हाउसवाईफ
एक अस प्रोफेशन …. जिथं ROR , JAVA सारख्या प्लाटफॉर्मवर बसून नाही, तर पायाला चाकं लावून एक्स्प्रेसच्या गतीने धावत काम कराव लागत . जिची शिफ्ट मुलं अंथरुणातून उठण्याआधी पहाटे ५ ला सुरु होते.
स्वाइप - इन वेळेत नाही झाल तर एक दिवसाचा पगार कमी झालेला चालतो हो कोणालाही. पण इथे … दुर्गेसारखी हातात हत्यार घेऊन सगळी एकावेळी चालवत, clock cycle short करून प्रोसेसर स्पीड वाढवून ८ ला डबा तयार ठेवावाच लागतो . आणि तो टेबलवरचा डबाही नवरोबा विसरून जातात :) का ?????? तर म्हणे …… " bag मध्ये नाही का ठेवता येत ग तुला ? " :D
तिचा चहा रोज थंड झाल्यावरच पिते ती . फक्त इतकच घरच्यांना माहित असत . पण का कुणी विचारलच नाही ?? चहाचा पहिला घोट घेतला रे घेतला कि तिचं पिल्लू अंथरुणात जाग होत " मम्मा … " ( अरे देवा …. कॅमेरा आहे का ह्याच्याकडे ? कसं कळत ह्याला मी चहा घेणार ते ? )
दिवस कसा निघून जातो तिचं तिलाही कळत नाही . त्या एका दिवसात ती टीचर होवून मुलाला २ तास शिकवते . कामवाली मावशी होऊन कपडे धुते . स्वयंपाक ही तीच बनवते ( जो बऱ्याच वेळा खारट , जास्त गोड किंवा सपक लागतो सासूबाईना ) तिच्याशिवाय दुसऱ्या कुणीही भाजी आणलेली मुलीला नाही आवडत तिच्या .
रात्र झाली की आजी होवून अंगाई ही गावी लागते तिला आणि तिही सुरात …. नाहीतर पिल्लू लगेच feedback देत " मम्मा …… शी … ". एकूणच काय मुलांसाठी ती एव्हरग्रीन मम्मा असते . आणि नवरोबांसाठी शिकलेली बायको म्हणून रिकाम्या वेळात तिला सगळे अकाउन्टस ऑनलाईन handle करावे लागतात.
थोडक्यात सांगायचं म्हणजे तिच्या कामाची यादी ही Infinite array असते. :) . तसं बऱ्याच वेळा तिला remote desktop घेऊन नणंदेच्या घरचं लोणचं ही execute करावं लागत.
तिच्या ongoing प्रोजेक्टची line कधीही dead झालेली अजून कुणी पाहिलेली नाही . बोबड्या शब्दात बोलू पाहणारा दीड वर्षांचा चिरंजीव म्हणजे हिचा client. ज्याच्या सगळ्या requirements gather करून , आपल्या language मध्ये decrypt करून पुढच्या सेकंदाला तिला code ready ठेवावा लागतो .
ती म्हणजे चालत बोलत क्लिनिक . कुठली गोळी कधी , कुणाला लागते आणि ती कुठे ठेवलीये हे फक्त हिलाच माहित असत. पण गेले २ दिवस झाले तिचं डोकं दुखतंय हे लक्षातच नाही आलं कुणाच्या . :( जाणवलच नाही कुणाला … हिला आईची आठवण येतेय . काहीच नाही सुचत आहे म्हटल्यावर तिचा आवाज ज…रा कुठे चढला कुणावर तर लग्गेच appraisal कमेंट्स सारखे कमेंट्स यायला सुरु होतात "इतकी हायपर नको होत जावू लगेच तू ."
डोळ्यातून टचकन निघालेला थेंब लपवत ती स्वयंपाकघरात जाते . तो लपवलेला थेंब इतकच सांगत असतो …. आई जवळ असती तर पदरात घुसून मनसोक्त रडता तरी आलं असत :'(
Housewife is a family manager , mistress of the house
Hats off to you :)
Tuze "Software concepts" ekadam mast mix kelet emotions barobar :)
ReplyDelete:c Try kela ahe mix karayacha
DeleteJamalay barya paiki :s