलेली मुलीला नाही आवडत तिच्या .

               रात्र झाली की आजी होवून अंगाई ही गावी लागते तिला आणि तिही सुरात …. नाहीतर पिल्लू लगेच feedback देत " मम्मा …… शी … ".  एकूणच काय मुलांसाठी ती एव्हरग्रीन मम्मा असते . आणि नवरोबांसाठी शिकलेली बायको म्हणून रिकाम्या वेळात तिला सगळे अकाउन्टस ऑनलाईन handle करावे लागतात. 
थोडक्यात सांगायचं म्हणजे तिच्या कामाची यादी ही  Infinite array असते. :) . तसं बऱ्याच वेळा तिला remote desktop घेऊन नणंदेच्या घरचं लोणचं ही execute करावं लागत.  

                  तिच्या ongoing प्रोजेक्टची line कधीही dead झालेली अजून कुणी पाहिलेली नाही . बोबड्या शब्दात बोलू पाहणारा दीड वर्षांचा चिरंजीव म्हणजे हिचा client. ज्याच्या सगळ्या requirements gather करून , आपल्या language मध्ये decrypt  करून पुढच्या सेकंदाला तिला code ready ठेवावा लागतो . 

                   ती म्हणजे चालत बोलत क्लिनिक . कुठली गोळी कधी , कुणाला लागते आणि ती कुठे ठेवलीये हे फक्त हिलाच माहित असत. पण  गेले २ दिवस झाले तिचं डोकं दुखतंय हे लक्षातच नाही आलं कुणाच्या . :( जाणवलच नाही कुणाला … हिला आईची आठवण येतेय . काहीच नाही सुचत आहे म्हटल्यावर तिचा आवाज ज…रा कुठे चढला कुणावर तर लग्गेच appraisal कमेंट्स सारखे कमेंट्स यायला सुरु होतात "इतकी हायपर नको होत जावू लगेच तू ."

               डोळ्यातून टचकन निघालेला थेंब लपवत ती स्वयंपाकघरात जाते .  तो लपवलेला थेंब इतकच सांगत असतो …. आई जवळ असती तर पदरात घुसून मनसोक्त रडता तरी आलं असत :'(      

Housewife is a  family manager , mistress of the house

Hats off to you :)


सुटून गेलेला क्षण


कणाकणांनी वेचायच , क्षणाक्षणाने जगायचं 
उरल आयुष्य आता फक्त सुखच बघायचं 
          अस म्हणत … 
एखाद्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो 

मग ती एखादी घटना असेल, 
          एखाद अर्धवट राहिलेलं स्वप्न असेल 
किंवा मग एखादी अपूर्ण इच्छा 
          जी पूर्ण व्हायची आपण अगदी दिवसाही स्वप्न पाहत असतो 

          आणि … 
तो दिवस अगदी नकळत उगवतो …. 
जे काही इतके दिवस मनाच्या कँनव्हासवर चितारलं होत ते घडूनही जात 

react करायला , आनंद व्यक्त करायला किंवा मन भरेतोवर अनुभवायला ही वेळ नाही मिळत  
डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर तो क्षण एका क्षणाने शिळा झालेला असतो 

तो क्षण देखील क्षणभर आपला असतो 
          आणि पुढच्या क्षणातच कायमचा पोरका होतो
साबणाच्या फुग्यांची डबी हातात राहावी 
          अन हवेत हरवलेल्या नाजूक फुग्या सारखा होतो 

आयुष्य इतक्या जलद गतीने बदलत आहे की 
त्या देवबाप्पाला thanks म्हणायलाही वेळ मिळत नाहीये 

घडून गेलेल्या घटनेकडे...
          आपण इतक्या तन्मयतेने आणि आत्मीयतेने पाहत राहतो 
की पुढची अजून एक इच्छा झाली पण पूर्ण … हे लक्षात यायला ही २ क्षणांचा विलंब होतोय :)

जणू काही दुर्वांच्या जुडीत लपून गेलेला हात … 
          नेहमी हाच आशीर्वाद देतोय 

क्षण सारे जगून घे.....सारे काही मागून घे 
जाणाऱ्या क्षणासाठी .....एक आठवण आठवणीने दे :)

नात तुझ नि माझ.....कणाकणातून घडणार
सूखादुखाच्या सोबतीने......आकाशाला भिडणार

View Facebook Comments

या आईला खरंच नाही कळत काही





या आईला खरंच नाही कळत काही....
 
झोपेतून उठवायची ही वेळ आहे काय ग बाई ?
पहाटे  ५ ला मला भूक लागत नाही
डोळे ताणत … पेंगत कसं जाईल दुध मला
पोटातले बेडूक ओरडायला … मी रात्रभर
दंगा पण नाही केला
या आईला खरंच नाही कळत काही
माझी स्वप्न मोडायची हिला उगाचच रोज घाई

गरम
गरम पोहे खायला लागतो मलाही चमचा
मागितला तर म्हणते कशी " हा आला … फॉरेनर आमचा :) "
सूर लावून मी  जेव्हा ओरडतो " म … मा …. "
तिच्या कपाळाची आठी सांगते " राहूदे इंडिया … तू इथेच हो जमा " :p
या आईला खरंच नाही कळत काही
दारातल लाल tulip ही आमच्या गणपती बाप्पाला वाही


( जर्मनीमध्ये आल्यापासून पिल्लाला खेळायला खडे , वाळू शोधावे लागतात )
२ दिवसांच्या भटकंतीनंतर लागला होता एक खडा हाती
आजीच्या गावी पसरली होती मस्त अंगणभर माती
गार्डनमधल्या वाळूशी ही  सांगते खेळ जपून
टंग … टंग वाल्या बाप्पाला म्हणे नमस्कार नसतो
करायचा झोपून  
(टंग … टंग वाला बाप्पा म्हणजे घराशेजारच चर्च )
या आईला खरंच नाही कळत काही
सगळे बाप्पा एकच… जेव्हा आपल्याला तो छान छान स्माईल देई

बाबांचा Latpot
( laptop ) म्हणजे ऑफिसच काम
मी सुरु करायला गेलो तर ओरडते " भात खा आधी … तू जरा थांब "
शोधून शेवग्याची शेंग मात्र वरणात रोज आणते
Indian supermarket  चा पत्ता अगदी पहिल्या दिवसापासून जाणते   
या आईला खरंच नाही कळत काही
देश तसा वेश … तुझ पिल्लू थोड्या दिवसात खायला लागेल thai :)  

टबमध्ये बाथ तर नाहीच करू देत कधी
थंडी लागेल म्हणून मला स्वेटर चढवते आधी
वासाच क्रीम रोज रोज अंगाला फासते
स्वतः मात्र कॉफी घ्यायला कसं गच्चीत जाऊन बसते ?
या आईला खरंच नाही कळत काही
तिच्यासाठी पिल्लू तीच अजून मोठ झालेलं नाही :)

कडेवर घेऊन फिरताना कधी हिची पाठ नाही दुखली
आता चालायला येतंय आणि मला इथे pram घेतली
बाबाच्या ऑफिस पर्यंत ही रोज जॉगिंग करते
माझी school bag ही अगदी neat and clean भरते
या आईला खरंच नाही कळत काही
खरचं ….
आमच्या दोघांतून हिच्या ब्लॉग ला हिला हल्ली वेळच मिळत नाही :(


आता काय कामाचे ?



मी ऐकलंय 

साखरपुडा ठरल्यावर तू रड रड रडलीस 
'त्या' ला ही तू बिना मेकअपचीच पसंत पडलीस 
कवितांची वही सुद्धा म्हणे झाली तुला जड 
फडण्याआधी शेवटची म्हणूनही पाहीली नाहीस धड

थरथरत होता ओठ तुझा पत्ता सासरचा सांगताना 
टीपं गाळत होतीस डोळे मिटून बाळकृष्ण देव्हार्यात रांगताना 
जाळून टाकलेस सगळे ग्रीटींग्स शांतपणे माझे 
जपून ठेवलेले आपल्या सावलीचे फोटो … ते तरी आता काय कामाचे ? 

एक दीर्घ श्वास माझ्या नावचा , त्याला ' हो ' म्हणण्या आधी 
पूर्ण झाली माझ्या शिवाय तुझी निमंत्रितांची यादी
हात जोडून मागीतलीस क्षमा मंगळसूत्रातल्या मण्यांची
सप्तपदीवेळीही आठवण तुला आपण एकत्र घालवलेल्या क्षणांची   

विचारलंच असेल नणंदेने, उंबऱ्यावरच ओलांडताना माप
सून म्हणून मला द्याल न मुलगी, जेव्हा व्हाल तुम्ही आई-बाप
कोण सांगेल नवऱ्याला तुझ्या , आवडतो तुला मुलगा ?
बायकोकडे बघून जेव्हा उत्तरला तो " बहिणाबाई …. आज हवं ते मागा :) "

आता फक्त एवढंच शेवटच एकदा सांग 
का मिटलेस डोळे तू कुंकवाने भरताना भांग ?
उघड्या डोळ्यांनी स्वीकारायचं सगळ धाडस ठेव ग बबड्या 
दे फेकून प्रेमाच्या आपल्या त्या तकलादू कुबड्या