ओठावर आलेले शब्द जीभेतच अडखळतात
आई म्हणे…. मी बोलतच नाही
चिमुकल्या पावलांना हवेत उडायचं असतं
म्हणे…. मी चालतच नाही
हवाय फराळ नवीन, नुकत्याच उगवलेल्या दातांना
भिंतीही कमी पडताहेत अभ्यासाला या चिमुकल्या हातांना
काका सांगतो मी हुबेहूब बाबावर गेलोय
आणि माझी आई म्हणे …. मी आगाऊ झालोय :P
(बिचारा बाबा …. :D)
वरण भाताच्या शेजारी असतेच शेंगदाण्याची चटणी
तरीही बाबाच्या ताटात रोज घालतो वाटणी
एवढू- एवढूश्या पापडात माझ कसतरी करून भागत
अन आई म्हणे …. मला नुसत चटक - मटक लागत
हिच्या वेणीतल्या फुलासाठी रोज मैलभर धावतो
म्हणे …. हा सकाळी सकाळी शिकलाय हिंडायला
उपाशी चिऊशी माझ्यातले २ घोट " शेअर " करतो
म्हणे … मस्ती आलीये ह्याला गच्चीत दुध सांडायला :(
कधीतरी वाटते म्हणावी आईसाठी ही अंगाई
तिला तर कधी कुणी थोपटवत पण नाही
केसातून हात फिरवत जवळ घ्यावं म्हटलं तर
माझ्याच नीजेची लागलेली असते हिला घाई
तरीही आज ठरवलंय ….
हीच जेवण होइतोवर चांदोबाला थांबवायच
टान-टानवाल्या बाप्पाकडून हिच्यासाठी कँडलं घ्यायचं
पसारा झालाय म्हणून ओरडली तरी चालेल
पण परवा विसकटलेल हीच कपाट , परत छान लावून द्यायचं :)
(आता माझी आई म्हणेल …. " अरे देवा … तू लावून देणार कपाट , म्हणजे डब्बल काम :D )
डब्बल काम :)
ReplyDelete:o ho na..... mag kay tar
Delete